ज्ञानाचा आरंभ नीती १:७

 ज्ञान कोठे सापडते ? 

वचन: परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. नीती :

येथे मानवी व्यावहारिक ज्ञाना विषयी बोलले जात नाही,मानवी ज्ञान स्वतःच्या अनुभवावर आभ्यासावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात परिपूर्णता कधीच येत नाही कारण मानवी अनुभवाला आभ्यासाला अनेक मर्यादा पडतात. खरे ज्ञान ज्याला आपण सत्य म्हणू शकतो ते फक्त देवाजवळ देवामध्ये आहे.हे जग कसे रचले, त्याची कार्य व्यवस्था कशी आहे, या विश्वाचा मानवी जन्माचा हेतू काय, याचा प्रारंभ शेवट काय हे जर समजले नाही तर जीवनाचा हा सर्व प्रपंच व्यर्थ आहे. उपदेशक म्हणतो,’देवाचे कार्य सुरवातीपासून शेवट पर्यंत मनुष्य समजू शकत नाही.तरी देव कृपेने ख्रिस्ताद्वारे आपणाला ते बरेच प्रगट झाले. जर आपण देवाला भिऊन पवित्र जीवन जगू तर ख्रिस्त कृपेने आपण अलौकिक ज्ञानाच्या अनेक गोष्टी समजू शकू. देवाच्या भयाने या ज्ञानाचा प्रारंभ होतो जितके आपण त्याच्या इच्छेतले जीवन जगू तितके ज्ञानाचे प्रगटीकरण होत जाते.संत पौल म्हणतो या आवाढव्य विश्वाची आपण कल्पनाही करू शकत नाही, आपण किंचित जाणतो. करिंथ १३: तरी पौलाच्या ज्ञानाचा हा अनुभव पहा तो म्हणतो, ख्रिस्तात मला एक माणूस माहित आहे [शरीरात कि काय मला ठाऊक नाही किंवा शरीर बाहेर कि काय हे हि मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक] चौदा वर्षांपूर्वी तो तिसऱ्या आकाशापर्यंत हिरावून नेला गेला. आणि असला एक माणूस मला माहित आहे [शरीरात कि काय मला ठाऊक नाही किंवा शरीर बाहेर कि काय हे हि मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक] तो सुख लोकात हिरावून नेला गेला होता आणि जी अनिर्वाच्य वाक्ये माणसाने बोलने योग्य नाही ती त्याने ऐकली करिंथ १२:.ज्ञानाचा हा अनुभव किती मोठा माहित नाही पौल तर याला किंचित समजतो पण इतके सांगतो देवाच्या भयाने याचा आरंभ होतो.

प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या कृपा प्रसादासाठी मी तुझे आभार मानतो.तुझ्या भयात मला राख, आत्मिक ज्ञान दे.येशूच्या नावाने मागतो आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole