रोजची आत्मिक भाकर

वचन: नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले होते; कृपा व सत्य येशूच्या द्वारे आली. योहान १:१७. मनुष्याने आज्ञाभंग केल्या नंतर तो देवाच्या सहभागितेला मुकला. त्यामुळे ज्ञान, सामर्थ्य, आरोग्य, यश, शांती, आनंद, हे जे सर्व त्याच्या ठायी देवाने ठवले होते ते त्याच्या पासून निघून गेले. पुन्हा ते गौरव व सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून मनुष्य झटू लागला. निर्माण… Continue reading रोजची आत्मिक भाकर

आजची आत्मिक भाकर.

 वचन: यहोवा थोर व परम स्तुत्य आहे आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे.स्तोत्र १४५:३. देव त्याच्या कर्तृत्वाने व व्यक्तित्वाने इतका मोठा आहे कि मानवी बुद्धीला त्याचे आकलन होत नाही,तोअति थोर व परमस्तूत्य आहे. दावीद राजा म्हणतो,”देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा स्तोत्र ३४:८. त्याची हि थोर-वी त्याच्या लेकरांना संपन्न करते, त्याची दया, करूणा, क्षमा, कृपा, शांती, आ-नंद, प्रीती, न्यायीपण, ज्ञान, सामर्थ्य, व बरकत, चांगुलपणाची हि यादी खूप मोठी होऊ शकते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुरूप तो प्रगट होतो.त्याच्या थोरवीची हि किमया न्यारी आहे, ज्याला समजली त्याचे जीवन त्याच्या स्तुतीने भरून जाते. प्रार्थना : हे प्रभू येशू तुझी महिमा अगाध आहे, तू जो परोमोच्च परमेश्वर त्यातूला मान, सन्मान, व गौरव सदासर्वदा असो. तुझ्या प्रितीने माझे तारण कर, तुझ्या आगापे प्रेमाने मला भर, तुझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने मी प्रीती करावी म्हणून मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर.येशूच्या नावाने मागतो.आमेन. रेव्ह कैलास [अलिशा ]साठे  वचन: हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, स्तोत्र ६२:५. दावीद राजाच्या जीवनातील संघर्ष पराकोटीचा होता, बाहेरील शत्रूं बरोबरच अतंर्गत शत्रूं होते, त्यामुळेअतंर्गत षडयंत्रकारी,अंतःकरणात शाप देणारे व कपटी लोकांचे पाताळयंत्री राजकारण तोअनुभवत होता.आशा परिस्थितीत भयभीत होणे,काळजी चिंतांनी ग्रस्त होणे साहजिक आहे . स्वभावतः आशा वेळप्रसंगी मनुष्य काहीही करू शकतो, उदाहरणार्थ जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे, इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करणे व काहीच साध्य होत नाही असे वाटल्यास आत्महत्ये सारखा अत्यंत चुकीचा निर्णय घेणे, आशाने जीवनातील प्रश्न सुटत नसतात तर अधिक वाढत जातात. दाविदराजाने आपल्या संघर्ष पूर्ण जीवनात वेळो वेळी देवाचे साहाय्य अनुभवले मोठं मोठी संकटे व आव्हाने असताना देवाने अद्भुत रित्या त्यास जय दिले.त्यामुळे तो भयभीत ना होता, विचलित न होता, स्वतःच्या जीवाला धीर देत अगदी शांतपणे देवावर भिस्त टाकून स्वस्थ राही. प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात संकटे येतात परंतु जगिक बुद्धीच्या लोकांपेक्षा विश्वासणारे अधिक सहजतेने संकटाना सामोरे जातात व मात करितात कारण ते देवावर आपली भिस्त ठेवतात. प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझा बळकट दुर्ग व सामर्थशाली बाप आहेस,दाविदाप्रमाणे मलाही तुझ्या ठायी स्वस्थ जीवन लाभुदे. येशूच्या नावाने मागतो,आमेन . रेव्ह.कैलास [अलिशा ] साठे .

आजची आत्मिक भाकर

 वचन: अब्राहामाने दुसरी बायको केली तिचे नाव कटूरा होते. उत्पत्ती २५:१. पवित्र शास्त्र अब्राहामाच्या दुसऱ्या लग्ना बद्दल जास्त माहिती देत नाही. रिबकाच्या मृत्यू नंतर त्याने कटूरा नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले व त्याला सहा मुले झाली इतकेच सांगितले आहे. कारण पवित्र शास्त्र देवाच्या तारणाच्या योजनेला अधिक महत्व देते. तरी इतर लेखातून काही माहिती उपलब्ध आहे… Continue reading आजची आत्मिक भाकर

Untitled

   वचन: तू आपले कार्य यहोवाच्या स्वाधीन कर म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. नीतिसूत्रे १६:३ तुम्ही कोणीही आसा जसे “गरीब, श्रीमंत, सबळ, दुर्बल, सत्ताधीश आथवा अतिसामन्य. तुम्हाला जर तुमचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले अनुभवायचे असेल तर तुमचा जीवनक्रम, तुमच्या योजना परमेशवराच्या हाती सोपवून द्या त्याच्या अधिकाराला व सामर्थ्याला ओळखून त्याच्या इच्छेला मान देऊन जीवनातील… Continue reading Untitled

पौलाच्या देहातील काटा

प्रभू येशूची कृपा वचन: माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते.  २करिंथ १२:९ प्रास्ताविक: माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. हे प्रभू येशूचे शब्द पौलाला काय शिकवत आहेत. प्रभू येशू त्याला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. हे जर समजून घ्यायचे असेल तर, मग आपल्याला… Continue reading पौलाच्या देहातील काटा

रोजची आत्मिक भाकर उत्पत्ती १५:१६.

प्रभू येशू येणार  वचन: तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. उत्पत्ती १५:१६. परमेश्वर न्यायी आहे. देव अमोरी लोकांच्या पापाबद्दल सांगतो कि, हे लोक लैगिक संबंधाबाबत कोणतेच नीतिनियम पाळणारे नाहीत, समलिंगी संबंध, पशूगमन, व्यभिचार या गोष्टी ते अगदी बिनदिक्कत करीत आहेत. लोक मूर्तिपूजा करताना स्वसंतानाला अग्निमध्ये जाळून… Continue reading रोजची आत्मिक भाकर उत्पत्ती १५:१६.

रोजची आत्मिक भाकर.

हागार व इश्माएल  वचन:   मग यहोवाचा दूत तिला म्हणाला, पहा, तू गरोदर आहेस व मुलाला जन्म देशील; आणि तू त्याचे नाव इश्माएल ( म्हणजे देव ऐकतो) असे  ठेव कारण यहोवाने तुझे दुःख ऐकून घेतले आहे. उत्पत्ती १६:११. अब्राम व साराय यांनी देवाच्या मार्गदर्शनानुसार नाही; परंतु त्यांच्या मनाने निर्णय घेऊन हागार ह्या मिसरी दासीला त्यांच्या जीवनात… Continue reading रोजची आत्मिक भाकर.

रोजची आत्मिक भाकार

तुमचा मोठा  आशीर्वाद  वचन: मी तुला अत्यंत फलसंपन्न करीन; तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझं पासून राजे उत्पन्न होतील. उत्पत्ती १७:६ देवाने अब्राहामाला दिलेल्या आशीर्वादानं मध्ये हा खूप महत्वाचा आशीर्वाद आहे. कारण आपण सर्व ख्रिस्ती या आशीर्वादाचे भागी आहोत. देवाने अब्राहामाला अभिवचन दिले कि त्याच्यापासून राजे उत्पन्न होतील. याचा अर्थ तो आपला आत्मिक पिता असल्यामुळे… Continue reading रोजची आत्मिक भाकार

Optimized by Optimole