येशू ख्रिस्ताची जगाला गरज का आहे ? उत्पत्ती ६:३.

येशू ख्रिस्ताद्वारे उध्दार !

यहोवा म्हणाला माझा आत्मा मनुष्याशी सर्वकाळ वाद करणार नाही, कारण तो देहही आहे तरी त्याचे दिवस एकशे वीस वर्ष होतील उत्पत्ती ६:३.

प्रस्तावना : देवाचा आत्मा मनुष्याने योग्य मार्गाने चालावे म्हणून त्याच्या विवेकाला आवाहन करीत असतो. पण आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारावयाचे की नाही हे पूर्णपणे मनुष्यावर अवलंबून असते. कारण देवाने मनुष्याला निर्णय स्वातंत्र्य दिले आहे. तरी निर्माणकर्ता म्हणून देवाची हि इच्छा असते की त्याची निर्मिती त्याला अनुसरणारी, पवित्रतेच्या मापदंडांमध्ये जीवन जगणारी असावी. तरी पतित मनुष्य देहाच्या इच्छेच्या अधीन असल्यामुळे आत्म्याच्या प्रेरणा समजून घेत नाही. त्याचा परिणाम देवाचा आत्मा खिन्न होतो. व त्यामुळेच देव म्हणतो की मी मनुष्याशी सर्वकाळ वाद घालणार नाही. कारण तो देहाच्या आधीन आहे म्हणून त्याचे आयुष्य १२० वर्षांपर्यंत सीमित होईल. 

मनुष्याच्या निर्मितीमागे देवाचा विशेष हेतू : देवाने मनुष्याला विशिष्ट उद्देशाने बनवले आहे.  देवाने मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. प्रतिरूप याचाअर्थ प्रतिनिधी, देवाच्या वतीने पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांची व्यवस्था पाहण्या साठी त्याला निर्मिले. त्यामुळे तो नित्य देवाच्या सह्भागीतेमध्ये असावयाचा.उत्पत्ती १:२७-२८. एदेन बागेत देव त्याच्याशी नित्य संवाद साधत असे.

मनुष्याची निर्मिती विशिष्ट प्रकारे केली होती : देवाने मनुष्याला विशिष्ट उद्देशाने निर्मिले आहे हे आपण पाहिले. त्यामुळे त्याची निर्मिती सुध्दा विशिष्ट प्रकारे केली गेली. देवाने मनुष्याला आत्मा जीव शरीर असे निर्माण केले १ थेस  ५:२३. आत्मा आपल्याला देवाच्या सह्भागीतेत ठेवतो स्तोत्र ४२:१-२ आत्म्याद्वारे आपल्याला देवाच्या ईच्छा समजतात व त्याप्रमाणे वागण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होते. देवाने निर्माण केलेला मनुष्य परिपूर्ण होता. त्याचा आत्मा देवाच्या इच्छा समजून घेत होता व जीव व शरीर त्याच्या अधीन असल्यामुळे तो देवाच्या इच्छेनुरूप कार्य करण्यास समर्थ असे. 

पापाचे परिणाम : पाप घडल्या नंतर मनुष्य स्वइच्छा केंद्रित झाला. तो आत्म्याच्या मार्गदर्शनाला म्हणजे देवाच्या ईच्छेला अमान्य करू लागला. हि अवस्था काइन पासून सुरु झाली व पुढे नोहाच्या काळात इतकी वाढली कि देव म्हणतो माझा आत्मा मनुष्याशी सर्वकाळ वाद करणार नाही,कारण तो देहही आहे तरी त्याचे दिवस एकशे वीस वर्ष होतील. 

ख्रिस्ता द्वारे  उद्धार :  शापित मनुष्य देहाच्या प्रेरणांनी वागू लागला. गल ५:१९-२१. हि अवस्था संपणे व पुन्हा मनुष्याने आत्म्याच्या प्रेरणेने वागणे, आत्मिक होणे म्हणजे तारण पावणे होय. हेच सत्य प्रभू येशू निकेदमला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. कि माणसाला आत्मिक रित्या पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे,योहान ३:६. म्हणजे मनुष्याला आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे  देवाच्या ईच्छेने वागेन शक्य होईल ,गल ५:२५. 

जेव्हा एखादा व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्याला आपला उध्दार होण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो. म्हणजे त्याचा मार्गाने चालण्याचा निर्णय घेतो तेव्हा देव त्याच्या निर्णयाचे स्वागत करतो व त्याच्या मूळ पापाची त्याला क्षमा करितो. कारण येशू ख्रिस्ताने मरेपर्यंत देव इच्छेला प्राधान्य दिले, त्याच्यावर विश्वास ठेवणारा देखील देव इच्छेला प्राधान्य देण्याचे घोषित करितो .त्यामुळे देव पुन्हा आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन व सामर्थ्य त्या मनुष्याला कृपेच्या स्वरूपात म्हणा किंवा बक्षीस म्हणून म्हणा देतो हे मात्र नक्की. येथे पुन्हा आत्मिक जीवनाला सुरुवात होते, म्हणून याला ख्रिस्ताद्वारे नवीन जन्म पावणे असे म्हणतात, आता आत्म्याच्या प्रेरणेने वागण्याचे सामर्थ पुन्हा एकदा आम्हाला प्राप्त होते , प्रेषित १:८. तरी आमचा सैताना बरोबरचा लढा संपलेला नाही. सैतानाने प्रभू येशूला दैहिक बनवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रभू येशूने पवित्र शास्रातून त्याला उत्तर देऊन हाकलून दिले. मत्तय ४:१-११. आमच्या साठी हे चांगले उदाहरण आहे कि आपण देवाच्या वचनाच्या आधारावर निर्णय घ्यावेत. आत्म्याच्या मार्गदर्शनात चालावे. म्हणजे जीवन खऱ्या अर्थाने आशीर्वादित होईल. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला नव्या जन्माचा अनुभव दिलास म्हणून मी तुझे आभार मानतो. मला रोज तुझ्या ईच्छेतले जीवन जगण्यास साहाय्य कर . व जगात सर्वांपर्यंत उद्धाराची हि  सुवार्ता पोहचव. येशूच्या नावाने मागतो, आमेन.

रेव्ह कैलास [ आलिशा ] साठे . 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole