“लिंग भेद” उत्पत्ती २:१८

स्त्री व पुरुष 

वचन: मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करिन. उत्पत्ती :१८.

स्त्री पुरुष

प्रस्तावना : पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्रियांना दुय्यम स्थान दिलेले असल्यामुळे, स्वार्थी लोकांनी धर्म ग्रंथांतील स्त्रीविषयक लिखाणाचे चुकीचे अर्थ काढल्या मुळे, व स्त्रीविषयक विचार मांडताना चुकीच्या लिखाणांचा आधार घेतल्यामुळे. जवळ जवळ सर्वच संस्कृतींमध्ये स्रियांना शोषणाला सामोरे जावे लागलेले आपण पहातो. आज स्त्रीमुक्तीवादी चळवळ खूप जोम धरीत आहे, स्रियांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे विचार मांडत आहे. अशा वेळी पवित्र शास्त्रातील दृष्टीकोन आपणाला स्रियांचा आदर करण्यास व त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्यास बाध्य करितो.

पवित्र शास्त्रीय दृष्टीकोन [जुना करार]: देवाने स्त्री निर्मितीचा विचार करताना तिला पुरुषापेक्षा दुय्यम दर्जा देण्याचे ठरवले नव्हते. तो म्हणतो,”मी पुरुषाला अनुरूप असा सहकारी निर्माण करीन,”उत्पत्ती २:१८. पंडिता रमाबाई यांच्या भाषांतरातयोग्यतेचा मदतगारअसे लिहिले आहे. के. जे. व्ही. च्या इंग्रजी भाषांतरात स्त्री साठी सुटेबल हेल्पर हा शब्द वापरला आहे. तरी फक्त एवढ्यावरून स्रिची ची उत्पत्ती समजू घेता येत नाही. त्यासाठी उत्पत्ती : २७ या वचनाला प्रामुख्याने विचारात घ्यावे लागेल. या वचना नुसार देवाने स्त्री पुरुष या दोघांनाही आपल्या प्रतिरूपात निर्माण केले आहे. दोघांनाही सारखाच अधिकार दिला, सारखेच काम दिले फलद्रूपतेचा आशीर्वादही सारखाच दिला. नर नारी अशी ती निर्माण केली. जरी नरापासून नारी उत्पन्न केली, प्रथम नर नंतर नारी निर्माण केली तिला मदतगार, सहकारी अथवा सुटेबल हेल्पर असे म्हटले असले तरी तिची योग्यता दुय्यम ठरत नाही, कारण निर्माण कर्ता पिता परमेश्वर तिला दुय्यम ठरवत नाही.पिता आपल्या लेकरांकडे कमीअधिक दृष्टीकोनातून पाहत नाही लेकरांनाहि एकमेकांकडे कमीअधिक दृष्टीकोनांतून पाहण्याचा अधिकार नाही

स्त्री पुरुष

पवित्र शास्त्रीय दृष्टीकोन [नवा करार ] : नव्या करारा मध्ये स्त्रीपुरुषांनी एकमेकांना आदर देत वागणूक करण्याचा आग्रह आपण पाहतो. आदर देताना काही नीती नियम दोघांनीही पाळावयाचे आहेत.  करि ११:१११२ सांगते,”प्रभुमध्ये पुरुष स्त्री पासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्रिच्याद्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे.” 

स्त्री पुरुष

स्त्रीपुरुष दोघेही सामान आहेत: दोन्ही करारातील निष्कर्ष लक्षात घेता आपण असे म्हणू शकतो की, देवाने स्त्री व पुरुष यांना समान दर्जा दिला आहे. दोघांनाही सारखाच आशीर्वाद, सारखेच काम, व सारखाच अधिकार दिलेला आहे. त्यामुळे दोघेही  समान आहेत व  देवाचे गौरव करणे हि दोघांची मिळून जबाबदारी आहे.

देवाने त्यांना केवळ प्रजनन संगोपन करण्यासाठी निर्माण केले नाही. जसे काही लोक; ‘हम दो और हमारे दोया पलीकडे जातच नाहीत. मला येथे सांगायला हवे कि आदामाची जबाबदारी हव्वाबाई लेकरे अशी संपूर्ण कुटुंबात विभागली आहे. तीच परंपरा पुढे आपण पाहतो, यहोशवा म्हणतो, “मी माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार,” यहोशवा २४:१५.एकमेकाला कमी अधिक लेखून देवाचे गौरव होणार नाही तर एकत्र मिळून सेवा केल्याने होईलख्रिस्ता मध्ये आपण नवीन सृष्टी आहोत.त्यामुळे आपल्या कुटुंब व्यवस्थे मध्ये भेदभाव असू नयेत, प्रत्येक कुटुंब प्रमुखाचा यहोशवा प्रमाणे हाच हेतू असावा की, ‘मी व माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार’.

प्रार्थन: हे प्रभू येशू तू मला नवीन सृष्टी बनवले म्हणून मी तुझे आभार मानतो.मी माझे घराणे तुझी सेवा करील असे तुझ्या दयेने कृपेने होऊ दे, माझ्या कुटुंबात कोणत्याच प्रकारचा भेदभाव असू नये. येशूच्या नावाने मागतो, आमेन.

 रेव्ह कैलास [आलिशा] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole