जागतिक तापमान वाढ [ग्लोबल वॉर्मिंग ], उत्पत्ती :१:२८.

 ग्लोबल वॉर्मिग 

वचन: फलद्रुप व्हा, बहुगूणीत व्हा पृथ्वी व्यापून टाका ती सत्तेत आणा
उत्पत्ती ::२८.

देव निर्मिती

देवाने प्रत्येक सजीव वनस्पती, जलचर, पशु पक्षी यांना फलद्रुप बहुगूणीत होण्याचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद देवाच्या पवित्र इच्छेचा उच्चार आहे जो प्रत्येक सजीवात पुनरुत्पत्तीचे सामर्थ्य आहे. या आशीर्वादाच्या सामर्थ्याने आम्हामध्ये पुनरुत्पत्तीचे बीज उत्पन्न झाले. देवाने हिरवळ, वनस्पती, फळझाडे निर्माण करताना आपली पवित्र इच्छा घोषित केली कि, ” हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळ देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो.”  सुंदर निसर्ग, पशु पक्षी जलचर हा देवाने मानवाला दिलेला अनमोल आशीर्वाद आहे. सर्वानीच वाढावे फलद्रुप, बहुगूणीत आशीर्वादीत व्हावे हि देवाची पवित्र इच्छा आहे.

ग्लोबल वॉर्मिग

पण जर आपण निसर्ग वन्य जीवन उध्वस्त करीत आहोत तर आपण देवाच्या पवित्र इच्छेला विरोध करीत आहोत. मानवाकडून घडणारे हे महा पातक आहे. देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपात बनवले ते यासाठीच कि आपण पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधित्व करावे. संपूर्ण निसर्ग पशु पक्षी जलचर यांची काळजी घ्यावी पण आज मानव स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण जीवसृष्टीचा स्वतःचाही नाश ओढवून घेत आहे आश्या अवस्थेत चर्च फक्त बघ्याची भूमिका घेत आहे! किंवा फार तर फार, सी रूम मध्ये इकॉलॉजिवर सेमिनार करत आहे. समेटाच्या वचनाची सेवा हि फक्त 
सेमिनार घेऊन होणार नाही तर चर्चला ग्रास रूट वर काम करावे लागेल. आदामाच्या द्वारे जो शाप आला तो फक्त मानवावर नाही तर भूमी सर्व जीवसृष्टी त्याने प्रभावित झाली
सर्व सृष्टी शापाचा भार वाहत आहे. रोम :२२. म्हणून चर्च द्वारे वन्यजीव पशु पक्षी जलचर संपूर्ण निसर्ग आशीर्वादित व्हावा यात काहीच गैर नाही. आदामाला सत्ता चालवण्याचा अधिकार दिला होता पण पतना आगोदर जी सत्ता तो चालवत होता ते खरी सत्ता चालवणे आहे. स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग हे पापाच्या प्रभावा खाली असलेले जीवन देर्शविते. सर्वांना आशीर्वादित फलद्रुप होण्याचा अधिकार देवाने दिला आहे. देवाने निसर्गाला दिलेल्या आशिर्वादाला आडवे येणारे देव विरोधी आहेत.

पर्यावरण संवर्धन

प्रार्थना: हे प्रभू येशू तू आपला प्राण देऊन माझा देवाशी समेट घडून आणला म्हूणन मी तुझे आभार मानतो. आता हि समेटाची सेवा योग्य प्रकारे करण्यास मला साहाय्य कर. तुझी सर्व सृष्टी पुन्हा उध्दाराचे आशीर्वाद प्राप्त करो. चर्चला पुन्हा सामर्थ्य दे की त्याने जगाला पर्यावरण संवर्धनाचा आध्यात्मिक दृष्टीकोन द्यावा.येशूच्या नावाने मागतो म्हणुन तू ऐक. आमेन.

रेव्ह . कैलास [आलिशा ] साठे 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole