“वंश ” उत्पत्ती ४:२६.

वंश 

वचन:
शेथ याला पुत्र झाला त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. उत्पत्ती :२६

प्रस्तावना: शेवटी
काइनने देवाचे ऐकले नाही; त्याने आपल्या भावाचा खून केला. त्याचे रक्त भूमीवर पडले  त्याचा  शाप
काईनवर आला. तो पृथ्वीवर परागंदा
भटकणारा झाला. पुढे काईनच्या वंशात दुष्टाई वाढतच गेली, देवाच्या समक्षतेपासून
हा वंश पूर्णपणे दुरावला.

वंश परंपरा: हाबेल
मृत पावला काइन दुरावला,
त्यामुळे आदाम हव्वा निःसंतान
असल्या सारखे झाले, पण कृपाळू देवाने
पुन्हा त्यांना शेथ दिला. शेथ झाला तेव्हा हव्वा म्हणाली देवाने मला हाबेलच्या जागी शेथ दिला. येथे आईच्या मुखातून निघालेल्या आशीर्वादाचा विचार करा हाबेल नीतिमान होता देवाला प्रिय होता शेथ त्याच्या जागी झाला असे त्याची आई त्याच्या बद्दल
बोलते, पुढे तशेच
अनुभवास येते देवाने शेथ त्याचा वंश
आशीर्वादित केला. हा वंश देवाच्या
समक्षतेत राहिला देवाची 
तारणाची  योजना  पूर्णतेस
नेण्यासाठी उपयुक्त झाला. या वंशात अनोशच्या जन्मला त्याच्या जन्मापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करूलागले, याच वंशातील हनोख देवासंगती चालला देवाने त्याला
त्याच्याकडे घेतले. पुढे नोहा, अब्राहाम, दावीद, याच
वंशात जन्मास आले. पृथ्वी वरील सर्व मानव नोहाच्या तीन मुलांच्या वंशाशी जोडल्या गेले आहेत म्हणून याच वंशा पासून आहेत.

येथे
एक गोष्ट लक्षात घ्यावी;  आदाम
हव्वा यांचा शेथ पासून पुढे गेलेला वंश धार्मिक होता परंतु ; पापाच्या प्रभावापासून किंवा शापा पासून मुक्त नव्हता.आदाम व हवा यांनी केलेल्या आज्ञाभंगाच्या पापाचे परिणाम तो भोगत राहिला तरी देवाच्या कृपेत होता. या वंशातील लोकांना देवाने निवडले व पवित्रतेचा संदेश तो मानवापर्यंत पोहचवत राहिला पुढे  देवाने ह्या वंशात दाविदाच्या घराण्याद्वारे त्याची तारणाची योजना पूर्णतेस नेलीतारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच वंशात जन्मास आला, लूक : २३३८.

प्रभू येशू ख्रिस्तापासून आत्मिक वंश: प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवांसाठी उध्दाराचा मार्ग सिद्ध केला, आदाम व हव्वा यांनी आज्ञाभंगाचे पापा केल्यामुळे सर्व मानवांवर शाप आला व ते पापाच्या आधीन जन्मास येऊ लागले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मरेपर्यंत संपूर्ण आज्ञापालन केल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्व आदामाने केलेल्या आज्ञाभंगाच्या शापापासून व पापापासून मुक्त होतात.रोम : १८२१.

प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे देव त्यांना पवित्र आत्म्याच्या व्दारे नवीन आत्मिक जन्म देतो. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो स्वतःचा वंश
आसा स्वीकारतो त्यांच्यावर पाप आधिराज्य  गाजवत नाही.योहान :१६२१.
या वंशाला देवाने अति श्रेष्ट स्थान दिले आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास देवाचे त्याचे वचन सांगते,”तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकवर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहा, यासाठी की ज्याने तुम्हांस अंधारातून आपल्या अद्द्युत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिध्द करावे. ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता’ आतां तर देवाचे लोक आहा; तुम्हांस दयेची प्राप्ती झाली नव्हती, आतां तर ‘दया मिळाली आहे’   पेत्र :.

प्रार्थाना:
हे प्रभू येशू स्वरुधिराने तू मला निष्कलंक
केले, स्वप्राण अर्पून मला नव जीवन दिले. तुझा वंश म्हणून आत्मिक जीवन जगताना, आता माझ्या हातून पाप होवो म्हणून
माझ्यावर अनुग्रह कर, माझ्या जीवनाच्या द्वारे तुला गौरव मिळू दे येशूच्या नावाने
मागतो, आमेन.

रेव्ह . कैलास [आलिशा ] साठे .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole