स्वप्नांना सहज घेऊ नका . उत्पत्ती २०:६

स्वप्नांना अर्थ असतो 

वचन: मग देवाने त्याला स्वप्नात म्हटले, होय, मला ठाऊक आहे की, तू आपल्या हृदयाच्या शुध्दतेने हे केले.आणि माझ्या विरुद्ध पाप करण्यापासून मीही तुला आवरले, म्हणूनच तुला मी तिला स्पर्श करू दिला नाही. उत्पत्ती २०:६.

स्वप्न

अब्राहामाने पुन्हा चूक केली,जिवाच्या भीतीने गरार येथील लोकांना त्याची बायको सारा हिची, “बहीणअशी ओळख करून दिली. त्यामुळे गराराचा राजा अबीमलेख याने साराला त्याची बायको करून घेण्यासाठी घरी आणून ठेविले. तेव्हा देवाने त्याला स्वप्नात येऊन सांगितले की ती एका भविष्यवाद्याची बायको आहे. तिला सुखरूप तिच्या पतीकडे सोपव नाही तर तुझा विनाश अटळ आहे. यावर अबीमलेखाने देवाकडे याचना करून म्हटले, हे प्रभू, तू जाणतोस कि त्याने तिला त्याची बहीण म्हटले होते म्हणून मी शुध्द मनाने तिला माझी पत्नी बनवण्यासाठी घेऊन आलो आहे. तेव्हा देवाने त्याला म्हटले हे मला माहित आहे, म्हणूनच तुला सावध करण्यासाठी आलो आहे, की तू माझ्या विरुद्ध पाप करू नये. येथे आपण हे लक्षात घ्यावे की देवाने या स्थिस्तीत अब्राहाम अबीमलेखाला कसे समजून घेतले. अब्राहामाने या बाबतीत दुसऱ्यांदा चूक केली होती देवाच्या संरक्षणावर अविश्वास व्यक्त केला होता. तरी देव त्याच्यावर रागावला नाही; त्याने अब्राहामाचे देहत्व समजून घेतले. अबीमलेखाने शुद्धहेतूने जरी साराला नेले होते तरी त्याची हि चूक होती पण तो सत्याशी पूर्णपणे अवगत नसल्यामुळे त्याने ती कृती केली होती, म्हणून स्वप्ना द्वारे त्याने अबीमलेखाला परिस्थितीशी अवगत केले ते यासाठी की त्याच्या हातून पाप घडू नये. यावरून मानवावरील त्याची प्रीती कृपास्पष्ट होते. माणसांनी या गोष्टीकडे कसे पाहिले असेल यावर विचार करा. नक्कीच वेगवेळ्या दृष्टीकोणातून त्यांनी वेगवेगळे विचार मांडले असतील, कारण माणूस फक्त वरवर पाहतो किंवा आपण म्हणू त्यापेक्षा अधीक तो समजू शकत नाही. त्याचे तर्क वितर्क त्याला सत्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. देव मात्र सर्व काही पाहू शकतो अगदी आमच्या अंतःकरणातील अंतरंग त्याच्यापासून लपत नाही. म्हणून तो प्रत्येक स्थितीत योग्य तेच निर्णय घेऊ शकतो किंवा प्रत्येक परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकतो. म्हणून त्याच्या हाती रहा, तो आपल्या संगती आहे या गोष्टीला समजून घ्या, निर्भय जीवन जगा. अब्राहामाप्रमाणे आम्ही चुकू नये हे उत्तम.

अबीमलेखाने देवाने स्वप्नांद्वारे त्याला जे कळवले; त्याचा त्याने आदर केला, देवाच्या मार्गदर्शनाला योग्य प्रतिसाद दिला. त्यामुळे तो व त्याचे घराणे मोठ्या संकटातून वाचले. आपण सुद्धा हे लक्षात घेऊ की देव स्वप्नांन द्वारे बोलतो .स्वप्नांना अर्थ असतो, स्वप्न म्हणजे दिवसभरातील विचारांचा प्रभाव नव्हे. त्यामुळे स्वप्नांना सहज घेऊ नका. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू मजबरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो . माझ्यावर कृपा कर की मी तुझ्या संगती चालताना चुका करू नयेत. स्वप्नांचे संकेत मला कळू देत. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू   ऐक. आमेन.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole