अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये

अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये

 अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये 

१] आणि तुम्हाविषयी तर, तुम्हांला जो अभिषेक त्याच्या पासून मिळाला आहे. तो तुम्हां मध्ये राहतो, आणि तुम्हांला कोणी शिकवावे याची तुम्हांला गरज नाही, पण त्याच्यापासून जो अभिषेक जो तुम्हांला सर्वांविषयी शिकवतो, आणि तो तर खरा आहे, खोटा नाहीच, आणि जसे त्याने तुम्हांला शिकवले आहे आहे, तसे त्याच्यामध्ये रहा. १ योहान २:२७.

२] आणि जो पवित्र त्याच्यापासून तुम्ही अभिषेक पावला आहा. १ योहान २:२०a 

३] आता जो तुम्हांसहित आम्हांस  ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांस अभिषेक केला, तो देव आहे. २ करिंथ १:२१.

४] प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला, पाडाव केलेल्याना सुटका व आंधळ्यांना दृष्टी हे गाजवायला, ठेचलेल्याना मोकळे करून पाठवायला, आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्याने मला पाठवले आहे. यशया ६१:१-२, लूक ४:१८.

५] आणि निमशीचा मुलगा येहू याला इस्रायलचा राजा होण्यास अभिषेक कर; आणि आबेल-महोला येथला शाफाटाचा मुलगा अलीशा याला तुझ्या ठिकाणी भविष्यवादी होण्यास अभिषेक कर. १ राजे १९:१६

६] आणि तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओतून सांग, यहोवा असे म्हणतो, मी तुला इस्राएलावर राज्य करायला अभिषेक केला आहे, २ राजे ९:३a 

७] मग शमुवेलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला; आणि शमुवेल उठून रामा येथे गेला. १ शेमुवेल १६:१३

८] तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, यहोवाने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले कि नाही? १ शमुवेल १०:१

९] कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध ह्या नगरात राष्ट्रांचे लोक व इस्राएल लोक यांच्या बरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले, प्रेषित ४:२७

१०] आपराधाचा शेवट करावा आणि पापांचा अंत करावा, आणि अन्यायाचे प्रायश्चित्त करावे व सनातन न्यायीपण आत आणावे, आणि दृष्टांत व भविष्यवाद मुद्रित करावे, आणि परमपवित्राला अभिषेक करावा यासाठी, तुझ्या लोकांविषयी व तुझ्या पवित्र नगराविषयी सत्तर सप्तके ठरलेली आहेत. दानीएल ९:२४.

११]आणि तू अभिषेकाचे तेल घेऊन मंडपाला आणि त्यात जे आहे त्या सर्वाना अभिषेक करून तो व त्याचे सर्व सामान पवित्र कर , आणि तो पवित्र होईल. आणि तू होम वेदीला आणि तिच्या सर्व पात्रांना अभिषेक करून वेदी पवित्र कर आणि ती वेदी परम पवित्र होईल निर्गम ४०:९-१०.

१२] तू आपणाजवळ पाचशे शेकेल शुद्ध बोळ व त्याच्या अर्धी म्हणजे अडीशे शेकेल सुगंधी दालचिनी व अडीशे शेकेल सुगंधी बच, आणि पवित्रस्थानच्या शेकेला प्रमाणे पांचशे शेकेल तज आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हि मुख्य सुगंधी द्रवे घे.आणि तू सुगंधी मसाल्याचे, गांघ्याच्या कृतीप्रमाणे मिश्रित असे ते पवित्र अभिषेकाचे तेल कर, आणि ते पवित्र अभिषेकाचे तेल असावे, निर्गम ३०:२२-२५.

१३] मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन मंडपाला व त्यात जे होते त्या अवघ्याला तेल लावून ती पवित्र केली, आणि त्याने त्यातले तेल सात वेळा वेदीवर शिंपडले आणि वेदी व तिची सर्व पात्रे आणि क्षालनपात्र व त्याची मांडणी हि पवित्र करायला त्यांना तेल लाविले. आणि अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले, आणि त्याला पवित्र करायला त्याला अभिषेक केला. लेवीय ८:१०-१२. 

१४] आणि याकोब मोठ्या पहाटेस उठला आणि जो धोंडा आपल्या उशास घेतला होता तो घेऊन त्याने स्मारक स्तंभ असा स्थापिला व त्याच्या माथ्यावर तेल ओतले. उत्पत्ती २८:१८

१५] जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केला, जेथे तू आपला नवस केला त्या बेथेलचा देव मी आहे; आता उठ देशातून निघून तू परत आपल्या जन्म भूमीस जा. उत्पत्ती; ३१:१३

१६] तू आपल्या न्यायीपणावर प्रीती केली आहे, आणि अन्यायाचा द्वेष केला आहे, म्हणून देव, तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरुपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे इब्री १:९

१७] यहोवा आपल्या अभिषिक्तला तारतो, हे मी आता जाणतो, तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. स्तोत्र २०:६

टीप : हि वचने पवित्र शास्त्र बायबल मधील जुन्या व नव्या करारातील आहेत.

रेव्ह कैलास [अलीशा ] साठे 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole