बायबलची वचने मराठीमध्ये

 आत्मिक मृत्यूपासून वाचवणारी “सार्वकालिक जीवनासाठीची” देवाची पवित्र शास्त्रातील वचने 

स्वर्ग

१] ” देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६ 

२]  “ह्या विषयी आश्चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. योहान ५:२८-२९. 

३] ” मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. योहान ५: २४. 

४] जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. रोम १०:९.

५]जो कोणी प्रभूचे  नाव घेऊन त्याला हाक मारील त्याचे तारण होईल रोम १०:१३.

६] येशूने म्हटले मार्ग व सत्य व जीवन मीच आहे, कोणीही माझ्या मधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. योहान १४:६.

७] सर्वकाळचे जीवन हेच आहे हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे . योहान १७:३.

८] येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. आणि जो कोणी जगतो व माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. योहान ११:१५-२६.

९] जो आपल्या जीवावर प्रीती करितो तो त्याला गमावतो, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करितो तो त्याला सर्वकालच्या जीवनासाठी राखील .जर कोणी माझी सेवा करील तर त्याने माझ्यामागे यावे; मग मी जेथे असणार तेथे माझा सेवकही असणार; जर कोणी माझी सेवा करील तर माझा बाप त्याचा सन्मान करील. योहान १२:२५-२६

१०] देवाच्या आज्ञा सर्वकालचे जीवन आहे. योहान १२:५०.

११] देवाने दिलेली अभिवचने म्हणजे सार्वकालिक जीवन होय . १ योहान २:२५. 

१२] आपण भावांवर प्रीती करितो यावरून आपल्याला माहित आहे की आपण मरणातून निघून जीवनात गेलो आहो.  जो [ भावांवर ] प्रीती करीत नाही तो मरणात रहातो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करितो तो मनुष्यघातक आहे, आणि कोणत्याही मनुष्यघातकात सर्वकालचे जीवन राहत नाही हे तुम्हाला माहित आहे.  १ योहान ३;१४-१५

१३] देवाने आपल्याला सर्वकालचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे, ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. १ योहान ५:११-१२.

१४] आपल्याला ठाऊक आहे, की देवाचा पुत्र आला आहे, आणि जो खरा त्याला आपण ओळखावे म्हणून त्याने आपणास बुध्दी दिली आहे आणि जो खरा त्याच्या मध्ये, म्हणजे देवाचा पुत्र त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये, आपण आहो; हाच खरा देव आणि सर्वकालचे जीवन आहे. १ योहान ५;२०.

१५] मरणापर्यंत विश्वासू ऐस, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईल, प्रगटीकरण २:१०.

१६] आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको; जो जिकंतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. प्रगटीकरण २:११.

१७] जो जिकंतो, तो शुभ्र वस्रे ल्यालेला असा होईल, आणि मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही. आणि माझा बाप आणि त्याचे दूत यांच्या समोर मी त्याचे नाव पत्करीन. प्रगटीकरण ३:१७. 

संदर्भ : पवित्र शास्त्र , भाषांतर पंडिता रमाबाई .

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole