वचन:
नोहाने
यहोवा
साठी
वेदी
बांधली;
आणि
त्याने
सर्व
शुध्द
पशूतुन
व
सर्व
शुध्द
पक्षातून
काही
घेतले
आणि
वेदीवर
होमार्पणे
अर्पिली,
उत्पत्ती
८:२०.
logspot.com/-x386DAlC_-E/YQQwOU01-OI/AAAAAAAAF5o/hjSAaTuQTMgyoXX6OUuUDX9QKLoukjvfgCLcBGAsYHQ/w320-h213/altar.webp" title="वेदीचे महत्व व स्वरूप" width="320" /> |
वेदी |
प्रस्तावना: महाजलप्रलयातून बाहेर आल्याबरोबर नोहाने पहिले काम केले ते म्हणजे देवाची
उपकारस्तुती. त्याने वेदी बांधली व त्या वेदीवर शुध्द पशू व पक्षातून काही पशु पक्षी घेतले व त्यांचे होमार्पणे केली. त्याच्या या भक्तीला देवाने
सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वीकारले. त्याच्या या भक्तीमुळे देवाचा मानवावरील क्रोध शमला. या वरून हे स्पष्ट होते की वेदी व होमार्पणे यांना आत्मिक जीवनात अतिशय महत्व आहे.
वेदी : पवित्र शास्त्रात वेदी प्रामुख्याने तीन कारणासाठी बांधलेली आढळते. पहिले कारण म्हणजे देवाला अर्पणे करण्यासाठी, उत्पत्ती ८:२०, २२:९ , निर्गम ३०:२८, आणि दुसरे म्हणजे देवाचे नाव घेऊन प्रार्थना करण्यासाठी,उत्पत्ती १२:७, १३:४, आणि तिसरे कारण म्हणजे देवाच्या कृपेचे व सामर्थ्याचे स्मरण राहावे म्हणून त्याच्या स्मरणार्थ वेदी बांधल्या जाई. निर्गम १७:१५, यहोशवा ४:१९-२४.
काइन व हाबेल यांनी वेदी बांधून अर्पणे अर्पिल्याचा उल्लेख नाही परंतु त्यांनी सुध्दा वेदीवरच ती अर्पिली असावीत. कारण मानवाला देवाला भक्ती अर्पिण्याच्या प्रेरणा व मार्गदर्शन देवाकडूनच येते. पवित्र शास्त्रात नोहाने प्रथम वेदी बांधून होमपर्ण अर्पिल्याचा उल्लेख आहे. सुरवातीला जमिनीचा उंच ओटा तयार करून त्यावर अर्पणे अर्पिल्या जात असत अर्थात अशा प्रकारची वेदी तयार करण्याचे मार्गदर्शन देवानेच दिल्याचे आपण पाहतो. निर्गम २०:२४. पुढे २५ व्या वचनात देव न घडवलेल्या दगडाची वेदी करावी व तिला पायऱ्या असाव्यात असे मार्गदर्शन करताना आपण पाहतो. निवास मंडपासाठी देवाने बाभळीच्या लाकडाची वेदी बनवून तिला पितळेने मढवण्याचे मार्गदर्शन केले. शलमोन राजाने जेंव्हा देवाचे मंदिर बांधले तेव्हा त्याने ते गंधसरु व सोन्याने मढवले. त्या मंदिरातील वेदी त्याने गंधसरु ने तयार करून सोन्याने मढवली. अशाप्रकारे देवाच्या लोकांनी देवाच्या समक्षतेला आदर व सन्मान देण्यासाठी व त्याच्यावरील प्रीती व्यक्त करण्यासाठी त्याने घालून दिलेल्या व्यवस्थेला अतिशय समर्पित वृत्तीने स्वीकारले, व आपले सर्व सामर्थ्य खर्च करीत त्याला गौरव देण्याचा प्रयत्न केल्याचे आपण पाहतो.
वेदीचे महत्व: वेदी म्हणजे देवाच्या पवित्र समक्षते साठी वेगळी केलीली, पवित्र केलेले ठिकाण. जेथे त्याचे लोक त्याची भक्ती करतात व तो त्यांना दर्शन देऊन आशीर्वादित करतो अशी जागा. देवाने जेंव्हा जेंव्हा त्याच्या लोकांना आशीर्वाद दिला, त्यांना सोडवले, जय दिला, तेंव्हा तेंव्हा त्यांनी वेदी बांधून त्याची उपरस्तुती केली, त्याच्याकडे प्रार्थना केली, व त्याच्याशी वाचा बांधली. उत्पत्ती ८:२०, १२:८, १३:४, निर्गम १७:१५, यहोशवा ४:१९-२४.
नव्या करारातील वेदी व तिचे महत्व:
नव्या करारात वेदीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे. आता त्याचे लोक त्याची समक्षतता सदोदित अनुभवत आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांच्या मूळ पापाचे परिपूर्ण क्षालन झाले आहे. बंधुंचे सहभागितेचे जीवन त्यांना देवाच्या ज्ञानात, सामर्थ्यात व ख्रिस्ताच्या प्रतिरूपात परिपूर्णते प्रत वाढवते. म्हणून वधस्तंभाचे स्मरण चिन्ह अंतःकरणात जागृत ठेवत, मंडळीच्या ऐक्यतेच्या जीवनात समर्पित राहणे, म्हणजे या जगाशी समरूप न होता, संपूर्ण पवित्रतेच्या अनुभवा प्रत वाढण्यासाठी, देवाचा आपल्या विषयीचा उत्तम मनोदय समजण्यासाठी व तो पूर्ण होण्यासाठी,आपली शरीरे देवाला जिवंत, पवित्र, व ग्रहणिय असा यज्ञ अशी समर्पित करावीत, हेच आजच्या वेदीचे व भक्तीचे स्वरूप आहे. इब्री १३:७-१६, रोम १२:१-२१, प्रेषित २:४२-४७.निष्कर्ष: देवाने नोहाला, त्याच्या कुटुंबाला,व सर्व प्राणिमात्रांतील निवडक प्राणिमात्रांना वाचवले, त्याच्या या कृपेला कृतज्ञतेणे प्रतिसाद देण्यासाठी, नोहाने वेदी बांधली व त्यावर होमार्पणे करून त्याने देवाची भक्ती केली. तेंव्हा देवाची समक्षता त्याला लाभली व त्याच्या जीवनाचा
उद्धेश या ठिकाणी पूर्ण
झाला असे म्हटले तर वावगे होणार
नाही. कारण परमेश्वर म्हणाला,’मी मनुष्यामुळे जमिनीला
पुनः या
पुढे शाप देणार नाही. उत्पत्ती ८:२१ या
वचनाला उत्पत्ती ५:२९ द्वारे
समजून घ्या. जेव्हा नोहाचा जन्म झाला तेव्हा त्याचा बाप लामेख याने त्याचे नाव नोहा ठेऊन त्याच्यासाठी ‘ घोषित केले की;’ जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाने आमचे काम व आमच्या हाताचे
कष्ट या विषयी हा
आम्हास आराम देईल.
नोहाच्या भक्तिमान जीवनामुळे देव, भूमी , सर्व प्राणिमात्र व मानव यांच्यात
शांतता स्थापित झाली. देवाचा क्रोध शमला व त्याने
सृष्टीच्या या नव्या प्रारंभाला
आशीर्वाद दिला त्याच बरोबर देवाने नोहा व सर्व प्राणिमात्रांबरोबर
सर्वकाळचा करार केला कि तो या
पुढे कधीही पृथ्वीचा नाश पाण्याने करणार नाही.
इब्री १३; १५–१६ सांगते,
त्याचे नाव पत्करणाऱ्याने ‘ओठाचे फळ‘ असा स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पावा. चांगले करण्यास व दान करण्यास
विसरू नये; कारण आशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.आज आपण ख्रिस्ताच्या
द्वारे जी उपकारस्तुती करतो
व त्याच्या गौरवा साठी जी सत्कर्मे करतो
ती देव यज्ञा प्रमाणे प्रिय मानतो व संतुष्ट होतो.
गलती ६:९ सांगते,
चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर
यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. आपण ‘ओठाचे फळ‘ असा स्तुतीचा यज्ञ आत्मिक वेदीवर नित्य अर्पण करू व नोहा प्रमाणे
देवाच्या बरोबर चालून या अंधारातील जगासाठी आशीर्वादाचे माध्यम होऊ.
चांगला शमरोनी |
प्रार्थना : हे प्रभू येशू
आज तुझ्या द्वारे मी परमपवित्र स्थानात
ओठाचे फळ, स्तुतीचा यज्ञ व सत्कर्मे घेऊन येऊ
शकतो म्हणून मी तुझे आभार
मानतो. चांगले करण्यास मी थकू नये
व नित्य उपकारस्तुती करावी म्हणून माझे सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.
रेव्ह. कैलास साठे (आलिशा )