प्रसन्न जीवन वचन: तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तु बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुजवर आहे करीता तू त्यास दाबात ठेव. उत्पत्ती ४:७. देवाने काईनला व त्याच्या अर्पणाला नाकारले कारण त्याची वर्तणूक चांगली नव्हती पण देव माणसावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो हे… Continue reading “आनंदी जीवनाचा खरा मंत्र” उत्पत्ती ४:७.
ABOUT US
“आशीर्वादाचे गुज ” उत्पत्ती ५:२४.
आशीर्वादाचे रहस्य वचन: हनोख देवाच्या समागमे रहात असे, देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. उत्पत्ती ५:२४. हनोख तीनशे वर्ष देवाच्या समागमे चालला; तो संन्याशी नव्हता, तर संसार प्रपंच चालवणारा होता. तीनशे वर्ष देवाबरोबर चालत असताना त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. उत्पत्ती ५:२२ याचा अर्थ आपणही देवा बरोबर चालू शकतो. पण आधी देवाबरोबर… Continue reading “आशीर्वादाचे गुज ” उत्पत्ती ५:२४.
प्रार्थना व कार्यसिध्दी, उत्पत्ती २०:१७.
प्रार्थना वचन: मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख त्याची बायको व त्याच्या दासी यास बरे केले, आणि त्यास मुले होऊ लागली. उत्पत्ती २०:१७. देव अबीमलेखाला स्वप्नाद्वारे सांगतो की तू माझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुला सावध करीत आहे.वचन ६. पण वरील वचनावरून लक्षात येते की देवाने अबीमलेख त्याची बायको… Continue reading प्रार्थना व कार्यसिध्दी, उत्पत्ती २०:१७.
“गर्वाचे परिणाम” उत्पत्ती १०:९.
देव विरोधी वचन: तो यहोवा समोर बलवान पारधी होता; म्हणून निम्रोदा सारखा यहोवासमोर बलवान पारधी, अशी म्हण पडली आहे. उत्पत्ती १०:९. यहोवा समोर बलवान पारधी याचा खरा अर्थ आहे; ‘देवा विरुध्द’ तो देवाला न भिणारा होता. तो स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर त्याचे साम्राज्य वाढवू पाहत होता. अवघ्या पृथ्वीवर त्याला स्वामित्व स्थापित करायचे होते. बाबेलचा बुरुज हि… Continue reading “गर्वाचे परिणाम” उत्पत्ती १०:९.
“शापाचे कारण” उत्पत्ती ९:२३.
आशीर्वाद व शाप वचन: तेव्हा शेम व याफेथ यांनी वस्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली, त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. उत्पत्ती ९:२३. देव आपल्याकडून सुज्ञ व शिस्तबद्ध जीवनाची मागणी करितो. देवाची आज्ञा आहे कि,’आपल्या आई वडिलांचा मान राख म्हणजे जो देश मी तुला देत आहे त्यात चिरकाळ राहशील, निर्गम २०:१२. याचा अर्थ आई वडिलांचा मान राखण्यावर आपले आशीर्वाद अवलंबून आहेत. आपण अनेकदा आपल्या आईवडिलांना योग्य मान देत नाही. त्यांच्याशी उद्धटपणे वागतो व आपल्या वागण्याचे समर्थनही करतो. जसे, ते योग्य वागत नाहीत मग मी त्यांच्याशी का योग्य वागू ? परंतु देवाने आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे कि आपल्या आई वडिलांचा मान राख त्याने असे सांगितले नाही कि विशिष्ट परिस्थितीत अथवा त्यांच्या स्वभावानुसार त्यांचा मान राख, म्हणून आमचे आई वडील कसेही असोत त्यांचा मान राखला पाहिजे. नोहा द्राक्षरस पिवून झिंगला हे त्याचे कृत्य योग्य होते का? नीती २०:१ व हब :२:१५. सांगते नोहाचे हे वागणे योग्य नव्हते. तरी त्याचा पुत्र हाम याने त्याचा मान राखणे अगत्याचे होते. त्याने बापाची नग्नता पाहिली व त्याच्या दोन्ही भावास त्या बद्दल सांगितले. त्याचे ते वागणे आपल्या बापाची लाज काढण्यासारखे होते. याउलट शेम व याफेथ यांनी अगदी सुज्ञता दाखवत आपल्या बापाचा मान राखला. त्याचे प्रतिफळ त्यांना लगेच मिळाले. नोहा जागा झाल्यावर शेम व याफेथ त्याच्याशी कसे वागले व हाम कसा वागला हे जेव्हा त्याला कळाले, तेव्हा त्याने हामच्या वंशाला गुलामीचा शाप दिला व शेम व याफेथ यांच्या वंशाला आशीर्वाद दिला, ज्याचे परिणाम आजही दिसतात. सुज्ञ व शिस्तबध्द जीवन आशीर्वाद मिळवते तर बेशिस्त जीवन शाप मिळवते हे आपण येथे लक्षात घेतले पाहिजे. आपल्यापेक्षा थोरांशी आदराने वागा, आई वडील यांचा मान राखा, जीवन सावधपणे वागवायचे आहे हे नेहमी लक्षात असू द्या . बेदरकारपणे लागल्याने शाप येऊ शकतात. प्रार्थना: हे प्रभू मी सुज्ञतेचे व शिस्तबध्द जीवन जगण्यास समर्थ व्हावे म्हणून तू मला तुझा पवित्र आत्मा दिला यासाठी मी तुझे आभार मानतो. तरी मला पवित्र आत्म्याचे ऐकण्यास व तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास मला कृपा पुरव येशूच्या नावाने मागतो, आमेन.
