प्रार्थना व कार्यसिध्दी, उत्पत्ती २०:१७.

  प्रार्थना 

वचन: मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख त्याची बायको त्याच्या दासी यास बरे केले, आणि त्यास मुले होऊ लागली. उत्पत्ती २०:१७.

 

प्रार्थना

देव अबीमलेखाला स्वप्नाद्वारे सांगतो की 
तू माझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुला सावध करीत आहे.वचन . पण वरील वचनावरून 
लक्षात येते की देवाने अबीमलेख त्याची बायको त्याच्या दास दासी यांना पिडीले होते. त्यांची गर्भस्थाने बंद केली होती.वचन १८
याचा अर्थ अबीमलेखाने साराला बायको करून घेण्यासाठी घरी नेऊन ठेवलेल्या चुकीची भयंकर 
शिक्षा देवाने दिली होती. मग देव आता कोणत्या पापाबद्दल बोलत होता ? यासाठी आपल्याला पुढील 
वचन समजून घ्यावे लागेल. ” जे मरण होण्यासारखे नाही असे पाप आपला भाऊ करीत आहे, असे जर कोणी पाहतो तर त्याने मागावे, मग तो त्याला जीवन देईल, म्हणजे मरण होण्यासारखे पाप जे करीत नाहीत त्यांना देव जीवन देईल, मरण होण्यासारखे पाप आहे, तरीपण मरण होण्यासारखे नाही असेही पाप आहे.” योहान :१६१७. या ठिकाणी आपण शेवटच्या न्याया बद्दल विचार करीत नाहीत
येथे, या वचनातून आपण एवढेच समजून घ्यावे कि देवाने पाप शिक्षा यांची विभागणी केली आहे. प्रत्येक अन्याय पापच आहे त्यासाठी शिक्षाही आहे म्हणूनच देवाने अबीमलेख त्याची बायको त्याच्या दास दासी यांना पिडीले होते. त्यांची गर्भस्थाने बंद केली होती. ते यासाठी की त्याला त्याचे पाप कळावे त्याने न्यायाचा मार्ग अवलंबवावा. पण पुढचे जे पाप अबीमलेख करणार होता ते मरणाला जन्म देणारे होते. म्हणून तो अबीमलेखाला सांगतो की मला माहित आहे कि तुला सारा बद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे तू हे केले आहे. तरी तुझे वागणे चुकीचे असल्यामुळे तुला शिक्षा दिली पण जर तू तिच्याशी लग्न केले तर मात्र तुझ्यावर तुझ्या घराण्यावर मरण ओढवेल. म्हणून तिला सुखरूप तिच्या पतीकडे सोपव त्याला तुझ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती कर म्हणजे मी तुझ्यावरच्या पीडा दूर करिन. अबीमलेख नम्र झाला त्याने साराला सन्मानाने अब्राहामाकडे सोपवले मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख त्याची बायको त्याच्या दासी यास बरे केले, आणि त्यास मुले होऊ लागली. उत्पत्ती २०:१७.विचार करा देवाने जर या गोष्टी अबीमलेखाला कळवल्या नसत्या तर काय झाले असते? आज अनेक लोक त्यांच्या छोट्या छोट्या चुकांचे परिणाम भोगीत आहेत. देव त्यांना स्वप्नांद्वारे, त्याचा वचनातून किंवा त्याच्या सेवकांकडून मार्गदर्शन करत असतो.अबीमलेखाप्रमाणे जे नम्र होतात त्याला शरण जातात तेव्हा देव त्याच्या सेवकाच्या प्रार्थने द्वारे त्यांना बरे करतो.पण जे ऐकत नाहीत ते अयुष्यभर त्रास भोगत राहतात. त्यांनी देवाकडे वळावे फलद्रुप व्हावे हे उत्तम आहे.

 प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला तुझ्या सेवेसाठी निवडले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. अबीमलेखा प्रमाणे सर्वाना त्यांची परिस्थिती कळू देत त्यांनी तुझ्या कडे वळून बरे व्हावे म्हणून तुझ्या सेवकांच्या प्रार्थना ऐक. सर्वाना आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागतो आमेन.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole