“यशस्वी विवाह” उत्पत्ती २४:६७


वैवाहिक सुख 

वचन: मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यांत आणले आणि त्याने रिबकाचा अंगीकार केला ती त्याची बायको झाली आणि त्याने तिच्यावर प्रीती केली आणि इसहाक आपल्या आईच्या मरणानंतर सांत्वन पावला. उत्पत्ती २४:६७.

वैवाहिक सुख

इसहाक त्याची आई सारा हिचा खूपच लाडका होता, तिच्या म्हातारपणी तो तिला झाला होता. आपल्या एकुलत्या एक मुलावर ती जीवापाड प्रेम करी. त्यामुळे साराचे जाणे इसहाकाच्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण करून गेले होते. आईच्या प्रेमाला पारखा झालेला इसहाक मातृशोकात बुडाला होता. आईच्या प्रेमाची जागा कशी भरून निघेल? कोणीही ती पोकळी भरून काढू शकत नाही.

येथे आपण पाहतो कि रिबका इसहाकाच्या जीवनात आल्यावर त्याने तिच्यावर प्रीती केली आईच्या जाण्याने जे दुःख त्याला झाले होते त्या पासून त्याला सांत्वन मिळाले. या वरून एक गोष्ट लक्षात येते कि प्रेमच प्रेमाची पोकळी भरून काढू शकते. इसहाकाने आपली आई सारा हिला रिबका मध्ये पाहिले तिच्यावर प्रेम केले त्यामुळे तो मातृविवोगाच्या दुःखातून सावरला.

पती पत्नी मधील प्रेम जीवनाला सर्वांगाने सुखाविते फक्त गरज असते ती एकमेकांकडे योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची. आईच्या मरणाने रिकामा झालेला तिचा डेरा इसहाकाचे मन भकास करून टाकत असावा. आईच्या आठवणींनी भरलेली ती जागा तिच्या नसण्याने त्याच्या मनाला व्याकुळ करत असावी. ती रिकामी झालेली जागा आपली पत्नी रिबका हिच्या द्वारे भरून काढणारा इसहाक आम्हाला पती पत्नीचे नाते किती पवित्र आहे हे शिकवतो. आणि रिबका ती तर खरेच खूप सुसंकृत आशीर्वादित मुलगी होती. ती फक्त इसहाकाच्या आईच्या डेऱ्यात राहायला गेली नव्हती तर त्याची खरीखुरी आई झाली होती म्हणूनच तर तिचे प्रेम त्याला सांत्वन देऊ शकले होते.

पवित्र विवाहा द्वारे पती पत्नीचे एक देह होणे काय असते हे इसहाक रिबका आपल्याला शिकवतात देवाने स्त्रीला पुरुषाच्या देहातून म्हणजे फासळी पासून का बनवले असावे याचे रहश्य हि उलगडते.तसेच पवित्र विवाहाची स्थापना करून तो किती पवित्र वैवाहिक जीवन आशीर्वादित कुटुंब व्यवस्था निर्माण करू इच्छित आहे हे हि लक्षात येते.

प्रार्थना: हे प्रभू येशू पवित्र विवाह संस्थेचा तू संस्थापक आहेस. सर्व पती पत्नींनी एकमेकांवर भरभरून प्रेम करावे त्यांची कुटुंबे आशीर्वादित असावीत म्हणून सर्वांना मार्गदर्शन सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.

रेव्ह कैलास (आलिशा ) साठे

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole