🙏 कार्यक्रम पत्रिका 🙏
वचन : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश यहोवा म्हणतो. जखऱ्या ४: ६.
सुरवातीची प्रार्थना :
गीत : होईल वृष्टी कृपेची
पाहुण्यांची ओळख व आसन ग्रहण :
सत्कार : [पाहुण्यांचा चर्च मधील वडिलांच्या हस्ते सत्कार करावा /व उत्तेजनार्थ बांधकाम टीम असल्यास त्या टीमचा अथवा प्रमुख श्रम घेणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करावा ]
प्रास्ताविक :
प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन:
१) ———
२) ——————
आभार व सूचना : ———————-
[ आता आपण कार्क्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागाकडे जात आहोत. तेव्हा आपण शिस्त बाळगू सर्वात प्रथम पाहूणे बाहेर पडतील व नंतर मंडळी बाहेर जाईल. ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी होत असताना आपण कोणीही चौकोनात उभे राहू नये हि नम्र विनंती आहे. चौकोनाच्या उजव्या बाजूस सर्व मान्यवर उभे राहतील व चौकोनाच्या डाव्या बाजूस व समोर मंडळी उभी राहील. ]
💖 ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी 💖
शास्त्रभागाचे वाचन :
जखऱ्या ४ अध्याय .
मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे पुनः आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करितात तसे त्याने मला जागे केले. त्याने मला विचारले तुझ्या दृष्टीस काय पडते ? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत. आणि त्याच्या जवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस दोन जैतुनाची झाडे आहेत. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूतास मी विचारले, माझ्या प्रभो, हे काय आहे ? मज बरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, हे काय आहे हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही, माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुब्बाबेलास यहोवाचे हे वचन आहे; बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश यहोवा म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस ? जरुब्बाबेलापुढे तू सपाट मैदान होशील; व त्याच्यावर अनुग्रह, त्याच्यावर अनुग्रह, असा गजर करीत कोनशिला पुढे आणील. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की, जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हांकडे पाठविले आहे हे तू समजशील. तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय ? ते सात डोळे जरुब्बाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.
मग मी त्याला विचारले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस हि दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय ? दुसऱ्यांदा मी त्याला विचारले; या दोन सुवर्णाच्या तोट्याजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणाऱ्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत ? त्याने मला म्हटले त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय ? मी म्हटले, नाही, माझ्या स्वामी. तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.
देवाचे पवित्र वचन आपणा सर्वास व या कार्यास आशीर्वादित करो . आमेन.
कार्य समर्पणाची प्रार्थना :
ग्राउंड ब्रेकिंग / कुदळ टाकणे :
पिता, पुत्र , आणि पवित्र आत्म्याच्या नावात; प्रथम प्रमुख पाहुणे कुदळ टाकतील व नंतर क्रमाने मुख्य अतिथी कुदळ टाकतील :
देवाच्या नावाचा जय घोष : हालेलूया, प्रेज द लॉर्ड .
शेवटची प्रार्थना :
आशीर्वाद :
सर्वांचे आभार, कार्यक्रमाच्या सामारोपाची घोषणा व सूचना :
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे .
source : पवित्र शास्त्र, “बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया” बेंगलोर, पान नं ९६५.
—————————————————————————————————-