बायबल स्टडी [ आत्मिक जीवन भाग २]

  आत्मिक जीवनाला अडखळण असणाऱ्या कल्पना किंवा विचार 

बायबल स्टडी -आत्मिक जीवन -भाग २

प्रास्ताविक:आत्मिक जीवनाबद्दल समजून घेताना आधी त्याबद्दलचे नकारात्मिक विचार समजून घेऊन आपण आपल्या आत्मिक वाटचालीत सुस्पष्टता आणली पाहिजे. आत्मिक जीवन हे पूर्णपणे समजून
उमजून जगणे महत्वाचे आहे. पवित्र शास्त्र अभ्यास खूप काळजीपूर्वक करून ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. रोज आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो त्याचे परिमाण
आमच्या विश्वासाच्या आत्मिक वाटचालीवर होत असतात.ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनाचा पाया योग्य असण्यासाठी चुकीच्या शिक्षणापासून आपण स्वतःस सांभाळले पाहिजे. अनेकदा धार्मिक, सांस्कृतिक, प्रभावांमुळे आपण चुकीच्या दृष्टीकोनातून ख्रिस्ती जीवन जगू लागतो त्यामुळे आपले
फार मोठे आत्मिक नुकसान होऊ शकते. त्यापैकी आपण काही पाहू.

 ]
कर्मकांड/ कर्मवाद
: स्वतःच्या शक्तीने आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करण्यासाठीची धडपड. वचन सांगते आपल्याला देवाच्या कृपेची जीवनाच्या शेवटच्या स्वसा पर्यंत आणि नंतरही गरज आहे. कारण आम्ही आमच्या शक्तीने काहीच करू शकत नाही. मत्तय १९:२४२६.
रोम :१४२०
गलती : १६२५,

२] पापाच्या सामर्थ्याचे मुळापासून निर्मूलन: पापाचे समूळ उच्चाटन देवच करू शकतो, कारण त्याचा उगम सैतानापासून आहे व आपल्याला हे माहित आहे कि त्या महाशक्तिशाली जुनाट सापाला देव अग्नीच्या सरोवरात टाकून कायमचा नष्ट करील व त्याच्याबरोबर पाप हि नष्ट होईल. प्रकटी २०:१०,१४,१५. प्रकटी २१:३-४ तो पर्यंत पापाचे अस्तित्व व प्रभाव कायम असणार आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही पापाला आमच्या जीवनात राज्य करू द्यावयाचे.वचन सांगते,”तर मग भावांनो, आपण ऋणी आहो पण देहाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही.कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. रोम ८:१२-१३, आपण मनाच्या वृत्तीत नवे होणे गरजेचे आहे, पवित्र जीवन आपल्यासाठी अनिवार्य आहे.इफिस ४:२०-२४

३] मंडळीतील सर्वानाच पापविरहित पाहण्याचा आग्रह: मंडळीत सहजीवन जगताना आपण अनेक तक्रारी करितो व विशेषकरून आत्मिक जीवनाविषयी दोष लावितो. तरी आपण हे समजून घ्यावे कि मंडळीत काही भाऊ बहिणी आत्मिक दृष्ट्या अशक्त असू शकतात, व आपणही परिपूर्ण नसतो, म्हणून वचन सांगते,”एकमेकांचे सहन करा, आणि कोणाचा कोणाशी वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा ख्रिस्ताने जशी  तुमची क्षमा केली तशी तुम्हीही करा”.कल ३:१३

 ४] आत्मिक जीवन हे निरस आहे : अनेकांना आत्मिक जीवन हे निरस वाटते, सतत प्रार्थना, सतत चर्च, व सतत तेच तेच संदेश. प्रथम दर्शनी आत्मिक जीवन हे खरोखरच आव्हाना प्रमाणे आहे, प्रभू येशू म्हणतो,”जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे.  परंतु पुढे तो याचे आगत्येही स्पष्ट करितो, त्याच्या मागे गेल्यानेच जीवन मिळणार आहे. लूक ९:२३-२५. अन्यथा हे जग भयाने आणि दुःखाने भरलेले आहे, ईयोब म्हणतो, ज्याची मला फार धास्ती होती तेच माझ्यावर आले, मी निश्चिंत, स्वस्थ, निवांत नव्हतो तरी पीडा आली ईयोब ३:२५. याच अवस्थेत पृथ्वीवरील सर्व जीवन जगतात. माणूस जेव्हा मरतो तेव्हा मी अनेकदा जी सर्व साधारण प्रतिक्रिया ऐकली ती अशी होती,”सुटला बाबा एकदाचा”! म्हणून ख्रिस्ताच्या मागे आपला वधस्तंभ घेऊन चालणे मला अधिक प्रशस्त वाटते. दावीद राज्याचे जीवन पहा त्याचा आनंद भौतिक भोग विलासातून पूर्ण होत नाही तर प्रभूच्या सानिध्यात होतो, तो म्हणतो हजार वर्षांच्या आयुष्यापेक्षा देवाच्या मंदिरातील एक क्षण उत्तम आहे. तो भौतिक सुखात आपला आनंद शोधीत नाही म्हणून तो खरा आनंदी आहे, “त्यांचे धान्य व नवा द्राक्षरस हि त्यांना विपुल होतात तेव्हा त्यांना जो आनंद होत असतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात घातला आहे. स्तोत्र ४:७.  यशया २९:१९, हबक्कूक ३:१८

]
नियमशास्त्राचे पालन
: विधींच्या स्वाधीन होऊ नये कल :१६२३, खाणे पिणे यात
देवाचे राज्य नाही, तर न्यायीपण
शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद हे देवाचे राज्य
आहे. कारण या गोष्टींमध्ये जो  करितो
तो देवाला संतोषकारक आणि मनुष्यास मान्य आहे, रोम १४:१७१८.

]
एकदा ख्रिस्ती झाले कि मग काही
करायची गरज नाही, सर्व देवावर सोपवून देणे :
प्रियांनो आपला आत्मिक जन्म हा युध्दभूमीवर होतो.
आपण आत्मिक युद्धात आहोत. हे युद्ध जिकंण्यासाठी
आपल्याला जागरूक राहावयाचे  आहे
सबळ असावे लागणार आहे. इफिस :१०, आम्हाला
झटून प्रयत्न करावयाचे आहेत,कल :२८२९  देवाचे
भय धरून, थरथरकापत तारण साधायचे आहे, निर्मळ निष्कलंक अशी
देवाची लेकरे व्हायचे आहे, फिली :१२१४.
ख्रिस्तामध्ये सर्वदा आनंद मानून धीराने पुढे जायचे आहे  पेत्र
:१२१४.

]
आम्ही ख्रिस्ती असल्यामुळे कसेही वागलो तरी चालेल 
: कारण
आपणा सर्वाना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचे आहे, मग ते बरे
असो किंवा वाईट असो त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे.
करिंथ :१० कारण
सर्व माणसांकरिता देवाची तारण दायी कृपा प्रकट झाली आहे, ती आपल्याला असे
शिकवतेकी आपण अभक्तिला जगातल्या हवास
नाकारून या आताच्या काळात
सुबुध्दीने न्यायाने
सुभक्तीने वागावे. तीत :१११५

]
आत्मिक ख्रिस्ती बरोबर वाईट गोष्टी होत नाहीत :
संत पौल सांगतो,”पाच वेळा मला यहुद्यांकडून एकूणचाळीस फटके मिळाले, तीन वेळा मला छड्यांचा मर मिळाला, एकदा
मला धोंडमार झाला तीन वेळा मी तारू फुटीत
सापडलो, एकरात्र एकदिवस मी
समुद्रात होतो.पुष्कळवेळा प्रवासांमध्ये, नद्यांच्या संकटांमध्ये, लुटारुंच्या संकटांमध्ये, स्वकीयांकडून झालेल्या संकटांमध्ये, राष्ट्रांच्या लोकांकडून झालेल्या संकटांमध्ये, नगरातील संकटांमध्ये, रानातील संकटांमध्ये, समुद्रातील संकटांमध्ये, खोट्या भावातील संकटांमध्ये, श्रमामध्ये कष्टा मध्ये,
पुष्कळवेळा जागरणामध्ये, भूक तहान मध्ये,
पुष्कळ वेळा उपासांमध्ये थंडी  मध्ये
उघडेपणामध्ये मी होतो. ह्या
बाहेरल्या गोष्टीशिवाय माझा रोजचा रगडा, म्हणजे सर्व मंडळ्यांची चिंता, मला आहेच, कोण अशक्त झाला असता मी अशक्त होत
नाही ? कोण अडखळविला जातो आणि मला संताप नाही
करिंथ ११:२४२९,
प्रेषित पेत्र मंडळीला मार्गदर्शन करताना म्हणतो,”त्याविषयी तुम्ही उल्हासता, तरी आता थोडावेळ नानाप्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे, यासाठी कि जे नाशिवंत
सोने अग्नीच्या योगे पारखले जाते त्या पेक्ष्या तुमच्या विश्वासाची परीक्षा फार मोलवान आहे ती येशू ख्रिस्ताच्या
प्रकट होण्याच्या वेळेस स्तुती, मान गौरव यास
योग्य अशी निघावी. पेत्र :

]
विश्वासणाऱ्या पेक्षा सेवा करणारे अधिक आत्मिक असतात:
एक शरीर आणि
एक आत्मा; त्यामुळे तुमच्या बोलावण्याचा एका आशेत तुम्ही बोलावलेले आहा; एक प्रभू एक
विश्वास एक बाप्तिस्मा. एक
देव, सर्वांचा बाप, तो सर्वांवर
सर्वामध्ये आहे. इफिस :
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे मन वागणे
नवीन व्हावे हि देवाची इच्छा
आहे इफिस :१७३२

१०]
सर्व ख्रिस्ती भरोसा करण्यास योग्य असतात:
खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा. कारण ते मेंढरांच्या वेशात
तुमच्याकडे येतात, पण आतून ते
क्रूर लांडगे आहेत. तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखू शकता. काटेरी झाडांना द्राक्षे किंवा अंजीर येतात का? त्याच प्रमाणे प्रत्येक चागलं झाड चांगले फळ देते पण
वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या
झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे प्रत्येक झाड
चांगले फळ देत नाही
ते तोडण्यात येते विस्तवात टाकले
जाते, म्हणून त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. जो कोणी मला
प्रभू प्रभू म्हणतो, तो प्रत्येक जण
आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझा बाप
जो आकाशामध्ये आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करितो तोच
जाईल. त्या दिवशी मला पुष्कळजण म्हणतील हे प्रभू हे
प्रभू आम्ही तुझ्या नावाने भविष्ये सांगितली, तुझ्या नावाने
भुते काढिली तुझ्या नावाने
पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि मी त्यांना उघड
सांगेल कि मला तुमची
कधीच ओळख नव्हती, अहो अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही माझ्यापासून निघून जा.’मत्तय :१५२३

११]
 ख्रिस्ती व्यक्ती कोणालाही दुखावू शकत नाही:
आपण या पुढे तान्हे
बाळ असू नये, म्हणजे शिकवणीच्या प्रत्येक वाऱ्याने, माणसाच्या धूर्तपणाने, फसवण्याच्या युक्ती चातुर्याने हेलकावलेली फिरवलेली अशी
असू नयेतइफिस
: १४१५

१२]
ख्रिस्ती व्यक्ती अविश्वासणाऱ्या बरोबर संबंध ठेऊ शकत नाही:
जे अशक्त त्यांना
मिळवण्यासाठी मी अशक्तास अशक्तासारखा
झालो; मी सर्वांसाठी सर्व
काही झालो आहे, यासाठीकी कसे तरी कित्येकांस तारावे, आणि सर्वकाही मी शुभवर्तमानाकरिता करतो, यासाठी
की मी इतरांच्या बरोबर
त्याचा भागीदार व्हावे. करिंथ :२२२३

१३]
ख्रिस्ती नेहमी देवाच्या अगदी जवळ असल्याचे फील करतात:
  स्तोत्रकर्ता
म्हणतो, “हे देवा, तू
माझा देव आहेस, उत्कंठेने मी तुला शोधीन;
कोरड्या बरड अशा
निर्जल भूमीत माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे माझा जीव तुझ्या करिता उत्कंठित झाला आहे.स्तोत्र ६३:, जशी
हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, तसा हे देवा माझा
जीव तुझ्यासाठी धापा टाकितो. माझा जीव देवाचा, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे, मी केव्हा देवासमोर
येऊन हजर होईन? तुझा देव कोठे आहे असे ते मला सारा
दिवस म्हणत असताना दिवसा रात्री माझी
आसवेच माझे अन्न झाली आहेत.स्तोत्र ४२:

१४]
तारण होण्यासाठी काहीतरी योग्यता असावी लागते:
हि गोष्ट विश्वसनीय
पूर्ण अंगिकारण्यास योग्य आहे, की ख्रिस्त येशू
पाप्यास तारावयास जगात आला त्यांच्यामध्ये मी तर पहिला
आहे, तरी माझ्यावर या करीत दया
झाली की येशू ख्रिस्ताने
मी जो पहिला त्या
माझ्याविषयी पूर्ण सहनशीलता दाखवावी ती अशासाठीकी यापुढे
जे सर्वकाळच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे. तिम :१५१६.

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole