आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६.

आराधना

प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते. तरी यहोवा देवावर विश्वास ठेऊन हा व्यक्ती आपल्या प्रवासात सफल झाला शेवटी अरामनहराईम यातील नाहोरच्या नगरास पोहचला. नाहोर हा अब्राहामाचा आप्त होता. त्या नगराच्या बाहेर असलेल्या विहिरी जवळ त्याने आपले उंट त्यांना पाणी पाजण्यासाठी बसवले. आता त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता कि इसहाक साठी नेमकी मुलगी शोधायची कशी ? माणसाची मदत घेतली तर आपल्याला फसवल्या जाण्याची भीती त्याच्या मनात नक्कीच असणार.अशा या बिकट परिस्थितीत त्याने देवाची मदत घेण्याचे ठरवले. नगरातील मुली विहिरीवर पाणी भरण्यासाठी येत असताना पाहून त्याने देवाकडे प्रार्थना केली कि,”हे यहोवा माझा धनी अब्राहाम याच्या देवा, मी तुला विनंती करितो कि, तू माझ्यासाठी हे घडवून आण, आणि माझा धनी अब्राहाम याच्यावर कृपा कर. पहा मी येथे पाण्याच्या झऱ्या जवळ उभा आहे आणि गावातील लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. तर असे होऊ दे कि, ज्या मुलीला मी म्हणेन कि मी तुला विनंती करितो, मी पाणी प्यावे म्हणून तू आपली घागर उत्तर, आणि जी म्हणेन, पी, आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईल, तीच तू आपला सेवक इसहाक याच्यासाठी नेमलेली असो; यावरून मी असे समजेन कि तू माझ्या धन्यावर कृपा केली आहे.”उत्पत्ती २४: १०१४.

अलीयेजरने प्रार्थना केल्या प्रमाणे घडून आले. रिबेकाने त्याला त्याच्या दहा उंटांना पाणी पाजून तृप्त केले. तेव्हा तो तिच्याकडे अवाक होऊन पाहत होता.यहोवाने त्याचा प्रवास सफल केल्याची खात्री त्याला झाली. त्याने तिला नथ सोन्याच्या बांगड्या दिल्या, हि मुलगी कोणाची आहे हे पाहावे म्हणून त्याने रिबेकाला विचारले कि तू कोणाची मुलगी आहेस? तेव्हा तिने मी बथुवेलची मुलगी आहे असे सांगितले यावर अलीयेजर समजला कि हि अब्राहामाच्या आप्ताची मुलगी आहे तेव्हा त्याला अब्राहामाचे शब्द आठवले असावेत कि आकाशाचा देव ज्याने माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्म देशातून मला आणिले जो माझ्याशी बोलला माझ्याशी शपथ वाहून म्हणाला कि मी हा देश तुझ्या संतानाला देईल तो यहोवा आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठविल आणि तू तेथून माझ्या मुलासाठी नवरी आणशील, खरोखर देवाने त्याचा दूत त्याच्यापुढे पाठवून त्याचा मार्ग सफल केला होता. त्यामुळे त्याचे मन कृतज्ञेतेने भरून आले त्या स्वर्गीय देवाचे आभार मानण्यासाठी त्याने आपले डोके लववून त्याला नमन केले. तेथे त्याला कुठलीच गोष्ट यहोवा प्रति त्याच्या भावना कृतीतून व्यक्त करण्यापासून थांबवू शकली नाही. हीच आहे खरी आराधना,जी अंतःकरणापासून 
व्यक्त होती. या साठी कृतज्ञेतेने भरलेले हृदय आवश्यक आहे.

देवा समोर नम्र वर्तन : अलीयेजेरने नम्रपणे देवाच्या हाती आपली समश्या सोपवली. प्रार्थना करताना माझ्या धन्यावर कृपा कर अशी विनंती त्याने केली. स्वतःची धार्मिकता देवासमोर मांडली नाही 
तर कृपा कर असे बोलून त्याने स्वतःला नम्र केले. प्रभू येशूने जकातदार परुशी 
यांच्या प्रार्थनेचे दिलेले उदाहरण आठवा, त्या ठिकाणी त्याने धार्मिकतेच्या उदात्तीकरणाचा निषेध केला आहे. प्रभू येशु ख्रिस्त सांगतात कि, “एकदा एक परुशी जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास मंदिरात वर गेले. परुश्याने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली, हे देवा इतर मनुष्य अपहारी, अधर्मी, व्यभिचारी अशी आहेत त्यांच्या सारखा किंवा या जकातदारा सारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यातून दोनदा उपवास करितो जे मला मिळते त्या सर्वाचा दशांश देतो, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासहि धजता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर. मी तुम्हास सांगतो हा त्या दुसऱ्या पेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला, कारण जो कोणी आपल्याला उंच करितो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नम्र 
करितो तो 
उंच केला जाईल,” लूक १८: १४.म्हणून देवाचे सहाय्य हवं असेल तर त्याच्या पुढे लीन नम्र व्हा.

विश्वासाचे प्रगटीकरण : आलीयेजरच्या प्रार्थनेत विश्वासाचे प्रगटीकरण होते. तो विश्वास धरतो कि मी जसे इच्छित आहे त्या प्रमाणे देव करू शकतो. जितके डोळ्याने दिसणाऱ्या माणसाकडे मदत मागणे व्यवहारिक आहे तितकेच दिसणाऱ्या देवाकडे मदत मागणे व्यवहारिक आहे. देव आहे तो प्रार्थना ऐकतो 
तो करू शकतो अशा प्रकारच्या विश्वासाचे प्रगटीकरण आपल्या प्रार्थनेतून कृतीतून झाले पाहिजे. प्रभू येशूला जे जे शरण गेले ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेविला ते ते आशीर्वादित झाले.

प्रार्थनेतील स्पष्टता  : आलीयेजरच्या प्रार्थनेत स्पष्टता होती. त्याने देवाने त्याच्यासाठी काय करावे हे स्पष्टपणे त्याच्या समोर मांडले, कि आता मला तू निवडलेली मुलगी ओळखण्यासाठी असे घडून येऊ दे,”पहा मी येथे पाण्याच्या झऱ्या जवळ उभा आहे आणि गावातील लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. तर असे होऊ दे कि, ज्या मुलीला मी म्हणेन कि मी तुला विनंती करितो, मी पाणी प्यावे म्हणून तू आपली घागर उत्तर, आणि जी म्हणेन, पी, आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईल, तीच तू आपला सेवक इसहाक याच्यासाठी नेमलेली असो; यावरून मी असे समजेन कि तू माझ्या धन्यावर कृपा केली आहे.” आम्ही सुद्धा आमची गरज देवापुढे स्पष्टपणे मांडली पाहिजे, कि देवा मला हे हवे आहे.

कृतज्ञतेने भरलेले अंतःकरण : आपल्या जीवनावर देवाचा पूर्ण अधिकार आहे. रोजचा दिवस जो आपण पाहतो ती केवळ देवाची कृपा आहे, म्हणून आमचे अंतःकरण नेहमी कृतज्ञतेने भरलेले असले पाहिजे. म्हणून दावीद राजा म्हणतो हे माझ्या जीवा 
परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. स्तोत्र १०३:. अलियेजर देवापुढे कृतज्ञता पूर्वक वागत होता त्यामुळे जेव्हा त्याच्या प्रार्थनेचे उत्तर त्याला मिळाले त्याचे मन देवा प्रति कृतज्ञेतेने भरून आले त्या स्वर्गीय देवाचे आभार मानण्यासाठी त्याने आपले डोके लववून त्याला नमन केले. तेथे त्याला कुठलीच गोष्ट यहोवा प्रति त्याच्या भावना कृतीतून व्यक्त करण्यापासून थांबवू शकली नाही. हीच आहे खरी आराधना,जी अंतःकरणापासून 
व्यक्त होती. या साठी कृतज्ञेतेने भरलेले हृदय आवश्यक आहे. अशा धार्मिकांचे सहाय्य करण्यास देव सदा सिद्ध असतो. देव आपले बाह्य स्वरूप पहात नाही तर अंतःकरण पाहतो. शमुवेल १६:.

प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस, माझे मन तुझ्या प्रति आभाराने भरलेले असुदे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole