प्रीती विषयी बायबल वचने

    प्रीती 

प्रस्तावना : पवित्र शास्त्र बायबल आपल्याला  प्रीती बद्दल शिकवते.खालील वचने देवाच्या प्रीती बद्दल,व आपण एकमेकांबरोबर व जगातील इतर लोकांबरोबर कसे प्रीतीने जीवन जगावे हे  आपल्याला शिकवतात. 

१]देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६.
२]येशूने उत्तर दिले, पहिली हि आहे ; हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव तो एकच प्रभू आहे.तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने व आपल्या सर्व शक्तीने त्याच्यावर प्रीती कर . दुसरी हि आहे जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर याहून दुसरी मोठी कोणतीही आज्ञा नाही. मार्क १२:२९-३१. अनुवाद ६:४-५
३]प्रीती सहनशील आहे, उपकारक आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती आपणास नावाजून घेत नाही, अभिमानाने फुगत नाही, अयोग्य प्रकारे वागत नाही, आपलाच स्वार्थ पहात नाही, संताप करीत नाही, वाईट गणतीत घेत नाही, अन्यायी पणात आनंद पावत नाही, तर खरेपणाबरोबर आनंद करते, सर्व काही सहन करते सर्वांचा विश्वास धरते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबधाने धीर धरते .१ करिंथ १३:४-५,
४] जे काही तुम्ही करीता ते सर्व प्रीतीने करा.१ करिंथ १६:१४,
५]तर आता विश्वास, आशा, प्रीती हि तिन्ही कायम राहतात, परंतु त्यात प्रीती श्रेष्ट आहे. १करिंथ १३:१३,
 ६]आणि जरी मला भविष्यवाद हे कृपादान असले, आणि मला सर्व गुजे व सर्व विद्या समजत असल्या, आणि जरी डोंगर ढळावावे असा मला पूर्ण विश्वास असला, तरी मला प्रीती नसल्यास मी काहीच नाही १ करिंथ १३:२
७]परंतु जसे लिहिले आहे की, ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्यांनी पहिल्या नाहीत व कानांनी ऐकल्या नाहीत, व माणसाच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत त्या प्रमाणे हे झाले. १ करिंथ २:९
८]सकाळी तू आपली प्रेमदया तू मला ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरंवसा ठेवतो; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळिव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. स्तोत्र १४३:८,
९] सकाळीच तू आपल्या प्रेमदयेने आम्हांस तृप्त कर, म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्ष करू व आनंदित राहू स्तोत्र ९०:१४
१०]आणि या सर्वांवर प्रीती अंगी ल्या, हि पूर्णतेचे बंधन आहे. कल ३:१४
११]आणि देवाची जी प्रीती आपल्यावर आहे ती आपण ओळखली आहे, आणि तिच्यावर विश्वास ठेवला आहे, देव प्रीती आहे, आणि जो प्रीतीत राहतो तो देवा मध्ये राहतो, आणि देव त्याच्या मध्ये राहतो.१ योहान ४:१६,
१२]त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करितो. १ योहान ४: १९
१३]कोणी कधीही  देवाला  पाहिले नाही, जर आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर देव आपणामध्ये राहतो आणि त्याची प्रीती आपणामध्ये पूर्ण केलेली आहे. १ योहान ४: १२, 
१४]मी देवावर प्रीती करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या भावाचा द्वेष करितो तर तो लबाड आहे; कारण जो आपल्या भावावर, ज्याने त्याला पहिले आहे त्याच्यावर प्रीती करीत नाही त्याच्याने ज्या देवाला पाहिले नाही त्याच्यावर प्रीती करवत नाही १ योहान ४: २०, 
१५]प्रीतीत भय नाही, तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर घालवून टाकते, कारण भयामध्ये शासन आहे, आणि भिणारा प्रीतीत पूर्ण केला गेला नाही. १ योहान ४:१८
१६]सर्व नम्रतेने, व लीनतेने, व सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करीत असता, शांतीच्या बंधनात आत्म्याचे ऐक्य राखायला झटत असावे. इफिस ४:२-३ 
१७]विश्वासाच्याद्वारे, ख्रिस्ताने तुमच्या हृदयांमध्ये वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीमध्ये मुळावलेले व पायाघातलेले असून, ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, व लांबी, व खोली, व उंची, काय हे तुम्ही सर्व पवित्रांच्या बरोबर समजून घ्यायला, आणि ख्रिस्ताची प्रीती, जी जाणण्याचा पलीकडे आहे ती जाणायला शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण व्हावे. इफिस ३:१७-१९
१८]नवऱ्यानो जशी ख्रिस्तानेंहि मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा, त्याने मंडळीवर प्रीती केली आणि आपणाला तिच्याकरिता अर्पून दिले. इफिस ५:२५
१९]आणि विशेषेंकरून एकमेकांवर निष्ठेने प्रीती करीत जा, कारण प्रीती पापांची रास झाकते.  १ पेत्र  ४:८
२०]प्रीती निष्कपट असाव, वाईटाचा वीट माना, जे बरे त्याला चिटकून रहा. रोम १२:९,
२१]बांधुप्रीतिने एकमेकांवर ममता करा, आदर करण्यात एकमेकांस थोर माना, रोम १२: १०
२२]जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे, तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, हि माझी आज्ञा आहे. योहान १५:१२,
२३]आपल्या मित्रांकरिता आपला जीव द्यावा यापेक्षा कोणतीच प्रीती मोठी नाही.योहान १५: १३, 
२४]ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करितो त्याच्यावर माझा बाप प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करील व त्याला मी आपल्या स्वतःस स्पष्ट पणे प्रकट करीन. योहान १४:२१
२५]कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता त्या आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल काय ? होय, ती कदाचित विसरेल पण मी तुला विसरणार नाही. पाहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरले आहे.यशया :४९:१५-१६, 
२६]तू माझ्या दृष्टीने मोलवान व प्रतिष्टीत होतास आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे, याकरिता मी तुझ्या बद्दल मनुष्ये व तुझ्या जीव बद्दल लोक देईल. यशया ४३:४, 
२७]प्रभू तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनशीलतेत नीट लावो. २ थेस ३:५
२८]जे माझ्यावर प्रीती करितात त्यांच्यावर मी प्रीती करितो आणि जे झटून मला शोधितात त्यांना मी सापडतो. नीती ८:१७.
टीप : पवित्र शास्त्र बायबल जुना व नवा करार यातून हि वचने घेतली आहेत 
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole