मुलांच्या नावातील गुपित !

 

नावात काय आहे ? 

वचन
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. उत्पत्ती :२०.

आई वडील
प्रस्तावना: मुलांना नावे देताना आपण फार गंभीर नसल्याचे दिसते. बहुतेक लोक आवडणारी नावे देतात. प्रसिध्द व्यक्तीचे नाव आपल्या मुलांना देतात, किंवा नाव ऐकायला उच्चारताना कसे वाटते या अनुशंघाने नाव दिले जाते. काही लोक विशेषकरून हिंदू, मुलाच्या जन्म वेळेचा संदर्भ घेऊन त्या वेळेस ग्रह तार्यांची स्थिती लक्षात घेऊन मुलांची नावे ठेवतात. परंतु पवित्र शास्त्र मुलांना नावे देण्यासंदर्भात जो दृष्टीकोन आपल्याला देते त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत.

नावे देताना दैवी संकेत लक्षात घ्या : आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले. त्यामागे काही दैवी संकेत होते. “देव म्हणाला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर मी त्याला अनुरूप असा सहकारी निर्माण करीन,” उत्पत्ती :१८. आदामाने आपल्या पत्नीला नाव देताना हा दैवी संकेत किंवा आपण म्हणू , “हि दैवी इच्छासमजून

आदाम व हव्वा

घेतल्याचे आपल्याला दिसते. जेंव्हा; परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता हि मात्र माझ्या हाडातले हाड मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण हि नरापासून बनवली आहे . यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ते दोघे एकदेह होतील. उत्पत्ती :२२२४. आपल्या पत्नीला त्याने नारी हे नाव देताना दैवी इच्छा लक्षात घेऊन, त्याचे स्पष्टीकरण दिले   
तिचे गुण, तिचे कार्य भविष्यात होणारे परिणाम घोषित केले.जसे,आज्ञा भंगाच्या पापानंतर त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्यांदा नाव दिले, ते नाव म्हणजे हव्वा. तो तिला हव्वा हे नाव देतो, कारण ती सर्व जीवधारींची माता होणार होती. हिब्रू भाषेत याचा अर्थ आहे जीवनाचा श्रोत.

मुलं
आई वडिलांनी मुलांना आशिर्वादा सहित नांवे द्यावीत : आई वडील मुलांना योग्य नावे देऊन आशीर्वादित करू शकतात.पवित्र शास्रात असे दिसून येते कि शक्यतो आई वडिलांनी मुलांना नावे दिली आहेत, उदारणार्थ लामेखाला पुत्र झाला त्याने त्याचे नाव नोहा ठेवले पुढे म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाने आमचे काम आमच्या हाताचे कष्ट या विषयी हा आमच्या हातास आराम देईल. येथे लामेखाने नोहाला आध्यात्मिक व्यक्तित्व दिले, त्याच्या हाती एक काम दिले, आणि त्याच बरोबर त्या कार्याचा काय परिणाम होईल हे हि सांगितले. पुढे नोहाच्या जीवनात हे आशीर्वाद पूर्ण झाल्याचे आपण पाहतो. आई वडिलांनी आपल्या मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावित आपल्या मुलांना आशीर्वाद देण्याच्या हक्काचा कसा उपयोग करावा हे येथे लक्षात घ्यावे. आपण आपले जीवन आपल्या 
लेकरांकडे हस्तांतरित करीत 
असतो, म्हणून याकडे 
गांभीर्याने पाहिले तर चांगले होईल. अर्थात त्यात दैवी सामर्थ्य योजना ह्या गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतील. तुम्ही जेंव्हा एखाद्या व्यक्तीला नाव देता तेव्हा फक्त ओळख देत नाही तर त्याला विशिष्ट व्यक्तिमत्व देत असता. नाव देताना त्या मागचे कारण, तो व्यक्ती धारण करणारे 
गुण, त्याच्या हातून घडणारे कार्य त्या कार्याचे परिणाम या सर्वांचा उल्लेख व्हावा हे अपेक्षित आहे.

अब्राहाम 
देवाद्वारे नाव सुचवणे, नावात दुरुस्ती करणे 
किंवा नावाला 
आशीर्वाद देणे 
:
अनेकदा देवाने नावे सुचवली त्या बरोबर त्याचे कार्य आशीर्वादही सांगितली. दाविदाला देव म्हणाला तुझ्या हातून बहुत रक्तपात झाला आहे, म्हणून तू माझ्या नामाचे मंदिर बांधणार नाहीस. पहा, तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चहुकडल्या शत्रू पासून विसावा देईल. त्याचे नाव शलमोन [शांतताप्रिय] असे होईल. त्याच्या कारकीर्तीत मी इस्राएलास शांती स्वस्थता देईल. तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील; तो माझा पुत्र मी त्याचा पिता होईन; इस्राएलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन. इतिहास २२:१०.

देव आपले नाव दुरुस्त करू शकतो , उदाहरण म्हणून पहा, देव अब्रामला म्हणतो, यापुढे तुला अब्राम (श्रेष्ट पिता) म्हणणार नाहीत, तर तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अती फलसंपन्न करीन, तुझं पासून मी मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझपासून राजे उत्पन्न होतील, मी तुझा तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुजशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करितो. उत्पत्ती १७:
पुढे याकोबाच्या बाबतींत आपण पहातो की, त्याचा जन्म झाला तेंव्हा त्याच्या आईने त्याचे नाव याकोब [ टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ] असे ठेवले उत्पत्ती २५: २६. देव त्याला दर्शन देऊन त्याचे नाव बदलतो
तो म्हणतो यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. उत्पत्ती ३२:२८.

याबेस 

देव आपल्या नावाला आशीर्वादित करतो, अनेकजण याबेसच्या प्रार्थनेतून शिकू शकतील, त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेविले म्हटले कि त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला असावा म्हणून त्याने देवाकडे आशिर्वादा साठी प्रार्थना केली देवाने त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या सर्व बांधवात प्रतिष्ठित केले. इतिहास :१०.

प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिस्ता माझा उद्धार केलास म्हणून मी तुझे आभार मानतो. माझ्या आई वडिलांनी मला जे नाव दिले ते काय आहे तो आशीर्वाद काय आहे हे मला माहित नाही . तरी तू मला याबेस प्रमाणे आशीर्वादीत कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन.

रेव्ह . कैलास [आलिशा ] साठे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole