देवाची नावे, आशीर्वाद व रहस्ये नवा करार
थिऑस : थिऑस हे नाव देवाच्या श्रेष्टत्वाला दर्शविते, हे नाव एलोहीम / याव्हे या जुन्याकारारातील देवाच्या नावांशी साम्य दाखवते. थिऑस म्हणजे “थोर देव” तीत :२:१३
क्युरिऑस : क्युरिऑस म्हणजे “प्रभू”. प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याची खात्री झाल्यावर थोमा प्रभू येशू ख्रिस्ताला “माझा प्रभू माझा देव ” असे संबोधतो. योहान २०:२८. हे नाव देवाला आपली त्याच्या प्रती आदरार्थी वृत्ती दाखवण्यासाठी वापरले जाते. आता तूच माझा सर्वस्व, तुला मी शरण येतो, तुझ्या आधीन राहून जीवन जगतो असा भाव हे नाव प्रगट करते.”आदोनाय” या जुन्या करारातील नावाशी साम्य असलेले हे नाव आहे .
देस्पॉतेस : ‘धनी, स्वामी, सार्वभौम प्रभू’ अशा अर्थाने या नावाला उच्चारिले जाते. ख्रिस्त जन्माची सुवार्ता देवदूतांनी मेंढपाळांना सांगताना म्हटले,’ आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. लूक २:११ ,प्रेषित ४:२४, २पेत्र २:१, प्रकटी ६:१०
अब्बा : प्रभू येशू ख्रिस्ताने शोमरोनी स्त्रीला मार्गदर्शन करताना देवाला बाप असे संबोधले, तो म्हणाला,”खरे भक्त आत्म्यात व खरेपणात योहान ४:२३ आपणही देवाला आपला पिता अशी हाक मारतो कारण बायबल सांगते,”पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हांस मिळाला नाही तर ज्याच्याकडून आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांस मिळाला आहे.रोम ८:१५
इम्मानुएल : देवदूताने योसेफाला मार्गदर्शन करताना असे म्हटले की,”पाहा कुमारी गर्भवती होईल व ती मुलाला जन्म देईल, आणि त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवतील, या नावाचा अर्थ आमच्या संगती देव असा आहे. मत्तय १:२३ हे नाव प्रभूच्या आम्हांबरोबर सदैव असण्याला दर्शवते.
येशू : येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा, पापापासून सोडवणारा, वाचवणारा, वचन सांगते, “आणि ती मुलाला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील”. मत्तय १:१६
ख्रिस्त: ख्रिस्त हा शब्द ग्रीक भाषेतील ख्रिस्तोस ह्या शब्दापासून आलेला आहे, याचा अर्थ आहे अभिषिक्त, निवडलेला, विशेष कार्यासाठी वेगळा केलेला. दुसरे असे की हा शब्द; हिब्रू भाषेतील मसीहा ह्या शब्दाशी समानार्थी आहे. याचा अर्थ ख्रिस्त म्हणजे जगाच्या तारणासाठी अभिषिक्त मसीहा. मत्तय :१६:१६.
टीप : सर्व संदर्भ पंडिता रमाबाई यांच्या भाषांतरातून घेतले आहेत.
ग्रीक नावे : डेनिस जे मॉक लिखित पवित्र शास्त्र सिद्धांतांचा परिचय या पुस्तकातून घेतले आहेत.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.