“सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.

वचन: परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत राखण करण्यास ठवले.उत्पत्ती : १५.

 

एदेन बाग

देवाने पृथ्वीच्या पूर्व भागात एदेन नावाच्या प्रदेशात बाग लावली या बागेला एदेन बाग म्हटले आहे. एदेन याचा अर्थ आनंद आसा आहे. पवित्र शास्रात याचा आनंदमय ठिकाण असा उल्लेख आढळतो. देव सियोनचे सांत्वन कशा प्रकारे करणार आहे याचे वर्णन करताना यशया संदेष्टा म्हणतो, “देवाने सियोनेचे रान एदेन बागेसारखे केले आहे तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला आहे. तेथे आनंद, उल्हास, उपकारस्मरण, गायनवादन होत आहे. यशया : ५१:. सोरेचा राज्याच्या ऐश्वर्याचे भयावह पतनाचे वर्णन करताना यहेज्केल त्याची तुलना एदेनाशी करून म्हणतो,’ तू पूर्णतेची मुद्रांच आहेस, तू ज्ञानाने पूर्ण सर्वांग सुंदर आहेस, देवाचा बाग एदेन यात तू होतास, अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाच, माणिक सोने असे अनेक प्रकारचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली
यहे: २८:१२१३. सोरेचा राजा किती ऐश्वर्ययुक्त होता हे सांगण्यासाठी यहेज्केल एदेन च्या ऐश्वर्याचे उदाहरण देतो पुढे त्याचे पतन कसे झाले त्याचे वर्णन आहे.

देवाने मनुष्याला अशी सर्वांग सुंदर ऐश्वर्ययुक्त बाग अर्थात सर्वांग सुंदर जीवन दिले होते, तो देवाचे प्रतिरूप असा अभिषिक्त होता, तो देवाच्या समागमे राहणारा त्याचे मनोरथ पूर्ण करणारा होता, आनंदाच्या ठिकाणी त्याची अमर 
वस्ती होती, परंतु पापाने त्याचे जीवन शापित झाले, सुखी, आनंदी, अमर जीवनाच्या जागी; दुःखी, अशांत मरण युक्त जीवन त्याच्या वाट्याला आले.

देव राज्य

पण चांगली बातमी हि आहे कि आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे पुन्हा आशीर्वादित देवराज्याकडे वाटचाल करत आहेत जे एदेन बागे पेक्षा अतिशय उत्कृष्ट आहे. सनातन देवाने ते त्याच्या निवडलेल्यांसाठी योजिले आहे, त्याला देवाचे गौरव प्राप्त आहे. त्याला स्फटिकांप्रमाणे लखलखीत प्रभा आहे, ते निर्मळ काचे प्रमाणे आहे, त्याच्या कोटाचे पाये मौलवान पाषाणांनी शृंगारली आहेत , पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाच, पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्नराग. असे बारा कोट आहेत व त्यांना प्रेषितांची नावे दिली आहेत. त्याची एक एक वेस एका एका मोत्याची आहे, अश्या बारा वेशी  वेशी नावीन्यपूर्ण अशा आहेत व त्यांना इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे दिली आहेत. तेथील रस्ते निर्मळ सोन्याचे पारदर्शक काचे प्रमाणे आहेत. देवाच्या गौरवाने ते प्रकाशित आहे. तेथे देवाची सहभागिता नित्य  आहे,  तेथे जीवनाच्या पाण्याची नितळ नदी आहे. नदीच्या दोन्ही काठांवर जीवनाचें झाड आहे त्याला बारा प्रकारची फळें आहेत , प्रत्येक महिन्याला ते फळें येतात, व या झाडांची पाने राष्ट्रांच्या आरोग्याकरिता आहेत. तेथे देवाच्या कोकऱ्याचे राज्यासन आहे, त्याची सेवा नित्य घडणार आहे. प्रगटीकरण २१,२२. वाचा.

देव राज्य

प्रार्थना:हे प्रभू येशू माझा उध्दार करून मला पुन्हा आशीर्वादित केले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. देवराज्याचे सर्व आशीर्वाद मला वर्तमान जीवनात प्राप्त होउदे भविष्यातील सुखलोक युगानुयुगांच्या जीवनाकडे मला घेऊन चाल. तू माझ्यासाठी निर्माण केलेल्या सर्वांगसुंदर अशा वैभवी सार्वकालिक जीवनाची मला आशा आहे.येशूच्या नावाने मागतो. आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole