ख्रिस्ती लोकांतील भेदभाव, रोम १०:१२

भेदभाव व ख्रिस्ती जीवन

वचन: देव भेदभाव करत नाही. कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करितात त्या सर्वास पुरवठा करण्या इतका तो संपन्न आहे. रोम:- १०: १२

ख्रिस्ती सहभागिता

मानवी व्यवहारा  मध्ये सर्वत्र भेदभाव अनुभवयास येतो. जसे जाती भेद, धर्म भेद,आप्त भेद, प्रांत भेद, भाषा भेद, लिंगभेद  काळा गोरा भेद, हि यादी खूप मोठी होऊ शकते. काहींना तर  कुटुंबातहि  भेदभाव सहन करावा लागतो. कारण ती मानवी प्रवृत्ती आहे. परंतु बाइबल भेदभावाचे समर्थन करत नाही ख्रिस्तामध्ये सर्व भेदभाव संपतात. संत पौल म्हणतो, देव जर एक आहे तर तो जगभरातील सर्व मानवांचा आहे. रोम ३-२९, पुढे तो गलतीकरांच्या मंडळीला म्हणतो ख्रिस्तामध्ये जातपात, वंश भेद, लिंग भेद ,गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव नाही, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्व एक आहा आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे  आहा तर तुम्ही अब्राहामाची संतान व वचनप्रमाणे  वतनदार आहा.” गलति ३-२८, कल ३-११. 

त्या काळात यहुदी स्वतःला खूप उच्च समजत कारण ते अब्राहामाचे वंशज होते, सुंतेचा करार व देवाने दिलेले नियम शास्र, त्यामुळे ते स्वतःला देवाची प्रजा समजत व इतरांना तुच्छ लेखत.  प्रेषित १०: २८-२९. स्रियांची स्थिती तर अतिशय दयनीय होती, जगभरातील  प्रत्येक समाजात त्यांचे शोषण होत असे. गुलाम व गरिबांना सामाजिक, राजकीय अथवा आर्थिक असे कुठलेच अधिकार  नव्हते. आशा भेदभावाने भरलेल्या सामाज्यात जे भरडले जात होते आशांना  देवाने येशू ख्रिस्तामध्ये एक केले व त्यांना पवित्र प्रजा माझे स्वतःचे लोक राजकीय याजकगण अशी नवी ओळख दिली. १ पेत्र २: ९.

 म्हणून ख्रिताला अनुसरणाऱ्या समाजामध्ये भेदभाव असू नयेत, तर एकमेकांना प्रितीने अंगीकारणे अभिप्रित आहे. जसे ख्रिस्ताने सर्वांना अंगिकारले तसे त्याच्या अनुयायांनी सर्वाना अंगिकारले पाहिजे तरच आम्ही त्याचे साक्षी आहोत.  ख्रिस्त सर्वांसाठी आहे तो सर्वाना प्रेमाने व हर्षाने आशीर्वाद देण्यास संपन्न  आहे तसेच त्याच्या प्रजेनेही असावे हीच त्याची इच्छा आहे. जो जो त्यास शरण गेला त्या सर्वास त्याने भेदभाव ना करता भरभरून  दिले.  जक्कयाला तारण मिळाले, व्यभिचारी स्त्रीला क्षमादान व नवजीवन मिळाले.विधवेच्या मुलाला मृत्यूतून जीवन मिळाले. पक्षघाती मनुष्याला आरोग्य लंगड्यास पाय आंधळ्यास डोळे कुष्टरोग्यास शुद्धता मिळाली. असेच त्याच्या प्रजेने सर्वाना सर्वकाही देण्यासाठी संपन्न असावे हीच त्याची इच्छा आहे. 

प्रार्थना : प्रभू येशू  मी तुझ्या  आगापे प्रीतीसाठी तुला धन्यवाद देतो. आज माझ्या पापाची क्षमा करून माझे तारण केले म्हणून मी तुझे आभार मानतो. जसे तू मला अंगिकारले तसे मीही  इतरांना अंगिकारावे असे कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक आमेन

REV KAILAS  (ALISHA) SATHE

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole