प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.

वचन: यहोवा धन्यवादित असो कारण त्याने माझी काकुळतिची वाणी ऐकली. स्तोत्र २८:.

प्रार्थना

प्रास्ताविक: स्तोत्र २८ हे दाविदाने लिहिले आहे. याला आपण तीन विभागात वाटू शकतो. पहिला भाग काकुळतेची प्रार्थना आहे, दुसरा भाग उत्तर मिळाले म्हणून धन्यवाद प्रगट केले आहेत तिसरा भाग प्रजेसाठी मध्यस्थी केली आहे .

काकुळतेने प्रार्थना करणे: हा भाव शब्दात मांडणे थोडे अवघड आहे म्हणून उदाहरणाने समजून घेऊ. समजा एखादा असहाय्य व्यक्ती त्याचा जीव वाचावा 
म्हणून तुम्हाला मदत मागत आहे. त्याची इच्छा आहे कि तुम्ही दार उघडून त्याला तुमच्या घरात आश्रय द्यावा
त्याला तुमच्या शिवाय दुसरा पर्याय नाही दोन मिनिटात जर तुम्ही दार उघडून त्याला घरात घेतले नाही तर दुष्ट लोक येऊन त्याला मारतील अशा संकटात 
असलेला व्यक्ती तुमच्याकडे कशी मदत मागेल ? किती लिन आणि दिन होऊन तो तुम्हाला विनंती करेल ? तो जी कळकळून विनंती करेल ती खरी काकूलतेची प्रार्थना आपण म्हणू शकतो. दावीद राजा काकुळतीने देवाकडे प्रार्थना करीत असे या वरून आपण शिकावे ते हे की आपण कितीही शक्तिशाली व्यक्ती असा आपल्या स्वसामर्थ्यावर अवलंबून न राहता देवाचे सहाय्य शोधणे त्याला शरण जाणे हे उत्तम. 

प्रथम देवाचे सहाय्य शोधा : येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल दावीद राजा वरील उदाहरणातील व्यक्ती प्रमाणे असहाय्य नव्हता, तो स्वतः पराक्रमी योध्दा होता. त्याच्या सैन्यात रथीं महारथी योध्दे 
होते. लढाईत हार हि त्याला माहित नव्हती. तरी तो इतका नम्र होऊन काकुळतीने देवाकडे प्रार्थना का करत असे . याचे कारण म्हणजे या वेळेस शत्रू खूपच बलाढ्य असावा असेही नाही. पण देवच खरा विजय देणारा आहे, खरा रक्षक आहे हे तो जाणून होता म्हणून तो आपल्या सैन्य बळावर गर्व करून शत्रूचा सामना कधीच करत नसे तर नेहमी देवाच्या सहाय्याने तो विजय प्राप्त करी 
आणि त्याच्या शत्रुंना धूळ चारी. गोल्ल्यथा समोर इस्राएलचे विस लाख सैनिक थरथर कपात होते तेव्हा त्याने त्याचा विनाशस्र सामना करून पराभव केला तो केवळ देवाच्या सहाय्याच्या बळावर. त्याचा विश्वास होता कि तो इस्राएलचा राजा आहे पण त्याचा राजा देव आहे. म्हणून तो प्रत्येक प्रसंगात देवाचे सहाय्य शोधणारा व्यक्ती होता.

त्याने कधीच स्वसामर्थ्यावर गर्व केला नाही. प्रत्येकसंकटात त्याने देवाचे साहाय्य मागितले देवाच्या समक्षतेला आपले निजधाम केले त्याच्या पितृत्वाच्या सावलीत आश्रय घेतला. देवाच्या सहाय्या शिवाय तो कशालाच महत्व देत नसे, त्याला देवाशिवाय जीवन असुरक्षित भकास वाटे म्हणून तो अगदी काकुळतीने पूर्ण नम्र होऊन, अगदी रिक्त होऊन प्रार्थना करी, आणि देवा प्रति कृतज्ञता व्यक्त करीत असे.

प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यावर देवाला धन्यवाद देणे: नेहमी प्रमाणे या वेळीही देवाने दाविदाला जय दिला होता त्याने पराक्रम करून विजय प्राप्त केला होता पण विजयानंतर तो गर्वाने भरून गेला नाही तो देवाला म्हणतो तूच माझे सामर्थ्य ढाल आहेस . नेहमी प्रमाणे आपल्या विजयाचे श्रेय तो देवाला देतो. काकुळतेची त्याची प्रार्थना देवाने ऐकली होती. उत्तर मिळाल्यावर देवाला धन्यवाद देणे हे धार्मिक व्यक्तीचे व्यक्तित्व दाखवते. दावीद राजा देवाच्या श्रेष्टत्वाला मनापासून सन्मान देणारा व्यक्ती होता. देवाचे उपकार आपण कधीच विसरू नये असे त्याला मनोमन वाटे. तो स्वतःला म्हणतो कि हे माझ्या जिवा यहोवाचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नकोस स्तोत्र १०३:. हे फक्त मुखाने नाही तर कृतीतून तो देवावरचे प्रेम व्यक्त करी. म्हणूनच तर देव निंदा करणाऱ्या गोल्ल्यथावर तो तुटून पडला त्याला ठार मारिले.

आपलेही हृदय देवाच्या उपकार स्मरणाने भरलेले असले पाहिजे. फक्त मुखाने नव्हे तर कृतीतून आपण त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले पाहिजे.

जनतेसाठी साठी मध्यस्थी: या विजया नंतर तो देवा समोर स्वतःला नम्र करत आहे या प्रार्थने द्वारे तो हेच मत व्यक्त करत आहे कि हे देवा तूच खरा इस्राएलचा राजा आहेस. मी तर फक्त तुझा सेवक आहे. तूच त्यांचे रक्षण कर. त्यांना आशीर्वाद दे त्यांना उचलून घे त्यांचा मेंढपाळ हो.

आपण सुद्धा काकुळतेने प्रार्थना करणारे असले पाहिजे, त्याचे साहाय्य हेच महत्वाचे मानले पाहिजे, त्याची समक्षता शोधली पाहिजे कारण तेथेच पूर्ण सुरक्षितता आहे स्तोत्र ९१. आपल्याला प्राप्त अधिकार त्याच्यापासून आहे असे समजून त्याच्या हाती सर्व गोष्टी द्याव्यात हाच यशाचा खरा मार्ग आहे.

प्रार्थना: प्रभू येशू ,जो परात्परच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील असे तुझे वचन सांगते . दाविदा प्रमाणे मलाही तुझे मुख शोधणारा विवेक भाव दे, मी रोज तुझी समक्षतता शोधावी सुरक्षित जीवन जगावे असे शहाणपण मला दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन.

 रेव्ह कैलास [आलिशा ] साठे

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole