वचन: शहाण्यांच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात, पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.उपदेशक१०:१२.
शहाणा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे बोलणे सर्वाना आनंद देणारे,मार्गदर्शक व शांतिकारक वाटते. शहाण्या व्यक्तीचे मित्र उच्चपदस्थ असतात. हृदयाची शुद्धता व त्याच्या ओठात कृपा असल्यामुळे राजा त्याचा मित्र होईल,नीतिसूत्रे २२:११. देवाचे वचन मनुष्याला शहाणे बनवते, स्तोत्र ११९:९९, १३०.
ख्रिस्तावर आपला विश्वास आहे याचा अर्थ आपल्याला ख्रिस्ताची शिकवण मान्य आहे व त्याप्रमाणे जीवन व्यतीत करण्याचा आपण प्रयत्न करतो तर परिणामतः आपण शहाणे व्यक्ती आहोत व आपले मित्र चांगले लोक आहेत. आपण वाईटापासून दूर राहतो आणि निश्चितच आपले जीवन अनुग्रहकारीआहे,शांतिकारक आहे, हि फळे एक ख्रिती व्यक्ती म्हणून आपल्या जीवनात असणारच.
प्रार्थना:
प्रभू येशू तू मला निवडिले पवित्र केले, तुझा पवित्र आत्मा माझ्या मध्ये पाठवला त्याबद्दल मी तुझे आभार मानतो.खरे शहाणपण तुझ्या ठायी आहे.जोकोणी ज्ञानाने उना आहे त्याने ते तुजकडे मागावे असे तुझे अभिवचन आहे.हे प्रभू येशू माझ्यावर अनुग्रह कर शहाण्या व्यक्ती प्रमाणे माझे जीवन आसूदे. येशूच्या नावाने मागतो, आमेन.
रेव्ह. कैलास [अलिशा ] साठे
वचन: परात्पर देवाने माझ्या संबंधाने जी चिन्हे व चमत्कार केले आहेत ते सांगून दाखवावे हे मला बरे वाटले आहे. दानिएल ४:२.
यहोवा देव विश्वाचा निर्माणकर्ता,या सृष्टीचे आद्य कारण, चालक व मालक आहे.अनेकांना त्या निर्माण कर्त्या बद्दल प्रेम व आस्था आहे.आपापल्या सांस्कृतिक,धार्मिक
वारशातुन निर्माण झालेला त्यांचा दृष्टीकोण जसा आहे तसे ते त्याच्याकडे पाहतात. नबुखद्नेसर राजा सुद्धा आशाच प्रकारे देवाकडे पाहत असे.तो अनेक देववादी होता.विशिष्ट्य देवाचे सामर्थ्ये विशिष्ट्य भागा साठी असते असे त्याकाळी मानले जात असे. परंतु यहोवा हा राष्ट्रांचा न्याय करणारा देव आहे, त्याचा अधिकार सर्वत्र चालतो हे नबुखद्नेसराच्या जेव्हा लक्षात आले, तेव्हा यहोवाला संबोधण्यासाठी तो परात्पर म्हणजे स्वर्गात अतिश्रेष्ठ ठिकाणी विराजमान सर्वोच्य देव असे संबोधितो.
नबुखद्नेसराला न उमगलेल्या देवा बरोबर तुमचे अगदी जवळचे म्हणजे पिता पुत्राचे/ कन्येचे नाते आहे.याला तुम्ही आबा बापा अशी हाक मारता, त्याच्याशी बोलता तो तुमचे ऐकतो हे किती अद्भुत आहे.तुम्ही स्वतःला किती धन्य समजावे आणि किती कृतज्ञता पूर्वक वागावे?
प्रार्थना: हे देवा तुझ्या प्रीतीसाठी धन्यवाद, तुझ्यामुळे माझे जीवन धन्य आहे.माझ्या द्वारे तुझे गौरव होऊ दे.येशूच्या नावाने मागतो,आमेन.
रेव्ह.कैलास [अलिशा] साठे .