देवाच्या लोकांचे ऐक्य:स्तोत्र:१ ३ ३.

ऐक्यपूर्ण सहजीवन व आशीर्वाद .

स्तोत्र १ ३ ३

पहा, बंधूनी एक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे!

ते मस्तकावर घातलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्रांच्या काठापर्यंत आलेल्या, बहुमोल तेलासारखे आहे;

सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.

अ] बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे हे उत्तम व मनोहर आहे कारण? [वचन १ ]

१ ] बंधूंमध्ये भांडणाची संस्कृती नसते तर एकमेकांचे हित पाहिले जाते,एकमेकांसाठी त्याग केला जातो. उत्पत्ती १ ३ :८-९. तेव्हा अब्राम लोटला म्हणाला: “हे बघ, आपण दोघं भाऊ आहोत. म्हणून तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये आणि तुझ्या मेंढपाळांमध्ये व माझ्या मेंढपाळांमध्ये भांडण व्हायला नको.  तेव्हा तू माझ्यापासून वेगळा हो आणि या प्रदेशाचा हवा तो भाग निवड. जर तू डावीकडे गेलास, तर मी उजवीकडे जाईन. आणि जर तू उजवीकडे गेलास, तर मी डावीकडे जाईन.”

२ ] जेथे ऐक्य तेथे सदैव प्रीतीपूर्ण वागणूक असते: इब्री १ ३ :१ -३ बंधुप्रीतिमध्ये जडून राहा. अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे. तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.

३ ] ऐक्य असल्यास आदराने एकमेकांना थोर मानले जाते : रोम १ २ :१ बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.

४ ] ऐक्य असल्यास बंधूंसाठी प्रार्थना व कृती केली जाते: स्तोत्र १ २ २ :८.’माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन.परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.

ब] बंधू ऐक्यला देवाने दोन उपमा दिल्या आहेत.

१ ] पवित्रीकरण व समर्पणासाठी अभिषेकाचे तेल. [ वचन २ ]

निर्गम ३ ० :३ ० -३ २ तू अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा अभिषेक कर आणि याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी त्यांना पवित्र कर. तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पिढ्या न्‌ पिढ्या हे माझ्यासाठी अभिषेकाचं पवित्र तेल असेल. हे तेल कोणाही व्यक्‍तीच्या अंगाला लावलं जाऊ नये. यासारखं दुसरं कोणतंही मिश्रण बनवू नका. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला नेहमी पवित्र समजावं.

लेवीय ८ :१ २ मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करुन त्याला पवित्र केले.

जसे अभिषेकाचे तेल आरोहणाला पवित्र करते तसे आपले ऐक्यपूर्ण सहबंधू जीवन आपल्याला पवित्र करते.

एक्यतेशिवाय आपण देवाचे लोक होऊ शकत नाही, आणि देवाकडे प्रार्थना देखील करू शकत नाही. मत्तय ५ : २ १ -२ ४ तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले,  तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे..

२ ] दहिवर : [वचन ३]

अ ] दहिवर देवाचा आशीर्वाद आहे : मिखा ५ :७. दहिवर देवापासून येते. इसहाक याकोबाला आशीर्वाद देताना म्हणतो, उत्पत्ती २ ७ :२ ८ देव तुला आकाशाचे दहिवर, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देवो;

ब ]समृद्धीचे प्रतीक आहे: होशेय १ ४ :५ -७ मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरेल . त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील; ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील; त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासाखी होईल.

क ] दहिवर म्हणजे तारुण्याचा जोश, सामर्थ्य, आनंद व पावित्र्य : स्तोत्र १ १ ० :३ तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.

ड ] देवाची इच्छा आहे त्याचे वचन दहिवरासारखे आपल्या जीवनात कार्य करो: अनुवाद ३ २ : २ पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिपको; हिरव्यागार गवतावर जशा पावसाच्या सरी, हिरवळीवर जशी वृष्टी तसे हे वर्षो .

क] ऐक्याचे परिणाम: जेथे ऐक्य असते तेथे देव आशीर्वादांना कार्य करण्याची आज्ञा देतो. लेवीय २ ५ : २ १ चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षाचे पीक देईल. . व अनुवाद २ ८ :८. यहोवा तुमच्या कोठारांवर आणि तुमच्या प्रत्येक कामावर आशीर्वाद असावा अशी आज्ञा देईल, आणि जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात नक्कीच तुमच्यावर त्याचा आशीर्वाद असेल.

ड] प्रीती आणि ऐक्य याला अतिशय महत्व आहे: मी तुम्हांस नवी आज्ञा देतो तुम्ही एकमेकांवर प्रीती करा , जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे. तुमची एकमेकांवर प्रीती पाहून लोक ओळखतील कि तुम्ही माझे शिष्य आहा. योहान १ ३ :३ ४-३ ५

योहान १ ७ :२ ० -२ ३ आम्ही ऐक्यात व प्रीतीत राहू तर ख्रिस्तात राहू व जगात त्याचे साक्षी होऊ. इफिस ५ :१ -५ प्रीती हि देवाला देवाला यज्ञ अर्पण आहे, या यज्ञाने देवाला आनंद होतो. परंतु लोभिष्टपणा अशुद्धता व मूर्तिपूजा आहे.

रेव्ह कैलास [अलिशा] साठे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole