वचन: तू आपले कार्य यहोवाच्या स्वाधीन कर म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. नीतिसूत्रे १६:३
तुम्ही कोणीही आसा जसे “गरीब, श्रीमंत, सबळ, दुर्बल, सत्ताधीश आथवा अतिसामन्य. तुम्हाला जर तुमचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले अनुभवायचे असेल तर तुमचा जीवनक्रम, तुमच्या योजना परमेशवराच्या हाती सोपवून द्या त्याच्या अधिकाराला व सामर्थ्याला ओळखून त्याच्या इच्छेला मान देऊन जीवनातील सर्व निर्णय घ्या.
दुष्ट व गर्विष्ट व्यक्तीचा देवाला वीट येतो कारण देवाला पृथ्वीवर स्वैराचार नको आहे, धन्य तो पुरुष, जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. स्तोत्र १:१
या वरून लक्षात येते कि आपण पापी, दुर्जन व धर्मनिदक लोकांचा सल्ला कधीही घेऊ नये. आपले संकल्पव
योजना देवाला आवडणाऱ्या असाव्यात म्हणजे तो त्या सिद्धीस नेतो.
देवाचा सेवक विल्यम केरी म्हणतो,“प्रभू मध्ये तुम्ही मोठी स्वप्ने पहा, मोठ्या योजना करा, परमेश्वर देव त्या सिद्धीस नेईल”.
प्रार्थना: हे देवा माझे सर्व संकल्प मी तुझ्या इच्छेच्या स्वाधीन करतो, मला यशस्वी कर.येशूच्या नावाने मागतो,आमेन.
रेव्ह. कैलास [अलिशा ] साठे
वचन: जे सर्व त्याच्या ठायी आश्रय घेतात ते सुखी! स्तोत्र २:१२.
स्तोत्र २ मध्ये राष्ट्रातील लोक देवाच्या सामर्थ्याला त्याच्या सनातन अस्तित्वाला समजून न घेता विद्रोही पवित्रा घेतात. परंतु त्यांचे असे करणे आत्मघात करण्यासारखे आहे.क्षणभंगुर मनुष्य आणि सनातन देव यांची तुलना काय? पण गर्वीष्ठना हे कळत नाही.त्यामुळे दुःखमय जीवन त्याच्या वाट्याला येते.परंतु त्याला शरण जाणारे, त्याच्या तारणदाई योजनेवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाचे पुत्र होण्याचे भाग्य लाभते. दावीद राजा म्हणतो, ” यहोवा माझे बळ व ढाल आहे; माझ्या हृदयाने त्याच्यावर भरोसा ठेवला आहे आणि मी साहाय्य पावलो आहे.म्हणून माझे हृदय फार उल्हासते आणि मी आपल्या गायनाने त्याची स्तुती करीन.”स्तोत्र २८:७. ख्रिस्ताला शरण गेल्याने काय आशीर्वाद प्राप्त होतात व कशा प्रकारचे सुखी जीवन मिळते हे दावीद राजाच्या या अनुभवावरून आपण समजू शकतो.ख्रिस्त हाच आपल्या सुखाचा श्रोत आहे हे येथे समजून घ्या.
प्रार्थना: स्वर्गीय पित्या मनुष्य तो काय कि त्याने बढाई करावी, तूच खरा स्तुतीस पात्र व भजण्यास योग्य आहेस. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही.तू माझी ढाल व कवच आहेस, आनंदाने तुझी सेवा मला करता यावी म्हणून माझ्यावर कृपा कर.येशूच्या नावाने मागतो, आमेन
Rev. Kailas [Alisha] Sathe