वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये

 वाढदिवसासाठी बायबल वचने 

वाढदिवसासाठी बायबलची वचने

१] यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६.

२] तुमच्या वृध्दापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांस वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे; मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन. यशया ४६:४ 

३] तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. यशया ४०:३१ 

४] “तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तुला देवो आणि तुझे सर्व संकल्प परिपूर्ण करो” स्तोत्र २०:४

५] आणि तू यहोवाच्या ठायी आनंद कर, म्हणजे तो तुला तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल . तू आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर; आणि त्याच्यावर भाव ठेव; म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. स्तोत्र १३७:४-५

६] यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे; आणि पवित्राला ओळखणे हीच बुद्धी आहे, कारण माझ्याकडून तुझे दिवस बहुतपट होतील आणि तुझ्या आयुष्याची वर्षे वाढतील नीती :९:१०-११

७] जो वचनाकडे लक्ष लावतो तो हित पावेल, आणि जो यहोवाच्या ठायी भरोसा ठेवतो तो सुखी आहे. नीती १६:२०

८] सर्वदा आनंद करा. प्रार्थना अखंड करा. प्रत्येक गोष्टीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हा विषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. १ थेस्सल ५:१६-१८

९] शांतीचा देव तुम्हांबरोबर असो. आमेन. रोम : १५:३३

१०] तर शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लौकरच चेंगरील आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हांबरोबर असो. आमेन. रोम १६:२०

११] अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे आणि त्याची प्रेमदया सर्वलकाल आहे. स्तोत्र १०७:१

१२] तू आपल्या उपकाराने वर्ष मुकुटमंडित करतोस, आणि तुझ्या वाटा समृद्धी गळतात स्तोत्र ६५:११

१३] यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे ; मी कोणाला भिऊ? यहोवा माझ्या जीवाचे बळ आहे; मी कोणाचे भय धरू ? स्तोत्र २७:१ 

१४] यहोवा त्यांचे बल आहे, तो आपल्या अभिषिक्तला तरुणाचा गढ आहे. स्तोत्र २८:८

१५] दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करीन, आणि माझे तारण मी त्याला दाखवील. स्तोत्र ९१:१६.

१६] जो दिवस यहोवाने केला आहे तो हाच आहे, यात आम्ही उल्हास व आनंद करू स्तोत्र ११८:२४

१७] कारण तुम्हाविषयी मी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो; तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत, आणि आरिष्टचे नाहीत असे यहोवा म्हणतो. यिर्मया २९:११

१८] मी ठराव सांगतो : यहोवाने मला म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्यापाशी माग  म्हणजे मी राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझे धन असे देईन . स्तोत्र २:७-८

२०] प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा; मी पुनः सांगतो आनंद करा फिली ४:४

२१] कशाचीही चिंता करू नका; तर सर्व गोष्टींविषयीं उपकार स्तुतीसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे; ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. फिली ४:६-७.

२२] मला सबळ करणारा [ ख्रिस्त ] याच्याकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे फिली ४:१३

२३] कारण  देवाने आम्हांला घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला आहे.२: तिमिथ्य १:७

हि वचने पवित्र शास्त्र बायबल मधून घेतली आहेत .

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole