साप व सैतान उत्पत्ती ३:१

वाईटचे प्रतीक साप 

परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय? उत्पत्ती :

साप व हव्वा

प्रस्तावना : आपला स्वभाव अनेकदा आपल्याला अडचणीत आणतो, भोळा स्वभाव, चलाख स्वभाव, धूर्त स्वभाव, असे स्वभावाचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत. भोळ्या स्वभावाचा अनेक लोक फायदा घेतात. पण धूर्त, चलाख स्वभावाचा सैतान फायदा घेतो. सापाच्या बाबतीतही हेच घडले. 

वाईट स्वभाव सैतानापासून प्रभावित असतो: उत्पत्ती ३:१ या वचनातआपण बहुदा सापाच्या ठिकाणी सैतान पाहतो; ते खरे आहे पण पूर्णपणे खरे नाही. कारण तो सापाचं होता. वरील वचन सांगते कि देवाने त्याला सर्प असेच निर्माण केले होते. त्याला शिक्षा देतानाही देवाने सर्प असेच गणिले आहे, उत्पत्ती :१४. मग आपण त्याच्या मध्ये सैतानाला का पाहतो
कारण त्याचा स्वभाव सैताना पासून प्रभावित आहे योहान :३७५०. सांगते सैतान हा पहिल्यापासून मनुष्य घातकी,लबाड लबाडाचा बाप आहे. याचा अर्थ सैतानाने मनुष्याचा घात करण्यासाठी सापाला वापरले हे 
खरे आहे. आता सैतान सापाला का वापरू शकला किंवा कशामुळे सापात हा स्वभाव आला, किंवा कशामुळे तो सापाचा बाप झाला? हे जरी आम्हाला कळले नाही तरी हे सत्य आहे कि सैतान जीवांचा ताबा घेऊ शकतो त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे प्रभावित जीव स्वतःच्या 
इतरांच्या 
वाईटास कारण होतो. साप मानवाच्या पतनास कारण झाला, त्याच्यामुळे देवाच्या निर्मितीवर शाप आला तो स्वतःही शापित झाला. या नंतर त्याची अशुध्द प्राण्यात गणना झाली कारण यापूर्वी तो सरपटणारा नव्हता, लेवीय ११:३१. इतकेच नाही तर तो पुढे दुष्टतेचे म्हणजे सैतानाचे प्रतीक झाला, प्रगटीकरण १२:.

सैतान उध्दारिलेल्यांचा शत्रू आहे : आज पतित मानव सैतानाच्या अधिपत्याखाली आहे, त्याचे आचार विचार सैताना द्वारे प्रभावित आहेत उध्दारिलेल्याना फसवण्याचा किंवा प्रभावित करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत आहे. पेत्र :. सांगते,” सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहा सारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. 

प्रार्थना: हे प्रभू येशू 
तू माझा उध्दार केला म्हणून मी तुझे आभार मानतो. माझे विचार आचार तुझ्या ठायी राख, मला नेहमी इतरांसाठी आशीर्वाद आसू दे . येशूच्या नावाने मागतो. आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole