प्रसन्न जीवन
वचन: तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तु बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुजवर आहे करीता तू त्यास दाबात ठेव. उत्पत्ती ४:७.
देवाने काईनला व त्याच्या अर्पणाला नाकारले कारण त्याची वर्तणूक चांगली नव्हती पण देव माणसावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो हे या वचना द्वारे सिद्ध होते.
काइन वाईट असताही
त्याची उतरलेली मुद्रा त्याला पहावली नाही. देव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता, कि तुला तुझी वर्तणूक सुधारली पाहिजे,
तुझ्या चुका तुला कळाव्यात व तू स्वतःमध्ये सुधारणा करावी म्हणून मी तुझे अर्पण स्वीकारले नाही. तू जर स्वतःमध्ये सुधारणा करशील चांगली वर्तणूक ठेवशील तर मी तुला व तुझ्या अर्पणांना नक्कीच स्वीकारल, तुला आशीर्वाद देईल, तुझे जीवन सुध्दा आनंदी व समृध्द असेल. पण जर तू तुझ्या चुका सुधारल्या नाही तर पाप दारात टपून बसले आहे त्याचा रोख तुजवर आहे. परंतु आदाम व हव्वाच्या पापाचा परिणाम पहा. एक मुलगा चांगला तर एक मुलगा वाईट निपजला. भाऊच भावाचा वैरी झाला. निर्माण कर्ता देव त्याला काय सांगत आहे हे देखील
कळेना.
पाप माणसाला भ्रांत अवस्थेत नेते, येथे आत्मा, जीव व शरीर यांचा संवाद बिघडतो व उरते फक्त भ्रांत दैहिकता उत्पत्ती ६:३–५. पवित्र शास्त्र सांगते कि पाप माणसाला त्याचा गुलाम बनवते, योहान ८:३४. काईन पापाच्या गुलामीत इतका जखडला गेला कि देवाचे मार्गदर्शन त्याला पापाने कळूच दिले नाही त्याची भ्रांती इतकी वाढली कि त्याने शेवटी त्याच्या भावाचा खुन केला व शापित झाला, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे पापाचे गुलाम नाहीत, ख्रिस्ती व्यक्तीवर पाप सत्ता चालवू शकत नाही, सैतान मोह घालण्याचा सतत प्रयत्न करतो पण आपल्यामध्ये वास करणाऱ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य पापाला दाबात ठेवते, रोम ६:१–१४.
प्रार्थाना: हे प्रभू तू मला पापाच्या जोखडा खालून सोडवले म्हणून मी तुझे आभार मानतो. मी माझे जीवन नीतीच्या कार्यासाठी समर्पित करितो; मला सहाय्य कर .येशूच्या नावाने मागतो आमेन.