संतोषकारक यज्ञ
वचन: हाबेलनेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकी काही अर्पण करावयास आणली, परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. उत्पत्ती ४:४.
हाबेलाचा
व त्याच्या अर्पणाचा स्वीकार करतो. देवाने हे नक्की कसे केले असावे हे आपल्याला माहित नाही परंतु पवित्र शास्त्रातील काही प्रसंगावरून आपण समजू शकतो कि देवाने काय केले असावे.
अग्नी द्वारे स्वीकार : देवाने अब्राहामाशी करार करण्यासाठी त्याला तीन वर्षाची कालवड, तीन वर्षाची शेळी, तीन वर्षांचा मेंढा, होला व पारव्याचे पिलू हे घेण्यास सांगितले. अब्राहामाने ती घेऊन देवाने सांगितल्या प्रमाणे ती मध्ये चिरून प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागाच्या समोर ठेवला पण पक्षी त्याने चिरले नाहीत, तेव्हा देवाने अब्राहामाला भविष्यात त्याच्या संतना बद्दल काय होईल हे सांगितले, आणि असे झाले की सूर्य मावळला व अंधार झाला असता, तेव्हा पहा धुमसती भट्टी व जळत असलेली दिवटी, त्या तुकड्यांच्या मधून गेली. उत्पत्ती १५:१७, दुसरे उदाहरण म्हणजे, एलीया संदेष्ट्याने यद्य केला असता, यहोवाच्या अग्नीने पडून होमार्पणे व लाकडे , धोंडे , माती खाऊन टाकली व खळग्यातील पाणी चाटून घेतले. १ राजे १८:३८. असो, या दोन्ही उदाहरणातून हे दिसते की देवाने अग्नीच्या द्वारे अर्पणांचा स्वीकार केला. हाबेलाचे अर्पणही देवाने असेच स्वीकारले असावे.
देव कोणाच्या यज्ञ अर्पणांचा स्वीकार करितो: येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी कि देव अर्पणाकडे पाहत नाही तर अर्पण करणाऱ्याकडे पाहतो. अर्पण करणारा अर्पण करण्यास योग्य असेल तरच त्याचा व त्याच्या अर्पणाचा स्वीकार अथवा सन्मान होतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो कि आपल्या भावाशी समेट असल्या शिवाय वेदीवर अर्पण आणू नका. मत्तय ५:२३–२४.काईनला व त्याच्या अर्पणाला नाकारण्याचे कारण सुद्धा हेच आहे कि तो चांगला व्यक्ती नव्हता. देव त्याला समजावत असताना स्पष्टपणे सांगतो कि तू चांगले केले तर तुझाही स्वीकार होईल. हाबेलचा व त्याच्या अर्पणाचा स्वीकार झाला कारण पवित्र शास्त्र त्याच्या बद्दल सांगते कि तो नीतिमान होता.
इब्री ११:४. या विषयावर मिखा ६:६–८ आणखी प्रकाश टाकते,“मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू ? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याजपुढे येऊ काय ? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय ? माझ्या पातका
बद्दल मी आपला जेष्ट पुत्र देऊ काय ? माझ्या जिवाने केलेल्या पातका बद्दल मी आपल्या पोटाचे फळ देऊ काय ? हे मनुष्या , बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे . नीतीने वागणे, आवडीने दया करणे, व आपल्या देवा समागमे राहून नम्रभावाने चालणे या वाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो ?
विश्वासणाऱ्यांची यज्ञ अर्पणे: प्रेषित पौल रोमकराचा मंडळीला मार्गदर्शन करताना सांगतो,” भावांनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हांस विनंती करितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी हि तुमची आत्मिक सेवा आहे, रोम १२:१.
विश्वासणाऱ्यांची दाणे देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ अशी आहेत.फिलिपे ४:१८.त्याच प्रमाणे इब्री १३: १५-१६ सांगते, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वअर्पणद्वारे आपल्यासाठी परिपूर्ण असा यज्ञ केला आहे, म्हणून आपण त्याच्या द्वारे देवाला स्तुतीचा यज्ञ, म्हणजे त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ, नेहमी अर्पावे. आणि उपकार करायला व सहाय्य करायला विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू तू माझा अंगीकार करून तुझे नीतिमत्व मला दिले म्हणून मी तुझे आभार मानतो, मला माझ्या आत्मिक भावा बहिणींवर प्रीती करण्यास साहाय्य कर, तुझ्या दृष्टीकोनातून मला सर्वांकडे पाहता येउदे. येशूच्या नावाने मागतो आमेन.
रेव्ह . कैलास [अलिशा ] साठे .