“स्त्री पुरुष नाते” उत्पत्ती २:२३.

पुरुष व स्त्री 

यास्तव पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील ती दोघे एकदेह होतील.उत्पत्ती :२३.

देवाने स्त्रीला पुरुषाच्या फासळी पासून बनवले. देवाने स्त्रीला माती पासून नक्कीच बनवले असते. परंतु त्याने एका देहातून दुसरा देह निर्माण केला. देवाने असे का केले असावे या बद्दल अनेकांनी अनेक मते मांडली 
आहेत.

स्त्री व पुरुष

मॅथू 
हेनरी 
म्हणतात कि, ” स्त्री जर डोक्यापासून बनवली असती तर ती पुरुषाच्या वरचढ झाली असती किंवा त्याच्या डोक्यावर बसली असती. आणि जर पायापासून बनवली असती तर त्याने तिला पायी तुडवले असते. पण तिला त्याच्या बरोबरीची तिच्या रक्षणासाठी त्याच्या दंडा खालून तिच्यावर प्रीती करावी म्हणून हृदयाजवळून फासळी घेऊन तिला बनवले.” पण आदाम स्त्रीकडे पाहून अगदी यथार्थ प्रतिक्रिया देतो तो सरळ म्हणतो, ” हा माझादेह आहे, माझ्या पासून निर्माण झाला, यास्तव आमच्यात भेद नाही, आता मी हिच्याशी जडून राहीन अगदी इतके कि एक देह असल्यासारखे.” मला वाटते कि आदामाच्या ह्या उत्स्फुर्त प्रतिक्रियेला देवानेआमेनअसाच प्रतिसाद दिला असेल, कारण देवालाही हेच अभिप्रित असावे म्हणूनच त्याने नरापासून नारी बनवली असावी. आता आदाम एकदेह होण्याचा परिणाम विदित करत आहे कि या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील ते दोघे एकदेह होतील. याचा अर्थ आई वडिलांना सोडून वेगळे राहणे होत नाही तर आता त्यांच्यावर आलेल्या कुटुंब विषयक, सामाजिक आध्यात्मिक जबाबदाऱ्यांना त्या दोघांना मिळून पार पडायचे असल्यामुळे त्यांचे कर्तव्य विश्व भाव विश्व वेगळे होईल इतकेच. आईवडिलांचा आदर करणे त्यांची काळजी घेणे या जबाबदाऱ्यांना ते बांधील असतीलच यात शंका घेण्याचे कारणच नाही, आईवडिलांचा मान राखावा हि आज्ञा देवाने अद्यक्रमाने दिली आहे. आई वडिलांनी त्याच्याप्रती त्यांची जी कर्तव्य होती ती जशी पूर्ण केली तशी त्याला आता त्याच्या पत्नी बरोबर त्यांच्या पुढील पिढीसाठीची कर्तव्य पूर्ण करावयाची आहेत. या अर्थाने 
तो आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या 
पत्नीशी जडून राहील.

 प्रार्थना: हे प्रभू येशू तू विवाह संस्था स्थापित केली म्हणून मी तुझे आभार मानतो. तिचे पावित्र्य सर्वाना कळूदे प्रत्येक कुटुंब तुझ्या शांतीत, प्रीतीत, सह्भागीतेत नांदुदे. येशूच्या नावाने मागतो आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole