भिऊ नका देव संरक्षणाची हमी देतो, उत्पत्ती १२:३

आब्राहम व आशीर्वाद 

 वचन: तुझे अभिष्ट चिंतीतील त्यांचे मी अभिष्ट करिन, तुझे जे अनिष्ट चिंतीतील त्यांचे मी अनिष्ट करिन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. उत्पत्ती १२:.

देव जेव्हा आपल्याला पाचारण करितो किंवा आपल्यावर एखादी जबाबदारी टाकितो तेव्हा तो स्वतः आपल्या बरोबर सर्वशक्तीनिशी उभा राहतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. आब्राहामाला माहित नसलेल्या देशात जायचे आहे. देव त्याला इतकेच सांगतो कि मी दाखवीन तिकडे जा. पण हे सांगत असताना त्याला त्याच्या संरक्षणाची खात्री देव देतो. आपल्या भाषेत हे वचन जर समजून घ्यायचे तर, ते जणू असे असेल, “जर कोणी तुला हात लावायचे मनात आणील तर मी त्याला ठोशाने उत्तर देईल, जर कोणी तुझे वाईट करायचे मनात आणील तर मी त्याचे वाईट करीन.”  जर तुझे कोणी वाईट योजिन तर मी त्याच्या बद्दल वाईट योजिन असे देव म्हणत नाही तर स्पष्ट सांगतो कि मी त्याचे वाईट करीन. म्हणून देवाच्या माणसाचे वाईट करण्याचे मनात देखील आणू नये. उलट त्याचा साठी प्रार्थना करा
होईल तितके त्याच्यासाठी चांगले करण्याचा विचार करा. म्हणजे देव त्याच्या वचनानुसार तुमचे चांगले करीन. देवाची हि काम करण्याची पध्दत संपूर्ण पवित्र शास्त्रात पाहावयास मिळते.

आमालेकाने इस्राएला विरुध्द शस्त्र उचलले तेव्हा देवाने त्यांच्या विरुध्द युध्द लढले त्यांचा पराभव केल्यानंतर मोसेस म्हटले, ” आठवणीसाठी हे ग्रंथात लिही, आणि यहोशवाच्या कानी घाल, कारण मी आकाशाखालून आमलेकाची आठवण अगदीच पुसून टाकीन.” निर्गम १७:१४. देवाने  आमालेकांचा बिमोड करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांनी त्याच्या लोकांच्या उध्दाराच्या मार्गात विघ्न आणले. देव त्याच्या सेवकांबद्दल अतिशय आवेशी आहे, अनाथोथाची माणसे यिर्मया विरुध्द कट करून त्याचा जीव घेऊ पाहत होते, त्याने  यहोवाच्या नावाने संदेश देऊ नये म्हणून त्याच्यावर दबाव आणत होते, तेव्हा देव त्याच्या सर्व घराण्याचे पारिपत्या करण्याचे ठरवून त्याच्यावर शासनाचे वर्ष आणितो यिर्मया ११;२१-२३.

राहब हि 
वेश्या होती पण ती जेव्हा इस्राएल लोकांना सहाय्य करते तेव्हा देव तिचे संरक्षण करून तिला त्याच्या प्रजेचा भाग बनवतो. असे एक नाही अनेक उदाहरणे पवित्र शास्रात आहेत. म्हणून देवाच्या लोकांनी चिंता करता 
सेवेत अग्रेसर राहावे. देवाच्या सेवेला विरोध न करता सहाय्य करावे म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतील . 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला फक्त सेवेसाठी पाचारले नाहीस, तर सदैव संगती राहण्याचे अभिवचन दिले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. मला कशाचेही कोणाचेही भय बाळगता तुझी सेवा करण्यास सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole