देव न्यायी आहे . उत्पत्ती ३:१५.

आद्य सुवार्ता 

वचन: तू स्त्री, तुझी संतति तिची संतति या मध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे टोके फोडील, तू तिची टाच फोडीशील उत्पत्ती :१५.

आद्य सुवार्ता

न्याय: देव न्यायी आहे, तो भस्म करणारा अग्नी आहे इब्री १२:२९.आदाम हव्वेला इतके गौरवी जीवन देऊनही बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका; खाल तर मराल असे स्पष्टपणे सांगूनही त्यांनी देवाशी लबाडी केली. त्यांनी आज्ञाभंगाचे पाप केले पश्याताप तर सोडाच पण स्वतःला न्यायी सिध्द करण्यासाठी ते एकमेकांना दोष देऊ लागले यात त्यांनी देवालाही सोडले नाही. उत्पत्ती :१२. त्यामुळे त्यांच्यावर देवाचा न्याय आला मनुष्य, सर्व पृथ्वी 
शापित झाली

प्रीती: तरी येथे देवाच्या क्रोधावर त्याची प्रीती भारी ठरली. आपल्या निर्मितीचा नाश तो पाहू शकला नाही म्हणून शिक्षा सुनावत असतानाच तिच्या उध्दाराची योजना सुध्दा घोषित केली. म्हणून या वचनाला अद्य सुवार्ता असे म्हणतात. संपूर्ण पवित्र शास्रामध्ये आपण पाहतो कि देवाच्या क्रोधाला देवाची प्रीती आवर घालते. नोहाच्या काळात देवाला मानवाच्या दुष्टतेचा विट आल्यामुळे त्याने संपूर्ण जीव सृष्टीचा नाश करण्याचा निर्णय घेतला तरी त्याच्या प्रितीने त्याच्या क्रोधाला आवर घातल्यामुळे नोहा त्याचे कुटुंब प्राणिमात्रांचा अवशेष त्याने पृथ्वीवर राखला. त्याच्या प्रीतीनेच त्याला आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी देण्यास बाध्य केले, योहान :१६

देवाच्या प्रीतीला योग्य प्रतिसाद द्या : जसा देव आपल्यावर काहीही राखून ठेवता प्रीती करतो तसे आपणही त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने पूर्ण शक्तीने प्रीती करावी अशी अपेक्षा आपल्याकडून करतो, अनुवाद :, मत्तय २२:३७, आणि मार्क १२:३०. देवाच्या प्रीतीला संपूर्ण प्रतिसाद देणे हे ख्रिस्ती म्हणून आपले कर्तव्य आहे.

प्रार्थना: 
हे देवा एदेन बागेत उत्पत्ती :१५ नुसार जी मानवाच्या उद्धाराची योजना तू केली ती तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 
याच्या द्वारे तू सिध्दीस नेलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. हे प्रभू 
येशू तू 
वधस्तंभावर त्या दुष्ट सैतानाचे डोके फोडले. माझ्या साठी स्वप्राण आर्पिला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन मृत्यूवर विजय मिळविला. हे सर्व तू माझ्या उद्धारासाठी माझ्यावरील प्रीती स्तव केले म्हणून मलाही तुझ्यावर पूर्ण मनाने पूर्ण जिवाने पूर्ण शक्तीने प्रीती करण्यास सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole