मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७

ख्रिस्ती जीवन देवाचे प्रतिरूप 

वचन: देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर नारी अशी ती निर्माण केली उत्पत्ती :२७.

देवाचे प्रतिरूप

प्रस्तावना : देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले,  म्हणजे नेमका मनुष्य कसा निर्माण केला? व मनुष्यालाच त्याने आपल्या प्रतिरूपात का निर्मिले ?  असे प्रश्न आपल्या समोर ओघाने येतात. चला तर मग आपण पवित्र शास्त्राच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधू .  

देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात का निर्मिले ? : देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले ते या साठी कि; त्याने सर्व जीवसृष्टीवर सत्ता चालवावी. म्हणजे सर्व जीवसृष्टीची काळजी घ्यावी तिचे संगोपन करावे. आदामाच्या प्रथम जबाबदारी कडे पहाता त्याला एदेन बागेत जमिनीची मशागत राखण करायचे होते. नंतर देवाने सर्व प्राणिमात्रांना त्याच्याकडे नेले यासाठी कि आदाम त्यांना कोणती नावे देतो ते पाहावे, याचा अर्थ नुसते विशिष्ट्य नाव देणे नव्हे तर तो त्यांचे वर्गीकरण कसे करितो त्यांची सुव्यवस्था कशी लावतो हे पाहणे सुध्दा या ठिकाणी अभिप्रित होते

देवाचे प्रतिरूप

प्रतिरूप म्हणजे नेमके काय ?: पृथ्वीवरील सर्व जीव सृष्टीसाठी मनुष्य देवाचे प्रतिरूप आहे. कारण देवाने त्याला सर्व जीवसृष्टीवर आधिकार दिला आहे. देवाच्या सह्भागीतेत राहून त्याच्या मार्गदर्शना खाली सर्व सृष्टीची तो काळजी घेणारा होता. त्या वेळी आदाम हव्वेचा सर्व जीवसृष्टी बरोबर संवाद होता, उत्पत्ती :. यावरून स्पष्ट होते कि मनुष्य देवाचे प्रतिरूप आहे
तो देवाचा प्रतिनिधी म्हणुन या पृथ्वीवर आहे. त्याने सर्व गोष्टींची काळजी घ्यावी म्हणून त्याला इतरांपेक्षा वेगळे निर्माण केले आहे. देवाने त्याचे न्यायीपण, ज्ञान, पवित्रता मानवावर स्थापित केली आहे. यासाठी कि मनुष्याने दैवी इच्छा समजून घेऊन आपल्या आधिकाराची जबाबदारी योग्य पणे सांभाळावी.

देवाचे प्रतिरूप

आज विश्वासनारे ख्रिस्तामध्ये देवाचे प्रतिरूप आहेत: परंतु पतित मनुष्य देवाचे हे गौरव गमावून बसल्यामुळे आज आम्ही सर्वत्र भ्रस्टाचाराचा अनुभव घेत आहोत. देवाचे वचन सांगते, देवाने मनुष्याला प्रामाणिक व सरळ असे निर्माण केले परंतु मनुष्य अनेक कल्पनांच्या मागे लागला.उपदेशक :२९

परंतु, चांगली गोष्ट हि आहे कि प्रभू येशू द्वारे ते पूर्वीचे पवित्र गौरव मानवाला पुन्हा प्राप्त होत आहे. म्हणून इफिस :२३-२४,सांगते की, ” तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. कल :१०-११.सांगते,जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात  हेल्लेणी व यहुदी, सुंता झालेला व सुंता न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वात आहे. तर आता ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची हि जबाबदारी आहे कि त्यांनी हे नवीन पावित्र्य सामर्थ्य धारण करावे आपल्या पाचरणाला अनुरूप प्रतिसाद द्यावा. म्हणजे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होतील.

 प्रार्थना: हे प्रभू येशू तू पुन्हा माझे गौरव मला मिळवून दिले म्हणून मी तुझे आभार मानतो. आता या पृथ्वीवर तुझी सेवा करत असताना मला साहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole