प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.

वचन: आणि त्यावेळेस असे झाले कि, अबीमलेख त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामाशी बोलले, ते म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे. उत्पत्ती २१:२२.

प्रत्येक पावलावर विजय
अब्राहाम हा भटकंतीचे उपरीपणाचे जीवन जगत होता. अश्या व्यक्तीला स्थानिक समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्याला 
कोणत्याच गोष्टीवर अधिकार नसे. त्यामुळे अश्या व्यक्तीला नेहमीच स्थानिक लोकांच्या कृपेवर जीवन जगावे लागत असे. अशा परिस्थितीत अब्राहामाचे भिऊन वागणे हे स्वाभाविक होते. पण त्याच्या जीवनातील घडामोडींवरून आपण हे समजून घेतले पाहिजे कि जर आपण देवा संगती चालत असू तर भिण्याचे कारण नाही. कारण देव राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवणार आहे. नीतिसूत्रे २१:. चला तर मग जाणून घेऊ की, आशीर्वादाच्या वाटेवरून कसे चालावे.

भिऊ नका : अब्राहाम नेहमीच स्थानिकांच्या समोर भिऊन वागत असे. स्वतः खणलेल्या विहिरींवर ताबा सांगणे तर सोडाच पण परक्या देशात स्वतःच्या पत्नीला लोकांसमोर स्वीकारण्यासहि त्याची हिम्मत होत नव्हती. देवाने त्याला अभिवचन दिले होते की, जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे मी अभिष्ट करिन जो तुझे अनिष्ट चिंतील त्याचे मी अनिष्ट करीन. उत्पत्ती १२:. तरीही अब्राहाम भिऊन वागत असे. अर्थात अब्राहाम भित्रा मुळीच नव्हता, त्याचा आप्त लोट याला आक्रमक राज्यांच्या हातून सोडवताना तो आपल्या मोजक्या लोकांसमवेत त्यांच्या एकत्रित सैन्यांवर तुटून पडला. पाच राज्यांच्या सैन्याचा पराभव करून त्याने लोटची सुटका केली सर्व संपत्ती परत आणली. परंतु ,एरवी तो भिऊनच वागला, आपल्यालाही अब्राहामा द्वारे देवाचे अभिवचन प्राप्त आहे पण आपण नेहमीच भिऊन वागत असतो. अर्थात अब्राहमच्या अनुभवातून आपल्याला हे शिकायला हवे की देव जर आम्हा संगती आहे तर राजसत्ता देखील आपल्याला हानी पोहचवू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त तर आम्हला निर्भय जीवन जगण्यासाठी खूप उत्तेजना देताना 
दिसतात, ते म्हणतात की, ” जे शरीराला मारू शकतात पण आत्म्याला नाही अशाना घाबरू नका मत्तय १०:२८.

 वन प्लस गॉड इस मेजॉरिटी:आपल्याला माहित आहे कि,अब्राहाम गरार येथे आल्यावर जिवाच्या भीतीने त्याने सारा त्याची बायको नसून बहीण आहे असे सांगितले. अबीमलेखानेही काहीही चौकशी करता साराला पत्नी करून घेण्यासाठी आपल्या घरी नेले. त्यामुळे देवाने अबीमलेख त्याच्या घराण्याला पिडीले. त्याबरोबरच पुढील अनर्थ टाळण्यासाठी देवाने स्वप्नाद्वारे अबीमलेखाला सावध केले. यावर अबीमलेखाने साराला पूर्ण सन्मान देत तिचा पती अब्राहाम याच्याकडे पाठवले. तेव्हा अब्राहामाने प्रार्थना केल्यावर अबीमलेख त्याच्या घराण्याला सुटका मिळाली त्यांना संतती प्राप्त होऊ लागली. येथूनपुढे अबीमलेखाला 
नेहमी वाटे कि अब्राहामामुळे तो मोठ्या संकटात सापडला होता. अब्राहामाचे सामर्थ्य वाढत आहे हे तो पाहत होता पण काही करू शकत नव्हता, कारण त्याला वाटे कि त्याने जर अब्राहामाला दुखावले तर देव त्याला मोठी शिक्षा करीन.या भयातून मार्ग काढण्यासाठी तो अब्राहामाकडून शपथ पूर्वक वचन मागू इच्छित होता कि त्याने त्याला, त्याच्या मुलाबाळांना त्या देशाला काही हानी पोहचवू नये. यालाच म्हणतात वन प्लस गॉड 
इस मेजॉरिटी.

ज्याच्या बाजूने देव असतो त्याच्या पुढे सर्व सत्ता नतमस्तक होतात हे अगदी खरे आहे.राजा सेनापती त्यांच्या देशात उपरी असणाऱ्या अब्राहामाला त्यांच्यावर कृपा करण्याची विनंती करितात! या वरून आपण काय समजून घ्यावे.आपण वचनाप्रमाणे अब्राहामाचे संतान आहोत.प्रभू येशू ख्रिस्त दैव आपल्या बरोबर आहे. आशा स्थितीत आपण या जगात कसे वागावे. अब्राहामाने लबाडी केली तसे आपण लबाडी करण्याचे कारण नाही, कारण देवाने अब्राहामासाठी राजाला कसे वठणीवरआणले हे आपल्याला माहित आहे. म्हणून सरळ मार्ग हाच 
आहे कि कोणालाही कशालाही भीता देवाच्या संगती त्याच्या मार्गदर्शनात जीवन जगणे.

सन्मान करा पण दबून वागू नका: गराराचा राजा अबीमलेख त्याचा सेनापती पिकोल अब्राहामाकडे येऊन जेव्हा शपथपूर्वक कराराची मागणी करू लागले. तेव्हा अब्राहाम अबीमलेखाला म्हणाला की तुझ्या चाकरांनी माझी विहीर बळकावली आहे. येथे आपण पाहतो कि अब्राहामाने त्याला बोल लाविला म्हणजे त्याच्या मागणीवर आक्षेप घेतला कि तू माझ्याशी योग्य वागत नाहीस माझ्याकडून कृपेची अपेक्षा करतोस? यावर अबीमलेख म्हणाला कि मला या बद्दल काही माहित नाही तू हि आजच हे मला सांगत आहेस म्हणून मी या बाबतीत निर्दोष आहे. या चर्चेनंतर अब्राहाम करारास राजी झाला. त्याने अबीमलेखाला मेंढरे बैले दिली त्या दोघांनी करार केला. या कराराद्वारे अब्राहामास या देशात मुक्तपणे संचार करण्याची, स्थावर संपत्ती मिळवण्याची हमी प्राप्त झाली. अबीमलेखाला कृपा प्राप्त झाली कि अब्राहाम त्याच्यासाठी त्याच्या पुत्रांसाठी 
देशासाठी 
आशीर्वाद होईल. त्यानंतर अब्राहामाने अबीमलेखाला सात कोकरे दिली यावर अबीमलेखाने विचारले कि हे कशासाठी. तेव्हा अब्राहाम म्हणाला कि तू हि सात कोकरे माझ्याकडून घे ते यासाठी कि हि विहीर मी खणली आहे, ती माझी आहे, याची मला साक्ष व्हावी. तेव्हा ते कोकरे अबीमलेखाने घेतल्याने ती विहीर शपथ पूर्वक केलेल्या कराराचा भाग होऊन अब्राहामाच्या मालकीची झाली. त्याकाळी करार करताना कराराचे स्मरण चिन्हे म्हणून वेदी बांधणे, विहिरींना नावे देणे, दगडाच्या राशी बनवून त्यांना नावे देणे, नगराचे नाव बदलणे, पशुधनाची देवाणघेवाण करणे, झाडे लावून त्यांना नावे देणे अशा गोष्टीचा वापर केला जात असे. यासाठी की पिढ्यान पिढ्या या कराराचे स्मरण राहावे. आजच्या प्रमाणे बॉण्ड पेपरवर लिहून करार केले जात नसत कारण त्या काळी तशी सोय नव्हती हे येथे लक्षात घ्यावे.

अब्राहाम देवाला आता अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागला होता. अबीमलेखाला देवाने अब्राहामासाठी ताडन केल्यामुळे आता त्याचे धाडस वाढलेले आपण पाहतो. तो राजा म्हणून त्याचा सन्मान करितो परंतु त्याच्या समोर आपली बाजू मांडताना तो घाबरत नाही. तो करार करताना अतिशय व्यावहारिक दृष्टीकोनातून वागतो. समोर राजा आहे म्हणून तो दबून जात नाही, कराराचे चिन्ह म्हणून विहिरीवर मालकी हक्क स्थापित करण्यासाठी त्याने रीतसर पशुधन देऊन राजा बरोबर बरोबरीची वागणूक केली. देवाचा सेवक म्हणून त्याचा अधिकार सामाजिक उंची त्याच्या लक्षात आल्याचे हे दर्शक आहे.

आपणही सर्वांचा सन्मान करावा नम्रतेने वागावे परंतु कोणापुढे हि दबून जाता स्वतःला कमी लेखता देवाच्या लेकराचा अधिकार लक्षात घेऊन वागावे. प्रत्येक व्यवहारात चोख असावे. देवाने आम्हाला त्याची पवित्र प्रजा बनवून मोठी सामाजिक उंची दिली आहे.

मोठी स्वप्ने पहा, मोठे कार्य हाती घ्या देव ते सिद्धीस नेईल. कोणतीच बाह्य शक्ती तुमचे मार्ग अडवू शकणार नाही. राज्यांना तुमचे भय पडेल, ते तुमच्याकडे कृपा मागतील, तुम्हाला सहाय्य करतील. तुमच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करतील. प्रभूचे नाव खूप मोठे आहे आपण त्या नावाचा अभिमान बाळगला पाहिजे 
त्या नावाला शोभेल असे जीवन जगले पाहिजे.

 प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या मुळे मी अभिवचनाचा पुत्र वारीस झालो म्हणून मी तुझे आभार मानतो. आता माझे कल्याण मला दृष्टीपथात वाटते, कारण तुझे आशीर्वाद मी सातत्य पूर्णतेने अनुभवत आहे. अब्राहामा प्रमाणे मी हि कृपा प्राप्त व्हावे तुझ्या संगती चालावे म्हणून माझे सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन.

 रेव्ह कैलास (अलिशा ) साठे.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole