विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये

विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये 

विश्वास

 १] विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयी भरवसा, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयींची खात्री आहे. इब्री ११:१.

२] यावरून मी तुम्हांला सांगतो, सर्व वस्तू , ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हांला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा. म्हणजे त्या तुम्हांला मिळतील. मार्क ११:२४.

३] त्याच्यामध्ये आम्हांस त्याच्यावरच्या विश्वासाने धैर्य व भरंवशाने देवाजवळ जाणे हि मिळाली आहेत इफिस ३:१२.

४] विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृद्यामध्ये वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीती मध्ये मुलावलेले व पाया घातलेले असून. ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी व लांबी, व खोली व उंची हे तुम्हीं सर्व पवित्रांच्या बरोबर समजून घ्यायला, आणि खरिपाची प्रीती जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला, शक्तीमान व्हावे, असे की तुम्हीं देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण व्हावें. इफिस  ३:१७-१९.

५] आणि नियमशास्राच्या द्वारे जे माझे स्वतःचे न्यायीपण ते नसलेल्या, पण जे ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे मिळते जे न्यायीपण देवापासून विश्वासाच्या द्वारे आहे ते असलेल्या मी त्याच्यामध्ये सापडावे. फिली ३:९

६] कारण येशू मेला व पुन्हां उठला, असा आपण विश्वास धरतो, तर तसेच जे येशूमध्ये निजलेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. १ थेस ४:१४

७] मी या कारणावरून दुःखे मी सोसतो, तरी मी लाजत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला तो मला माहित आहे आणि मला भरंवसा आहे की, तो माझी ठेव त्या दिवसापर्यंत सांभाळायला शक्तीमान आहे. २ तिम १;१२

८] तर आकाशांमध्ये पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण आपले विश्वासाचे पत्करणे बळकट धरूं या. इब्री ४:१४

९]कारण आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पहात चालत नाही . २करिंथ ५:७

१०] तरी माणूस नियमशास्रातील कर्माकडून न्यायी ठरत नाही, केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाकडून  न्यायी ठरतो, असे जाणून आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, यासाठीकी आपण नियमशास्रातील कर्माकडून नव्हे तर ख्रिइस्तावरील विश्वासाने न्यायी ठरावे, कारण मनुष्यजातीतील कोणीही नियमशास्रातील कर्माकडून न्यायी ठरणार नाह,  गलती २:१६

११] मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे, आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आणि आता जे देहात माझे जिने आहे ते विश्वासात; देवाच्या पुत्राच्या ठायी जो विश्वास त्यात आहे त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरिता दिले. गलती २:२०

१२] ज्याप्रमाणे अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला न्यायीपण असे गणण्यात आले, तसे हे आहे. तर या वरून तुम्ही जाणा की जे विश्वासाचे आहेत तेच अब्राहामाने संतान आहेत. आणि देव राष्ट्रांच्या लोकांना विश्वासाकडून न्यायी ठरवील, हे अगोदर पाहून शास्त्रलेखाने पूर्वीच अब्राहामाला शुभवर्तमान सांगितले की, तुझ्या मध्ये सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील . म्हणून जे विश्वासाचे आहेत ते विश्वासी अब्राहामाबरोबर आशीर्वादित होतील . गलती ३:६-९.

१३] विश्वासाकडून न्यायी ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपणास ख्रिस्ताकडे पोहचवण्यास बालकांचा शिक्षक असे झाले गलती ३:२४.

१४] आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पहात आहो. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही व असुंताही नाही परंतु प्रीतीकडून कार्य करणारा विश्वास तो मात्र आहे. इफिस ५:५-६.

१५] आता आशेचा देव, विश्वास धरण्याकडून तुम्हांस संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, असे कि   पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तुम्हांला आशा विपुल व्हावी. रोम १५:१३

१६] पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट, जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्या सारखा आहे. याकोब १:६

१७] कारण तुम्हाला ठाऊक आहे कि, तुमच्या विश्वासाची परीक्षा हि सहनशीलता निर्माण करते. याकोब १:३

१८] जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्याशक्तीने विश्वासाच्याद्वारे राखलेले आहा. त्या विषयी तुम्ही उल्हासता, तरी आतां थोड्यावेळ नानाप्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हांला भाग आहे, यासाठी की जे नाशवंत सोने अग्नीच्या योगे पारखले जाते त्यापेक्षां तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे, ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस स्तुती, व मान, व गौरव यांस योग्य अशी निघावी. १पेत्र १ ५-७.

१९] परंतु विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. इब्री ११:६

२०] येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नाही काय?योहान ११:४०.

२१] तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर ! विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत मार्क ९:२३

२२] त्याला तुम्ही पाहिले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करिता, आता जरी तुम्ही त्याला पहात नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत, तुम्ही अनिर्वाच्य व गौरवयुक्त आनंदाने उल्हासता, कारण तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम, म्हणजे जीवाचे तारण पावत आहा. १ पेत्र १:८-९

२३] आणि प्रार्थनेत विश्वास धरून जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हांस मिळेल, मत्तय २१:२२

२४] येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेळा तरी जगेल, आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणारच नाही, याचा तुला विश्वास आहे काय? 

२५] हे देवाच्या माणसा, तू तर या पासून पळ आणि न्यायीपण, सुभक्ती, विश्वास, प्रीती , सहनशीलता, लीनता, यांच्या पाठीस लाग. १ तिम ६:११ 

२६] येशूने म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला राहणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तान्हेला होणार नाही. योहान ६:३५

२७] तुम्ही सावध असा, विश्वासात स्थिर राहा, शूर व्हा, खंबीर असा,१: करिंथ १६:१३

२८] परंतु जितक्यांनी त्याला अंगिकारले तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. 

;

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole