प्रियांनो शालोम,

हा ब्लॉग देवाच्या सेवेचा उद्देश पुढे ठेऊन निर्माण केला आहे. ह्या ब्लॉग द्वारे आम्ही पाळकीय सेवेतील सहबांधव, ख्रिस्ती पुढारी, व विश्वासणारे बहीण भाऊ यांना देवाच्या सेवेतील सहकर्मी म्हणून वेगवेगळ्या विषयांवर माहिती पुरवणे मार्गदर्शन करणे व सदृढ व निकोप समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा आमचा उद्देश आहे.

समाजामध्ये प्रीती व ऐक्य स्थापित करण्यासाठी झटणे व प्रभू येशू ख्रिस्तामधील आशेने सुवार्ता प्रसार; पवित्रता, शिक्षण व दयार्थसेवेला प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आमचा विश्वास आहे की, ‘प्रभू येशू ख्रिस्त मार्ग सत्य व जीवन आहे!’ योहान १४:६ त्याच्यावरील विश्वासाने मनुष्याला पाप क्षमा, श्राप मुक्ती, मिळते. पृथ्वीवर जीवन जगताना विश्वासणारा मनुष्य स्वर्गीय ज्ञान, सामर्थ्य व सहभागिता यांचा अनुभव घेत, शांतीने, आनंदाने व प्रीतीने भरलेले जीवन जगण्यास समर्थ होतो, व सार्वकालिक जीवनाविषयी (अमरत्वाविषयी ) त्याची खात्री पटत जाते.

म्हणून समाजाला सुवार्तेद्वारे अध्यात्माकडे वळवल्याने सामाजिक ऐक्य, शांतीपूर्ण आनंददायी जीवन व निकोप राष्ट्र उभारणीच्या कार्यास गतिशीलता येऊन, स्थिर समाज व्यवस्थेची निर्मिती होईल व प्रगतिशील प्रबळ राष्ट्र उभारणी होईल.

रेव्ह. कैलास (अलिशा ) साठे.

यहोवा
येशूने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे ! योहान १४:६
Optimized by Optimole