स्वप्नांना सहज घेऊ नका . उत्पत्ती २०:६
स्वप्नांना अर्थ असतो वचन: मग देवाने त्याला स्वप्नात म्हटले, होय, मला ठाऊक आहे की, तू आपल्या हृदयाच्या शुध्दतेने हे केले.आणि माझ्या विरुद्ध पाप करण्यापासून मीही तुला आवरले, म्हणूनच तुला मी तिला स्पर्श करू दिला नाही. उत्पत्ती २०:६. अब्राहामाने पुन्हा चूक केली,जिवाच्या भीतीने गरार येथील लोकांना त्याची बायको सारा हिची, “बहीण”अशी ओळख करून दिली. त्यामुळे गराराचा… Continue reading स्वप्नांना सहज घेऊ नका . उत्पत्ती २०:६
वेदी व तिचे महत्व. उत्पत्ती ८:२०.
वचन: नोहाने यहोवा साठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुध्द पशूतुन व सर्व शुध्द पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होमार्पणे अर्पिली, उत्पत्ती ८:२०. वेदी प्रस्तावना: महाजलप्रलयातून बाहेर आल्याबरोबर नोहाने पहिले काम केले ते म्हणजे देवाची उपकारस्तुती. त्याने वेदी बांधली व त्या वेदीवर शुध्द पशू व पक्षातून काही पशु पक्षी घेतले व त्यांचे होमार्पणे केली. त्याच्या या… Continue reading वेदी व तिचे महत्व. उत्पत्ती ८:२०.
यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.
वचन: तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तुला देवो आणि तुझे सर्व संकल्प परीपूर्ण करो. स्तोत्र: २०–४. प्रस्तावना: लढाईला जाण्या अगोदर दावीद राजा देवाच्या मंदिरात प्रार्थना करत असता याजक व उपस्थित लोक त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत हि इच्छा व्यक्त करीत आहेत कि देवाने त्याची प्रार्थना ऐकावी व त्याचे सर्व संकल्प सिध्दीस न्यावेत. हे स्तोत्र दावीद राज्याच्या जीवनावर… Continue reading यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.
भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५
वचन:- कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्याकडून आपण अब्बा बापा, अशी हाक मारतो तो दत्तक पनाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. रोम ८:१५. प्रस्तावना: जगातील सर्व माणसे देहाच्या आधीन आहेत. देहाच्या वासना त्यांच्यावर राज्य करितात. ह्या वासना मानवाला पापाच्या अधीन ठेवतात, सैतानी पाशास कारणीभूत होतात व माणसाचे जीवन अशांतीने, दुःखाने व… Continue reading भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५
देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,
वचन: देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही, न खाल्याने आपण कमी होत नाही व खाल्याने आपण अधिक होत नाही. १करिंथ ८:८ ख्रिता मध्ये एक शरीर एकमेकांसाठी जगा: करिंथ येथे त्याकाळी खूप मूर्तिपूजा चालत असे, काही विशेष प्रसंगी सामुदायिक भोजन समारंभ आयोजित केले जात असत. संपूर्ण शहर आशा कार्यक्रमात भाग घेत असे. काही विद्वान ख्रिस्ती… Continue reading देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,