तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

वचन: जर परमेश्वर घर बांधीत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ. स्तोत्र १२७:

 

कुटुंब

प्रस्तावना: स्तोत्र कर्त्याने प्रथम कुटुंबाच्या नगराच्या सशक्तीकरचा 
मुद्दा उपस्थित केला आहे. जसे घर कुटुंबाचे दर्शक आहे तसे नगर हे सामाजिक सहजीवनचे किंवा समाज व्यवस्थेचे दर्शक आहे. कुटुंबाचे सशक्तीकरण नगराचे म्हणजे समाजाचे सशक्तीकरण हे देवाशिवाय श्यक्य नाहीहा विचारहिब्रू कवितेच्या गुणधर्माप्रमाणे 
प्रगतिशील होत गेलेला आपण येथे पाहू शकतो.

घर हे कुटुंबाचे दर्शक आहे, कुटुंबाला समाज व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्याला तुम्ही समाज व्यवस्थेचा पाया म्हणा, केंद्र बिंदू म्हणा, किंवा समाजाला नियंत्रित करणारा, त्याला घडवणारा दिशा देणारा असा सामर्थ्यशाली घटक म्हणा. जितके कुटुंब सुदृढ, निकोप, सुसंकृत, एकजीन्स, तितका समाज सदृढ, निकोप, सुसंकृत एकजीन्स. जितके कुटुंब प्रगतिशील, गतिमान समर्थ तितका तो समाज देखील प्रगतिशील, गतिमान, समर्थ समजला जातो. समाजाचे प्रतिबिंब कुटुंबात दिसते कुटुंबाचे समाजात दिसते. याचा अर्थ जर आपण एका गतिमान प्रगतिशील समर्थ समाजाची अपेक्षा करीत असू तर आमची कुटुंब आम्ही गतिमान, प्रगतिशील समर्थ केली पाहिजेत. या साठी स्तोत्र १२७ आम्हाला मार्गदर्शन करीत आहे.

घर बांधणे नगर रक्षिणे म्हणजे काय ?: घर बांधणे म्हणजे विटा, वाळू सिमेंट अथवा अशी कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री वापरून राहण्याजोगी इमारत बांधणे नव्हे, किंवा नगराचे रक्षण म्हणजे फक्त बाह्य शत्रुंपासून नगराला रक्षिणे नव्हे , कारण देव आम्हाला येथे 
फक्त भौतिक साधनसामुग्री बद्दल बोलत नाही.पण यात विशेष करून घराला घरपण देण्या बद्दल,बोलत आहेव सामाज्याला एकजिन्सी, प्रगतशील, समृध्द समाज बनवण्याबद्दल देव बोलत आहे.देवाशिवाय खऱ्या अर्थाने आपण शांतीपूर्ण, आनंदायी, ऐश्वर्ययुक्त कौटुंबिक जीवन जगू शकत नाही.नगराच्या रक्षणासाठी आपण पहारेकरी नेमू शकतो पण त्या पहारेकऱ्यांना चाणाक्ष बुद्धी देवच देतो.शत्रूंच्या मनात दहशद देवच निर्माण करितो अंतर्गत सुव्यवस्था म्हणजे सामाजिक ऐक्य 
देवच राखतो.म्हणून नगराचे रक्षण असो अथवा घराचे बांधणे असो देवाच्या आशिर्वादाशिवाय शक्य नाही.याबरोबरच आपल्या जीवनातील प्रत्येक जबाबदारी मग ती कितीही मोठी असो आपण देवाच्या आधींन राहून त्याच्या कृपेने पूर्ण करू शकतो.

घरावर   नगरावर देवाचा हक्क आहे: देव आपल्या वैयक्तिक सामाजिक जीवनाशी फक्त जोडलेलाच नाही तर त्याचा आपल्यावर सरळ हक्क आहे. घराचा प्रमुख म्हणून जसा आपला हक्क असतो तसा त्याचा आपल्या घरावर नगरावर त्याचा हक्क आहे.आपण आपल्या कुटुंबाबद्दल जशा योजना करतो आपल्या इच्छेनुरूप कुटुंबाला चालवू इच्छितो तसा देवहि आपल्या बद्दल योजना करतो आपल्या कुटुंबाला नगराला चालवू इच्छितो. हे आपण कशाच्या आधारवर समजून घ्यायचे किंवा हे नेमके काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर देव कुटुंब किंवा देव समाज ह्यांचा संबंध समजून घ्यावा लागेल. समाज हा व्यक्तींचा बनलेला असतो त्या अनुशंघाने विचार केल्यास समाजाचा प्रथम घटक व्यक्ती आहे. देवाने प्रथम पुरुष निर्माण केला ज्याला आपण समाजाचा प्रथम घटक म्हणू शकतो. त्याच्या पासून नारी उत्पन्न केली त्यांना एकत्र आणले येथे विवाह संस्थेची स्थापना केली असे म्हणू शकतो. त्यांना मुले होण्याच्या क्षमता दिल्या त्यामुळे त्यांना मुले झाली, म्हणजे पती पत्नी त्यांची मुले असे कुटुंब निर्माण झाले ती वाढत गेली त्यातूनच समाजाची निर्मिती झाली.म्हणजेच सामाज्याचा निर्माता देखील देवच आहे हे निर्विवाद सत्य आपण समजून घेतले पाहिजे.

 देवाचा आपल्या वैयक्तिक, कौटूंबिक, सामाजिक जीवनावर हक्क आहे म्हणूनच त्याने मानवाला जीवन जगण्याचे तत्व दिले आहे. जो व्यक्ती, जे कुटुंब, जो समाज त्याचे तत्व पाळतो त्यांना तो भरभरून आशीर्वाद देतो.

देवाच्या इच्छेला अनुसरल्याने घर समाज सुदृढ होतो: आज कुटुंबात किंवा समाजात जी दुरावस्था दिसत आहे त्याचे कारण हेच आहे कि 
देवाच्या उच्च उद्देशांना मानव कधीच समाजाला नाही. अगदी सुरवातीपासून अवज्ञापालन करून मानवाने अनेक संकटे आपणावर ओढवून घेतली आहेत. देवाच्या मार्दर्शनाला समजून घेता त्याच्या मूळ पापी प्रवृत्तीला त्याने न्यायी ठरवत आपला भौतिक स्वार्थ साध्य करण्याला नेहमीच प्राधान्य दिले. त्यातूनच खोटे धर्म सिद्धांत तत्वज्ञान रूढ होत गेले. म्हणून आम्हाला पुन्हा देव त्याच्या शिकवणीकडे वळले पाहिजे. मुले जे देवाने आम्हाला दिलेले धन आहे, ज्यावर त्याचा अधिकार आहे ते त्याच्या इच्छेनुरूप वाढले पाहिजेत. यामुळे ते पुढे चालून कुटुंबाचे समाजाचे आधारस्तंभ होतील. म्हणून अनुवाद : सांगते, “तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी आज मी तुला समजावून सांगत आहे त्या तू आपल्या हृदयात बिंबिव. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव आणि घरी आसता, मार्गाने चालत आसता, निजता उठता त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्याभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या 
घराच्या बाह्यावर आपल्या फाटकावर त्या लिही.” देवा विषयीच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याला समजल्याने त्याच्या समोर योग्य आचरण केल्याने त्याची कृपा आम्हावर होईल  आपले घर  आपला समाज मजबूत होईल.

 प्रार्थना: परमेश्वर पित्या तूच माझ्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहेस, मी गर्व नकरता नम्रतेणे तुझ्यावर भार टाकून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे कर. माझ्या जीवनात शान्ति, कौटुंबिक स्वास्थ, तुझ्याकडून येणारे ऐश्वर्य मला लाभू दे, येशूच्या नावाने मागतो,आमेन.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole