मागे फिरायचे नाही, उत्पत्ती २४:८.

वचन:आणि ती मुलगी तुझ्या बरोबर येण्यास मान्य झाली नाही, तर या माझ्या शपथेपासून तू मोकळा होशील मात्र तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नको. उत्पत्ती २४:.

मागे फिरू नका

अब्राहामाने त्याचा मुख्य कारभारी अलीयेजर याला शपथ पूर्वक सांगितले होते कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नको. तर त्याच्या नातलगांकडे जाऊन इसहाक साठी मुलगी आण. येथे अलीयेजरने अतिशय रास्त प्रश्न उपस्थित केला कि जर तुझ्या नातेवाइकांनी मुलगी देण्यास नकार दिला किंवा जर मुलगी इकडे इतक्या लांब येण्यास तयार झाली नाही तर काय करायचे? तेव्हा अब्राहामाने त्याला अतिशय स्पष्टपणे बजावले 
कि जर ती मुलगी इकडे आली नाही तर तू माझ्या शपथेतून मोकळा झाला असे समज पण माझ्या मुलाला पुन्हा त्या देशात माझ्या नातलगांकडे नेऊ नको. अब्राहामाने हे असे इतके स्पष्ट पणे बजावून सांगण्याचे कारण काय असावे?

) देवाच्या योजनेला आद्यक्रम: परमेश्वराने अब्राहामास सांगितले तू आपला देश. आपले नातेवाईक आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करिन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करिन तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करिन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करिन. तुझ्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील.उत्पत्ती १२: देवाने केलेल्या 
आज्ञेनंतर अब्राहाम या देशात आला होता. पवित्र शास्त्र 
अब्राहामाच्या पाचारणा बाबत सांगते कि, देवाने त्याला विशेष योजने साठी पाचारले होते.देवाला त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करावयाची होती. याचा अर्थ पृथीवरील सर्व लोकांना मग ते कुठल्याही जाती धर्माचे, वंशाचे, कुळाचे , रंगाचे, गरीब अथवा श्रीमंत किंवा कुठल्यातही देशात राहणारे, कोणत्याही भाष्या बोलणारे कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेला अनुसरणारे असोत अशा सर्वांना त्याला आशीर्वादित करावयाचे होते
पापामुळे शापित झालेल्या 
मानवी जीवनातील अव्यवस्था नष्ट करून
समस्त मानव जातीला शांतिमय आनंदमय समृध्द जीवन द्यायचे होते. कारण तो सर्वांचा निर्माण कर्ता आहे. मानवाच्या कल्याणा मध्ये त्याला आनंद मिळतो. मानवाने पवित्र जीवन जगावे त्याच्या संगती चालावे हि त्याची इच्छा आहे.

 अशा महान कार्यासाठी देवाने अब्राहामाची निवड केली होती.अब्राहाम आता जवळ जवळ एकशे चाळीस वर्षाचा झाला असावा म्हणजे मागील सत्तर वर्षे तो देवाच्या संगती चालत होता. त्यातून त्याला देवाच्या योजनेचे महत्व, सत्यता, 
निश्चितता कळली होती. जगातील कुठलीच गोष्ट देवाच्या योजनेला समर्पित असण्यापेक्षा श्रेष्ट नाही हे त्याला कळले होते. म्हणून तो हे स्पष्ट पणे बोलू शकला की,” ती मुलगी तुझ्या बरोबर येण्यास मान्य झाली नाही, तर या माझ्या शपथे पासून तू मोकळा होशील मात्र तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नको,” उत्पत्ती २४: .

 आज आपल्याला सुध्दा आपल्या जीवनात देवाच्या योजनेला आपल्या पाचारणाला प्राथमिकता द्यायची आहे.हे आपण ख्रिस्ती म्हणून आधी लक्षात घ्यायला हवे. एकदा नांगराला हात घातला म्हणजे मागे पाहता येत नाही. लूक :६२ तसेच इब्री १०: ३७:३९ सांगते कि,” मागे हटणे म्हणजे नाश्या कडे जाण्यासारखे आहे. मागे हटणे म्हणजे नाशाकडे जाणे म्हणून आम्ही अब्राहामा प्रमाणे, प्रथम देवाचे राज्य मिळवण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे बाकी देव पाहून घेईल तो सर्व काही चांगले करण्यास समर्थ आहे. मत्तय :३३.

 ) जबाबदार विश्वासू पिढी निर्माण करणे: अब्राहामाला माहित होते कि देवाचे पाचारण फक्त माझ्या पुरते मर्यादित नाही तर ते माझ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुध्दा आहे. जितक्या जबाबदारीने विश्वासाने मी देवा बरोबर चाललो त्याही पेक्षा अधिक इसहाक त्याच्या येणाऱ्या पिढ्यांनी चालण्याची गरज आहे. म्हणून तो या निर्णयाद्वारे पुढील पिढीला स्पष्टपणे सांगत आहे कि काहीही झाले तरी तुम्ही देवाच्या योजनेला समर्पित रहा. तुमच्या जीवनात देवा संगती चालण्यास प्राथमिकता असावी.

 देव एका 
व्यक्ति पुरता
एका राष्ट्रा पुरता, अथवा एका पिढी पुरता मर्यादित नाही तो सनातन देव आहे, त्याची इच्छा सनातन आहे. तो कधीही बदलत नाही, त्याची योजना खंडित होत नाही. अब्राहामाच्या द्वारे त्याने पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करण्याचे ठरवले लाक्षणिक अर्थाने त्याला आपल्या वाडवडिलांच्या घरापासून दूर करून या जगापासून दूर केले. यासाठी कि त्याने त्याच्या पासून निर्माण होणाऱ्या राष्ट्राने देवाच्या पवित्रतेला अनुसरावे. त्याच्या द्वारे निर्मान झालेल्या इस्राएल राष्ट्राला देव सांगतो कि तू पवित्र राष्ट्र असावे, ” कारण तू आपला देव ह्याची पवित्र प्रजा आहेस; तू त्याची खास प्रजा 
व्हावे 
म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे,” अनुवाद :. देव इस्राएल राष्ट्राला अभिवचन देतो कि, “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील,” यशया ६०:.

 देवाची हि योजना अब्राहाम, 
इस्राएल राष्ट्र यांच्यातून पुढे जात येशू ख्रिस्ता द्वारे 
आपल्या पर्यंत आली. पवित्र शास्त्र सांगते की,” आपण सर्व जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते सर्व त्याच्या द्वारे देवाचे पुत्र आहोत. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहेत तर अब्राहामाचे संतान आणि विश्वासाच्या द्वारा वारीस आहा. गलती :२६, २९. या वरून स्पष्ट होते कि पृथ्वीवरील सर्व कुळांना आशीर्वादित करण्याचे देवाचे कार्य आता येशू ख्रिस्ता द्वारेआपल्याकडे आले आहे. आपल्याला येशू ख्रिस्ताने पापापासून शापापासून मुक्त करून तारिले आहे. संपूर्ण जगाला तारण्याचे सामर्थ्य असलेली सुवार्ता आपल्याकडे सोपवून दिली आहे,” हि सगळी देवाची करणी आहे त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिताद्वारे केला आणि 
समेटाची सेवा आपल्याकडे सोपवून दिली आहे,” करिंथ :२८.

 देवाकडून प्राप्त झालेली हि समेटाची सेवा आपण अब्राहामाप्रमाणेच विश्वासाने पुढे नेली पाहिजे आपल्या पुढील पिढीला देखील या सेवेसाठी तयार केले पाहिजे. अनेक लोक देवाला ओळखतात पण आपल्या मुलामुलींचे लग्न जातीत व्हावे म्हणून देवाच्या कार्यापासून मागे जातात. काही विश्वासणाऱ्या मुलामुलींना नाकारतात कारण ते त्यांच्या जातीचे किंवा सामाजिक दर्जाचे नसतात. असे करून आम्ही विश्वासणारी पिढी नक्कीच घडवत नाही तर देवाच्या पाचारणा प्रती 
आपली नकारात्मक मानसिकता अथवा अज्ञान प्रदर्शीत करितों. आज अब्राहाम आम्हाला शिकवत आहे कि कोणतीही तडजोड होऊ शकते पण देवाशी विश्वासू राहणे यात तडजोड शक्य नाही.एकदा नांगराला हात घातला म्हणजे मागे पाहता येत नाही. लूक :६२

 प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला निवडले आहेस माझ्यासाठी 
माझ्या 
येणाऱ्या पिढ्यांसाठी तुझी विशेष योजना आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. मलाही अब्राहामा प्रमाणे तुला तुझ्या योजनेला प्राथमिकता देता येऊदे माझी पिढी तुला माझ्यापेक्षाही जास्त समर्पित असुदे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole