आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

 आरोग्यासाठी

आरोग्यासाठी देवाची वचने मराठी मध्ये

देवाची वचने

1] यहोवा रोफे [ राफा ] : निरोगी करणारा देव,” जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यांवर घातली त्यातले कोणतेही तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी करणारा आहे”. निर्गम १५:२६

2] तुम्ही तर  यहोवा तुमचा देव याची सेवा करा, आणि तो तुझ्या भाकरीला व पाण्याला आशीर्वाद देईल आणि मी तुझ्यातून रोग दूर करीन. निर्गम २३:२५

३] आणि यहोवा तुझ्या पासून सर्व रोग बरे करील, आणि मिसऱ्यांची जी वाईट दुखणी, तुला ठाऊक आहेत, त्यातले कोणतेही तो तुझ्यावर घालणार नाही, तर जे सर्व तुझा द्वेष करितात त्यांच्यावर घालील. अनुवाद ७: १२-१५ [वाचा]

४] हे यहोवा माझ्या देवा तुला मी आरोळी केली आणि तू मला निरोगी केले स्तोत्र ३०:२

५] हे यहोवा माझ्यावर दया कर, कारण मी वाळून गेलो आहे; हे यहोवा, मला निरोगी कर; कारण माझी हाडे ठणकत आहेत. स्तोत्र ६:२

६] तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करितो,तो तुझे सर्व रोग बरे करितो. स्तोत्र १०३:३

७] कारण त्यांनी तुला टाकलेली आहे, जिला कोणी विचारत नाही अशी ती सियोन आहे, असे त्यांनी म्हटले आहे, म्हणून मी तुला आरोग्य देईन आणि तुझे घाय बरे करीन, असे यहोवा म्हणतो. यिर्मया ३०:१७

८] पहा मी ह्या नगराला आरोग्य व रोगनिवारण्याचा उपाय आणून देईन; आणि मी त्यांना निरोगी करीन आणि त्यांना शांतीची व सत्यतेची विपुलता प्रगट करीन. यिर्मया ३३:६

९] खचित, त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत; आणि आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले. परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झालेला होता; तो आमच्या अन्यायांमुळे चेचलेला होता; आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य मिळाले आहे. यशया ५३:४-५

१०] त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली यासाठीकी आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे; त्याला बसलेल्या माराच्या वळांनीं तुम्ही निरोगी झाला. १ पेत्र २:२४

११] विश्वासाची प्रार्थना रोग्याला वाचविल, आणि प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केली असतील तर त्याला त्याची क्षमा होईल. त्यामुळे तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा, व एकमेकांसाठी प्रार्थना करा, न्यायीची कार्यकारी प्रार्थना फार प्रबळ होते. याकोब ५:१५-१६

१२] आनंदी हृदय चांगले आरोग्य देते, परंतु व्याकुळ आत्मा हाडे सुकवतो , नीती १७:२२

१३] आणि विश्वास धरणाऱ्या सोबत हि चिन्हे असत जातील; ते माझ्या नावाने भुते काढून टाकतील, ते नव्या भाषा बोलतील, ते साप उचलतील, आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते प्याले तरी तो त्यांना बाधणारच नाही, त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. मार्क १६:१७-१८

१४] तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठीकी पुत्रामध्ये बापाचे गौरव व्हावे. जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. योहान १४:१३-१४.

१५] मी तुम्हांस खचित खचित सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्या पेक्षा मोठेही करीन, कारण मी बापाकडे जातो. योहान १४:१२

१६] आणि तो त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक आश्रू पुसून टाकील, आणि या पुढे आणखी मरण होणार नाही, आणि शोक व रडणे व कष्ट हि त्यापुढे आणखी होणारच नाहीत कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. प्रकटी २१:४

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole