वचन: अब्राहामाने दुसरी बायको केली तिचे नाव कटूरा होते. उत्पत्ती २५:१.
पवित्र शास्त्र अब्राहामाच्या दुसऱ्या लग्ना बद्दल जास्त माहिती देत नाही. रिबकाच्या मृत्यू नंतर त्याने कटूरा नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले व त्याला सहा मुले झाली इतकेच सांगितले आहे. कारण पवित्र शास्त्र देवाच्या तारणाच्या योजनेला अधिक महत्व देते. तरी इतर लेखातून काही माहिती उपलब्ध आहे पण त्या माहिती बद्दल सत्यतेची खात्री देता येत नाही. काही यहुदी अभ्यासक असा दावा करितात कि कटूरा हि दुसरी स्त्री नव्हती तर हागार होती. यहुदी भाष्यकार राशी यांच्या मते तिला ‘’कटूरा” असे म्हटले याचे कारण तिचे वागणे मंदिरातील सुगंध जसा आनंददायी असतो तसे तिचे वागणे होते. ती अब्राहामाशी प्रामाणिक राहिली तिने मधल्या पन्नास वर्षात कोणापुरुषा बरोबर संबंध ठेवला नाही. साराच्या मृत्यूनंतर इसहाकाने तिला पुन्हा अब्राहामा कडे आणिले. परंतु पवित्र शास्त्र असे काही सांगत नाही व बरेच अभ्यासक याला विरोध करितात. त्यांच्या मते ती पूर्णतः वेगळी स्त्री होती पवित्र शास्त्रात तिच्या बद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. पण अभ्यासक ती कुश वंशातील होती असे मानतात. गणना १२:१. परंतु काही ती अब्राहामाच्या घरातील चाकर होती असे मानतात. हागारला सोडल्यानंतर अब्राहामाने तिच्याशी लग्न केले असावे असे काहींचे मत आहे कारण एकसे चाळीस वर्षाचा असताना जर हे लग्न झाले तर त्याला पुढे सहा मुले झाली हे त्यांना पटत नाही. पण अनेक भाष्यकार हे मानतात कि ती अब्राहामाच्या घरी जन्मलेली चाकर होती, साराच्या मृत्यू नंतर त्याने तिला बायको करून घेतले व त्यांना पुढे सहा मुले झाली. वयाच्या शंभरी मध्ये असताना आपल्याला मूल कसे होईल असा प्रश्न पडणाऱ्या अब्राहामाला वयाच्या एकशेचाळीस वर्षांनंतर सहा मुले झाली. तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगाला. देवाच्या संगती त्याचा प्रवास शंभर वर्षाचा होता या काळात देवाने त्याचे संरक्षण केले, त्याला यश दिले, त्याचा मानसन्मान वाढवला, त्याला अभिवचनाचा पुत्र इसहाक दिला, इश्माएल दिला त्याच्या खातर त्याला आशीर्वादीतही केले. त्याच्या इच्छे नुसार सून दिली दिली. व शेवटी कटूरा व सहा पुत्र. तो चांगला म्हातारा झाला पृथ्वीवरील जीवन येथेच्छ जगल्यानंतर तो देवाकडे सदासर्वकालच्या सुखा साठी गेला. देवाने खरोखर त्याला आशीर्वाद मूलक केले यात शंका नाही. उत्पत्ती १२:१–३. अब्राहामाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, दुःख व नैराश्याच्या दऱ्या खोऱ्या तुडवत हा प्रवास पुढे गेला हे खरे असले; तरी अब्राहामाचा हा जीवन प्रवास आशीर्वादित व सुखाकडून सुखाकडे जाणारा वाटतो.
प्रार्थना: हे प्रभू येशू मी तुझ्या द्वारे अब्राहामाच्या आशीर्वादांचा भागी झालो म्हणून मी तुझे आभार मानतो. विश्वासाचे जीवन जगण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
रेव्ह.कैलास [अलिशा ]साठे .
वचन: जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही, आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. १ करिंथ ८:४.
करिंथ येथे त्याकाळी खूप मूर्तिपूजा चालत असे, काही विशेष प्रसंगी सामुदायिक भोजन समारंभ आयोजित केले जात असत. संपूर्ण शहर आशा कार्यक्रमात भाग घेत असे. काही विद्वान ख्रिस्ती या भोजन समारंभात मूर्तींच्या मंदिरात भोजन करीत, तर काही दुविधा मनःस्थिती मध्ये राहात कारण त्यांना वाटत असे कि मूर्ती मध्ये ते दैवत वास करिते व जर आपण ते खातो तर आपण विटाळतो.या परिस्थितीत त्यांच्या मध्ये वादविवाद होत असत. ईश्वरपरिज्ञानामुळे स्वतःला विद्वान समजणारे लोक त्यांच्या खाण्या पिण्याचे समर्थन करताना मूर्ती शून्य आहे, खाण्यापिण्या मुळे काही फरक पडत नाही असे सांगत, यशया ४०:२५–२६. संत पौलाला यामुळे भीती वाटत होती कि स्वतःला शहाणे समजणाऱ्या या विद्वानांनमुळे, दुविधा अवस्थेतील भाऊ बहिणी अडखळून पुन्हा निरर्थक गोष्टींच्या मागे लागतील. त्यामुळे तो या विद्वानांना खडे बोल सुनावतो कि आपल्या भावा बहिणींशी प्रितीने वागा.त्यांच्यासाठी आशा गोष्टीन पासून दूर राहा.
ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी कधीच नसते, हे सामुदायिक कर्तव्यांनी बांधलेले जीवन आहे.तुमचे ज्ञान, सामर्थ्, आत्मिक दाने हि सर्व आत्मिक भावा बहिणींच्या उन्नतीसाठी उपयोगात आणायची असतात.संत पौल म्हणतो,‘खाण्यामुळे मी जर आपल्या बंधूला अडखळण होत असेल तर मी त्याला अडखळू नये म्हणून कधीच मांस खाणार नाही.’१ करिंथ ८: १३.
प्रार्थना: हे प्रभू येशू मला माझी आत्मिक कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडता यावी म्हणून सहाय्य कर .येशूच्या नावाने मागतो.आमेन.
रेव्ह .कैलास [अलिशा] साठे.
Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browserDisable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×