आजची आत्मिक भाकर.

 वचनयहोवा थोर  परम स्तुत्य आहे आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे.स्तोत्र १४५:.

देव त्याच्या कर्तृत्वाने  व्यक्तित्वाने इतका मोठा आहे कि मानवी बुद्धीला त्याचे आकलन होत नाही,तोअति थोर  परमस्तूत्य आहेदावीद राजा म्हणतो,”देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा स्तोत्र ३४:त्याची हि थोर-वी त्याच्या लेकरांना संपन्न करतेत्याची दयाकरूणाक्षमाकृपाशांतीआ-नंदप्रीतीन्यायीपणज्ञानसामर्थ्य बरकतचांगुलपणाची हि यादी खूप मोठी होऊ शकते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुरूप तो प्रगट होतो.त्याच्या थोरवीची हि किमया न्यारी आहेज्याला समजली त्याचे जीवन त्याच्या स्तुतीने भरून जाते.

प्रार्थना : हे प्रभू येशू तुझी महिमा अगाध आहेतू जो परोमोच्च परमेश्वर त्यातूला मानसन्मान गौरव सदासर्वदा असोतुझ्या प्रितीने माझे तारण करतुझ्या आगापे प्रेमाने मला भरतुझ्यावर पूर्ण मनानेपूर्ण शक्तीने मी प्रीती करावी म्हणून मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर.येशूच्या नावाने मागतो.आमेन.

रेव्ह कैलास [अलिशा ]साठे 

वचनहे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहास्तोत्र ६२:.

दावीद राजाच्या जीवनातील संघर्ष पराकोटीचा होताबाहेरील शत्रूं बरोबरच अतंर्गत शत्रूं होतेत्यामुळेअतंर्गत षडयंत्रकारी,अंतःकरणात शाप देणारे  कपटी लोकांचे पाताळयंत्री राजकारण तोअनुभवत होता.आशा परिस्थितीत भयभीत होणे,काळजी चिंतांनी ग्रस्त होणे साहजिक आहे . स्वभावतः आशा वेळप्रसंगी मनुष्य काहीही करू शकतोउदाहरणार्थ जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करणेइतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करणे  काहीच साध्य होत नाही असे वाटल्यास आत्महत्ये सारखा अत्यंत चुकीचा निर्णय घेणेआशाने जीवनातील प्रश्न सुटत नसतात तर अधिक वाढत जातातदाविदराजाने आपल्या संघर्ष पूर्ण जीवनात वेळो वेळी देवाचे साहाय्य अनुभवले मोठं मोठी संकटे  आव्हाने असताना देवाने अद्भुत रित्या त्यास जय दिले.त्यामुळे तो भयभीत ना होताविचलित  होतास्वतःच्या जीवाला धीर देत अगदी शांतपणे देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहीप्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात संकटे येतात परंतु जगिक बुद्धीच्या लोकांपेक्षा विश्वासणारे अधिक सहजतेने संकटाना सामोरे जातात  मात करितात कारण ते देवावर आपली भिस्त ठेवतात.

प्रार्थनाहे प्रभू येशू तू माझा बळकट दुर्ग  सामर्थशाली बाप आहेस,दाविदाप्रमाणे मलाही तुझ्या ठायी स्वस्थ जीवन लाभुदेयेशूच्या नावाने मागतो,आमेन .

रेव्ह.कैलास [अलिशा ] साठे .


Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole