ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८

पवित्र आत्मा 

वचन: पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेषित १:८

पेंटिकॉस्ट

जुन्या कराराच्या काळात देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांवर येत असे नियोजित कार्य करून पुन्हा जात असे. तेव्हा विशिष्ट्य काळात विशिष्ट्य व्यक्तीवर विशिष्ट्य कार्यासाठी आत्म्याचे सामर्थ्य प्रगट होत असे. जसे निवास मंडपाच्या कलाकुसरीच्या कामांसाठी देवाचा आत्मा बसलेलावर उतरला, निर्गम ३१:३-५. शास्त्यांच्या काळात इस्राएलाच्या सोडवणुकी साठी देवाचा आत्मा निवडलेल्या व्यक्तीवर येत असे, शास्ते ३:९-१०. दावीद व संदेष्ट्ये यांच्या बाबतीत हि आपण हेच पाहतो. 

ख्रिपू ४०० वर्षांपूर्वी योएल संदेष्ट्या द्वारे देवाने संदेश पाठवला होता कि शेवटल्या दिवसात असे होईल कि परमेश्वर यहोवा आपल्या आत्म्याचा मनुष्यमात्रावर वर्षाव करिन त्यांचे पुत्र  कन्या संदेश देतील तेव्हा वृद्धास स्वप्ने पडतीलतरुणास दृष्टांत होतीलत्यांचे दास  दासी यांच्यावरहि मी आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करिनयोएल :२८२९

योएल संदेष्ट्याची हि भविष्यवाणी २००० वर्षांपासून पूर्ण होताना दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून जिवंत होण्याने एका नव्या युगाची एका नव्या कार्याची सुरुवात झाली. पवित्र आत्मा त्याच्या प्रमुख बारा शिष्यांसहित १२० शिष्यांवर उतरून आला, कारण त्यांना, सर्व राष्ट्रातील लोकांना सुवार्ता सांगायची होती, शिष्यत्व स्वीकारणाऱ्यांना शिक्षण देऊन पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यायचा होता. हे कार्य तेंव्हाही सोपे नव्हते आजही नाही येथे सर्व राष्ट्रातील लोकांना अंधकारातून प्रकाशात आणायचे, सैतानाच्या अधिकारातून मुक्त करायचे, पवित्र जीवनाद्वारे देवाच्या अस्तित्वाची सामर्थ्याची जगात साक्ष द्यायची. या कार्या साठी देवाने ख्रिस्ताच्या अनुयायांवर पवित्र आत्मा ओतून दिला प्रेषित :३१. तेव्हा त्यांनी येरुशलेमेतून उद्धाराची सुवार्ता सांगायला सुरुवात केली तीने वाऱ्याच्या वेगाने पृथ्वी व्यापून टाकली. आज आपण त्याच सेवेचे सहभागी आहोत. आजही जे ख्रिस्ताच्या सेवेत आहेत त्यांना पवित्र आत्मा सामर्थ्य देतो.

पण, येथे एक मुद्दा समजून घ्यायचा आहे तो म्हणजे, धर्माने ख्रिस्ती असणाऱ्यां सर्वांनाच पवित्र आत्माचे सामर्थ्य प्राप्त नाही. कारण देवाचे कार्य धर्माच्या चौकटीत मर्यादित नाही किंवा धर्मासाठी नाही, तर ते सर्व सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. मानवांच्या तारणासाठी [ मुक्तीसाठी] आहे. म्हणून पवित्र आत्मा मिळवून; उध्दार प्राप्त करून; स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हायचे असेल तर ख्रिस्ती धर्मातील व्यक्तीसहीत जगातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून पश्चाताप करून, प्रभू येशूला जीवन समर्पित करून त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या नावात बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे. प्रेषित २:३८-३९. 

प्रार्थना: हे प्रभू येशू उद्धाराच्या सुवार्तेच्या कार्यासाठी तू मला निवडले म्हणून मी तुझे आभार मानतो. जगातील सर्वांचा उद्धार कर तुझ्या शांतीने हे जग भरून जाऊदे. येशूच्या नावाने मागतो. आमेन.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole