लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.

वचन: लोटाच्या दोघी मुली आपल्या बापा पासून गरोदर राहिल्या. उत्पत्ती १९:३६.

लोट व त्याच्या मुली

लोटाच्या दोघी मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या हे जे त्यांनी केले ते खूपच अमंगळ 
होते, कारण पवित्र शास्त्र सांगते,”तुम्हातल्या कोणीही आपल्या जवळच्या नातेवाईकापाशी त्याची नग्नता उघडी करायला जाऊ नये, मी यहोवा आहे “.लेवीय १८: २९. आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना लोटाच्या जीवनाचा हा शेवट अतिशय वाईट आहे. त्याने आपले होते नव्हते ते सर्वस्व गमावले शेवटी हा अमंगळपणाचा डाग त्याच्या वाट्याला आला. अब्राहामाबरोबर निघालेल्या लोटाला आशीर्वादाच्या वाटेवरून का चालता आले 
नाही हे आपण जाणून घेऊ.

स्वार्थी जीवनशैली : लोट अब्राहामाच्या संगती आशीर्वादाच्या वाटेवर निघाला खरा पण त्या वाटेवर चालण्याची दृष्टी विश्वास त्याला प्राप्त करता आला नाही. जी माणसे स्वार्थी असतात ते योग्य आत्मिक दृष्टी विश्वास प्राप्त करू शकत नाहीत. त्यांचा लोभ त्याना पाश होतो. हनन्या सप्पीरा हे याचे चांगले उदाहरण आहे. ते पहिल्या 
मंडळीचे भाग होते. पवित्र शास्त्र सांगते की, तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा, एक जीवाचा होता, आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते. अनेकांनी आपल्या स्थावर मालमत्ता विकून सर्व पैसा प्रेषितांच्या पायाशी ठेवला होता. प्रेषित :३२३७. हनन्या सप्पीरा यांनी सुद्धा आपली जमीन विकली परंतु काही पैसा त्यांनी स्वतः जवळ ठेवला. हे त्यांचे करणे त्यांच्या अंतरीचा स्वार्थीपणा उघड करणारे आहे. त्यांनी विचार केला असावा की, ‘ जमीन विकून पैसा दिल्या मुळे आपले मंडळीतील महत्व वाढेल, आपल्या गरजाही पूर्ण होतील आपल्या जवळचा पैसाही वाचेल.’ जेव्हा त्यांनी जमिनीतील पैश्याचा काही भाग प्रेषितांच्या पायाशी ठेवला तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे अंतःकरण का भरले? ती होती तोपर्यंत तुझी खाजगीची नव्हती काय? आणि विकल्यावर तुझ्याच स्वाधीन नव्हती काय ? हि गोष्ट तू मनात का आणली ? तू माणसाची नाही तर देवाशी लबाडी केली आहे. हे शब्द ऐकताच त्याने खाली पडून प्राण सोडला. त्याच्या प्रमाणेच त्याच्या पत्नीचाही शेवट झाला. प्रेषित :११. स्वार्थ हा हनन्या सप्पीरा यांच्या आत्मिक जीवनाला पाश असा झाला.

लोटाच्या बाबतीतही आपल्याला अश्या पद्धतीचा निष्कर्ष काढण्यास जागा आहे. त्याचे आशीर्वाद अब्राहामाबरोबर प्रामाणिक पणे राहण्यात होते. कारण देवाने अब्राहामाला अभिवचन देताना म्हटले होते की, “जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन“. उत्पत्ती १२:
परंतु अब्राहामाबरोबर निघालेला लोट त्याच्याशी शांतीपूर्ण संबंध ठेवू शकला नाही. देवाचे वचन सांगते की अब्राहाम  
लोट यांच्या गुराख्यांचे भांडण झाले तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला माझ्या मध्ये तुझ्यामध्ये तुझे गुराखी माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुझ्या पुढे नाही काय ? मी तुला विनंती करितो की तू माझ्या पासून वेगळा हो; जर तू उजवीकडे जाशील तर मी डावीकडे जाईन किंवा तू डावीकडे जाशील तर मी उजवीकडे जाईन. उत्पत्ती १३: . अब्राहामाची हि भूमिका त्यांच्यातला तणाव स्पष्ट करणारी आहे .

पुढे; आपण पाहतो की अब्राहाम त्याच्या मध्ये प्रदेशाची वाटणी होत असता त्याने आपल्यासाठी सुपीक प्रदेश निवडला. तेथे मुबलक पाणी आणि सुपीक जमीन असल्यामुळे त्याच्या पशुधनासाठी हा प्रदेश त्याला अधिक योग्य वाटला. आपल्या चुलत्याचा विचार करता त्याने स्वार्थी दृष्टीकोनातून हा प्रदेश निवडला होता, उत्पत्ती १३:१३. परिणामतः तो फक्त अब्राहामापासूनच दूर गेला नव्हता तर त्याच्या आशीर्वादांपासूनही दूर गेला होता.

आपले आशीर्वाद मंडळीत सलोख्याने राहण्यात आहेत, कोणत्याही कारणाने आपण मंडळी पासून अर्थात जागतिक मंडळीपासून दूर जाऊ नये. असे केल्याने आपण मंडळींपासूनच नाही तर आपल्या आशीर्वादांपासून 
दूर जातो. म्हणून स्वकेंद्रित होऊन मंडळीत वागू नका. स्थानिक मंडळीतून जर तुम्हाला दुसऱ्या स्थानिक मंडळीत जायचे असेल तर क्षमाशील अंतःकरणाने, प्रितीने एकमेकांना आशीर्वाद देत प्रार्थनेच्या ओझ्याने जा. म्हणजे मंडळीतील सलोख्याला भावातील ऐक्याला बाधा येणार नाही, आशीर्वादाच्या वाटेवर देवाचे गौरव करीत तुम्ही मार्गक्रमण कराल.

अयोग्य संगती : फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते, करिंथ १५: ३३. लोट सदोम गमोरा येथील दुष्ट लोकात आपल्या कुटुंब सहित राहत होता. हे लोक देवाला भिणारे, स्वैर वर्तन करणारे होते. व्यभिचार, समलिंगीं संबंध अनैसर्गिक लैगिक आचरण हे त्यांच्या अगदी अंगवळणी पडले होते. आशा दुष्ट लोकांच्या संगती मुळे त्याच्या मुलींना देव, किंवा त्याचे भय तर सोडाच पण लैगिक संबंधाबाबत काही सामाजिक नीती नियम असतात हे देखील माहित पडले नाहीत. तेथील लोकांचा जो दृष्टीकोन लैगिक संबंधाबद्दल होता तोच दृष्टिकोन लोटाच्या मुलींना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या बापाचा वंश वाढवण्यासाठी हा अनैतिक मार्ग अनुसरला. त्यांच्या बापाला म्हणजे लोटाला त्यांनी खूप द्राक्षरस पाजला तो पूर्ण नशेत असताना ह्या मुलींनी त्याच्याशी समागम केले. त्याच्या पासून त्या गरोदर राहिल्या त्यांना दोघीना पुत्र झाले ते मवाबी अम्मोनी लोकांचे प्रथम 
पुरुष होत. हे दोन्ही वंश नेहमी देवाच्या लोकांशी वैरभाव ठेऊन वागले, अनुवाद २३:, शास्ते ११:१३, शमुवेल ११:. लोट अब्राहामा बरोबर आशीर्वादाच्या वाटेने निघाला खरा पण स्वार्थापायी वाईट लोकांच्या संगती मध्ये गेला त्यामुळेच त्याचा शेवट ह्या वाईट प्रसंगाने झाला.

तडजोडीचे जीवन : लोट अगदीच दुराचारी नव्हता पण तो आत्मिक जीवनाशी तडजोड करीत राहिला. पवित्र शास्त्र सांगते की, ” लोट हा न्यायी व्यक्ती होता, अधार्मिकांच्या कामातुरपणाच्या वर्तणुकी मुळे तो त्रासलेला होता.” पेत्र :. याचा अर्थ लोट सदोमास राहत असताना तेथील वाईट लोकांचा व्यवहार पाहून दुःखी होता इतकेच 
नाही तर कदाचित त्याला त्या परिस्थितीच्या अनुभवातून जावे लागले असेल. त्याचा परिवार मोठा होता त्याच्या हाती नौकर चाकर होते त्यामुळे या वाईट लोकांच्या वागण्याला कोणीनाकोणी बळी पडले असेल . तरी तेथील समृद्धीने 
त्याला इतका मोह पडला की तो ते सर्वकाही सहन करीत आपल्या आत्मिक जीवनाशी तडजोड करीत तेथेच राहिला. वास्तविक पाहता त्याने ताबडतोब तो प्रदेश सोडायला हवा होता.

आजचे जग सुध्दा अनेकार्थाने देवाला भिणारे लैगिक स्वैराचाराला बळी पडलेले आहे. समलिंगीं संबंधांना मान्यता, लग्नाशिवाय एकत्र राहणे, पोर्नग्राफी, अशा अनेक गोष्टी ज्या कदाचित आपल्याला माहित नाहीत पण आजच्या जगाच्या अंगवळणी पडत चालल्या आहेत. आता आपल्याला ह्याच जगात अशाच प्रकारच्या लोकांबरोबर राहावे लागत आहे. देवाच्या लोकांनी सतर्कता बाळगावी म्हणूनच लोटाची हि गोष्ट पवित्र शास्र आम्हाला शिकवते. नाशाकडे जाणाऱ्या ह्या जगाला प्रकाश दाखवण्या बरोबरच आम्हाला स्वतःची येणाऱ्या पिढ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. देवाचे वचन सांगते,”तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका; कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय सबंध ? आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण ? ख्रिस्ताचा बलियालाशी काय मेळ ? किंवा विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याशी काय वाटा ? देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाफ ? आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहो; देवाने असे म्हटले की, मी त्यांच्या आत वस्ती करीन त्यांच्या मध्ये चालेन, आणि मी त्यांचा देव होईन ते माझे लोक होतील. म्हणून तुम्ही त्यांच्यातून निघून या 
आणि तुम्ही वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो, आणि अशुध्दला शिवू नका म्हणजे मी तुम्हास अंगिकारीन करिंथ : १४१७. आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना आपल्या आत्मिक जीवनाशी तडजोड करू नका. पवित्र शास्त्र सांगते, “सुखी तो पुरुष, जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा रहात नाही तिरस्काऱ्यांच्या आसनी 
बसत नाही. तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे आणि तो दिवसा रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो“. स्तोत्र :.

प्रार्थना: हे प्रभू माझा उद्धार केलास म्हणून मी तुझे आभार मानतो. स्तोत्र प्रमाणे माझे जीवन दुष्ट संगती पासून दूर ठेवण्यास माझे सहाय्य हो. येशूच्या नावाने मागतो, आमेन.

 रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole