बायबल वचन मराठी

 वचन:- यहोवाचा आशीर्वाद धनवान करतो आणि तो त्या बरोबर दुःख देत नाही नीतिसूत्रे १०२२

वरील वचन अनुवाद २८:१३ स्तोत्र ७३ याद्वारे समजून घ्यावे यामध्ये मुख्य मार्गदर्शन हे आहे कि धनवान होण्यासाठी आपण जगाला अनुसरू नये. जगातील लोक धनवान होण्यासाठी काहीही करतात संपत्ती हेच त्यांचे ध्येय असते ते पैशाने सुख, शांती, आनंद विकत घेऊ पाहतात परंतु ती त्यांच्या पासून दूर असते वर वर पाहता आपल्याला त्यांचा हेवा 
वाटतो . स्तोत्रकर्ता म्हणतो जगाकडे पाहून माझे पाय घसरणार होते. मला दुष्ट लोकांचा हेवा वाटू लागला होता. कारण मला वाटे ते खूप सुखी आहेत, त्यांची शरीरे सुदृढ आहेत, ते रुबाबात जगतात, बिनधास्त आसतात वाटेल तसे वागतात, अन्याय अत्याचार करतात तरी त्यांचा धनसंचय वाढत जातो. त्यामुळे मला वाटले मी उगीच न्यायाने 
वागलो. कारण मी चांगले वागूनही पीडा भोगीत आहे, कष्ट माझा पिच्छा पुरवतात. मला काय करावे ते कळत नव्हते पण जेव्हा मी देवाच्या मंदिरात गेलो तेव्हा देवाने माझे डोळे उघडले या लोकांचा शेवट माझ्या लक्षात आला. देवाने त्यांना निसरड्या जागी ठेवलेले असते ते क्षणात नाश पावतात.भयाने ते गांगरून जातात. मी मात्र नेहमी तुझ्या जवळ आहे तुझा उजवा हात मला सावरून धरतो तू बोध करून मला मार्ग दाखवतो. याचा अर्थ जे धन अन्यायाने किंवा जगाच्या तत्वाप्रमाणे कमावले जाते ते माणसाला कधीच खरे सुख देत नाही. त्या धना बरोबर दुःख हे ठेवलेले असतेच. स्तोत्र ७३:१८१९

पण, जेव्हा परमेश्वराकडून धन प्राप्त होते ते जीवनातील सर्व दुःखे संपवते. देव त्याच्या लेकरांना परिपूर्ण स्वरूपात आशीर्वाद देतो. जेव्हा देव कृपादृष्टी करितो तेव्हा आशीर्वाद स्वतः येऊन गाठतात. त्यांच्या मागे लागावे लागत नाही. जीवनात सर्वत्र आशीर्वाद पाहावयास मिळतात त्यांचे धन पाश आनत नाही. हे आशीर्वाद पिढयानपिढया टिकणारे असतात. त्यांची लेकरे श्रेष्टस्थानी स्थापित होतात अनुवाद २८:१३. ते जे हाती घेतात ते सिध्दीस जाते त्यांची संमृध्दि इतरांना आंनद देणारी उपकारक असते . स्तोत्र . देव त्यांचा मेंढपाळ असल्यामुळे त्याचे वर्तमान भविष्य सुरक्षित असते ते कशाची काळजी करत नाहीत. त्यांना सर्वकालच्या आशीर्वादाची खात्रीअसते. त्यांची झोप सुखाची असते. म्हणून आपण देवाच्या आशीर्वादाने धनसंपदा प्राप्त करावी.

प्रार्थना: प्रभू येशू तुझे आशीर्वाद धनसंपदा देतात सर्वे दुःखे हरण करतात. मी जगाच्या मार्गाने जात नाही तुझ्या आशीर्वादांची वाट पाहतो कारण तुझे मार्गदर्शन,  
तुझा उजवा हात मला सावरून धरतो. तू माझा मेंढपाळ आहेस याचा मला सतत अनुभव देतोस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला तुझ्याकडून मिळणाऱ्या धनाचीअपेक्षा आहे जे माझ्या जीवनात पाश आणणार नाही तर पिढ्यान पिढ्या टिकणारे आशीर्वाद आणील . येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक , आमेन.

 रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.        


वचन:ज्याच्या साहाय्याला याकोबाचा देव आहे ज्याची अशा यहोवा आपला देव याच्यावर आहे, तो सुखी आहे. स्तोत्र १४६

सुख आणि देव हे सूत्र आहे
माणसाला देवाचे 
सहाय्य आवश्यक आहे
दाविदाने प्रत्येक लढाईत विजय मिळवला कारण देवाचे सहाय्य त्यालामिळाले. तो एकहि लढाई हरला नाही. म्हणून तो म्हणतो कि माझा मेंढपाळ शत्रूच्या समोर मला ताट वाढतो, मृत्युछायेची दरी मला घाबरवू शकत नाही. स्तोत्र २३
जेव्हा मनुष्याचे आश्रय स्थान देव असते तेव्हा 
दृश्य किंवा असदृश शत्रू त्याला हानी पोहचवू शकत नाहीत. स्तोत्र ९१ सांगते कि, ” जर मनुष्य याकोबाच्या देवावर भरोसा ठेवतो तर पारध्यांचे पाश म्हणजे शत्रूंनी केलेले गुप्त षडयंत्र ह्या पासून देव त्याला सोडवतो. नाश करणारी मरी, रात्रीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, आशा माणसाला समजणाऱ्या सैतानी हल्ल्यांपासून 
देव त्याचे रक्षण करितो. देव म्हणतो तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुझ्या आजूबाजूला हजार, दहाहजार पडतील पण ती तुला भिडणार नाहीत, तुम्ही तुमच्या 
डोळ्यांनी वाईटाचा नाश 
पाहाल पण त्याची बाधा तुम्हाला होणार नाही . देवदूतांच्या द्वारे सर्व मार्गात तो त्याचे रक्षण करतो. ते त्याला धोंड्याची ठेच लागू देत नाहीत. त्याने त्यांना सैतानाच्या सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. तो म्हणतो मी त्याला संकटातून मुक्त करण्यास तत्पर आहे. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करिन. हि देवाची अभिवचने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहेत. तो म्हणतो माझ्या मार्गाने चाल म्हणजे तुला आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही ते धावत येऊन तुला गाठतील. सामाजिक, राजकीय , आर्थिक रित्या तू आशीर्वादित असशील. मी तुला जगासाठी पुढारी करिन; तू मस्तक असशील. लोक तुला अनुसरतील तुला कोणाला अनुसरावे लागणार नाही. अनुवाद २८:१३. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो कि,”ज्याच्या साहाय्याला याकोबाचा देव आहे ज्याची अशा यहोवा आपला देव याच्यावर आहे, तो सुखी आहे.”

 या उलट जो देवावर विश्वास ठेवत नाही 
तर जगाला अनुसरतो त्या विषयी देवाचे वचन सांगते, कि,” जो मनुष्यावर भरोसा ठेवतो आणि देहाला आपला बाहू करतो आणि ज्याचे हृदय देवापासून फिरते तो शापित असो यिर्मया १७. कारण ) मनुष्याची क्षमता मर्यादित असते: यशया ३१ स्तोत्र १०८१२ परंतु देवाची क्षमता अमर्यादित असते इतिहास ३२ . ) मनुष्याचे साहाय्य सातत्यपूर्ण असत नाही. मात्र देव सर्वदा साहाय्य करण्यास सिद्द असतो.इस्राएलाच्या रक्षकाला झोप येत नाही तो डुलकीहि घेत नाही.त्याचे साहाय्य सातत्यपूर्ण असते. स्तोत्र.१२१. )मनुष्याची विश्वासहर्ता संशयास्पद असते, परंतु देव कधीच धोका देत नाही 
देत नाही. स्तोत्र १९१९० अनुवाद ३१.जो व्यक्ती मनुष्यापेक्षा देवाच्या साहाय्यवर विश्वास ठेवून जगतो, तो कधी लज्जित होत नाही. देव त्याला सुखी ठेवतो.

 याच विश्वासाने स्तोत्रकर्ता देवाकडे कशी प्रार्थना करत आहे ते पहा,” आमचे मुलगे आपल्या तरुणपणात वाढलेल्या रोप्यांसारखे असावेत, आमच्यामुली राजमंदिराच्या कोनशिलांसारख्या असाव्यात. आमची भांडारे भरलेली असावीत सर्व प्रकारच्या गोष्टी आम्हाला तेथून मिळाव्यात. आमच्या शेता वाड्यात बरकत असावी आमच्या कळपाना सहस्त्रवधी अयुतवधी संताने होऊ दे. आमची गुरे लादलेली असावीत, दरोड्या करता कोणी आत येऊ नये. आणि चढाई करता कोणी बाहेर जाऊ नये. आणि आमच्या मध्ये आकांत होऊ नये. ज्या लोकांची स्थिती अशी आहे ते सुखी आहेत. ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत. स्तोत्र १४४;१२१५. खरोखर जर आपण यहोवावर भाव ठेवतो त्याला आपले रक्षण कवच मानतो. तर त्याच्याकडे आशा प्रकारच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करू शकतो.

प्रार्थना: हे देवा मी जर मनुष्यावर भरोसा ठेवत असेन तुझे साहाय्य श्रोत समजून घेता वागत असेन तर मला क्षमा कर. मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे माझे साहाय्य कर,माझे कल्याण कर, येशूच्या नावाने मागतो आमेन.

Rev. Kailas [Alisha] Sathe.


 

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole