इस्टर संडे पहाटची भक्ती: संदेश व सर्व्हिस

पहाटची भक्ती. सर्विस ऑर्डर व संदेश.

रिकामी कबर : प्रभू उठला आहे .

[पहाटे ५ वाजता मंडळी एकत्र जमते व डोंगरावर पहाटच्या भक्तीसाठी जाते ]

सर्विस ऑर्डर

घोषणा: प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. पेत्राने तो पाहिला आहे व मलाही तो दिसला आहे.

वचन: येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; योहान ११:२५

स्वागत : प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करितो.

सुरवातीची प्रार्थना:

आराधना : १ ] माळीदादारे माळीदादा २ ] जा सांगा मम् बंधुजना ३ ] भल्या पहाटे कळली वार्ता ४ ] विजयी हुवा

संदेश : पास्टर शारदा साठे

शास्रभाग: मार्क १६: १-८

इस्टर स्रियांच्या दृष्टीकोनातून

१ ] स्त्रीयांचे प्रेम निष्ठा व धैर्य : जेव्हा सर्व शिष्य येशूला सोडून गेले तेव्हा काही स्रिया शेवटपर्यंत त्याच्या संगती राहिल्या. यावरून त्यांची येशूवरील निष्ठा व प्रेम दिसून येते. बायबल सांगते, “बायबल सांगते, काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या; तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या. मार्क १५ :४० -४१. त्याला कोठे ठेवले हे मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. मार्क १५ :४७. नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली.आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या.तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?” मार्क १६ :१-३

२ ] पुनुरुत्थानाच्या पहिल्या साक्षी : त्यांच्या प्रेमामुळे, निष्ठे व धैर्यामुळे त्या पुनरुत्थानाच्या पहिल्या साक्षी झाल्या. बायबल सांगते, “त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले; ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा,” मार्क १६ :४-६.

३ ] पहिली सुवार्ता त्यांनी गाजवली: पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेत स्रियांना दुय्यम स्थान होते परंतु देवाने त्यांना प्रथम सुवार्तेची संधी देऊन त्यांचा सन्मान वाढवला. देवदूताने स्रियांना प्रभू उठल्याचे वृत्त सांगितले. तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”मार्क १६ :६-७. व पुढे आपण पाहतो की प्रभू येशूने स्वतः सुद्धा पहिले दर्शन स्त्रीला देऊन सुवार्तेची संधी दिली व ती संधी तिने अगदी निर्भय पणे स्वीकारली. देवाचे वचन सांगते, “[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.” मार्क १६:९-११. योहान २०:११ -१८.

तेव्हा पासून आजपर्यंत स्रिया विश्वासयोग्य साक्षी ठरल्या आहेत: या स्त्रियांच्या दृष्टीतून दिसणारी ईस्टरची कथा ही धैर्य, विश्वास आणि भक्तीची आहे. त्या आपल्याला आठवण करून देतात की, जे येशूला प्रेम आणि चिकाटीने शोधतात, त्यांचा तो सन्मान करतो. त्यांचा प्रवास—वधस्तंभापाशी झालेल्या दुःखापासून ते रिकाम्या कबरेपाशी मिळालेल्या आनंदापर्यंत—हा आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे.

या ईस्टरला, आपण त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करूया—संकटांमध्ये विश्वासू राहून, विश्वासाने पुढे पाऊल टाकून, आणि येशू पुनरुत्थित झाला आहे हे धैर्याने घोषित करूया! त्यांची साक्ष ही आपलीही साक्ष आहे. ख्रिस्त जिवंत आहे, आणि त्यामुळेच आपल्याला अमर्याद आशा आहे.

प्रभूची प्रार्थना व आशीर्वाद

[ मंडळी पुन्हा चर्च बिल्डिंग मध्ये येते व नष्टl करून इस्टरच्या मुख्य भक्ती साठी तयार होते ]

चर्च ऑफ नॅझरीन हडपसर, पुणे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole