वचन: आकाशाचा देव व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ मी तूला वहावयाला लावतो, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहतो त्याच्या मुलींतून तू माझ्या मुलासाठी नवरी घेणार नाहीस. उत्पत्ती २४:३
प्रस्तावना :अब्राहाम आता थकत चालला असता त्याने आपल्या घरच्या कारभारी चाकरास बोलावले व त्याला शपथ पूर्वक सांगितले कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नकोस तर माझ्या देशातून व माझ्या नातलगातून माझ्या मुलासाठी नवरी आण. अब्राहामाने हा आग्रह का धरला असावा बरे ? आज आपल्या देशात अनेक ख्रिस्ती लग्न करते वेळी फक्त त्यांच्या जातीने संबंधित लोकांशीच बेटी व्यवहार करतात. जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही फक्त ख्रिस्ती
हा निकष लावून नातेसंबंध का करत नाही. तेव्हा ते अब्राहामाचे उदाहरण देतात कि त्याने इसहाका साठी आपल्या आप्तांतील मुलगी
पाहिली.खरे पहाता अब्राहामाने असे का केले हे समजून घेणे आवश्यक आहे. कनानी लोक दुधामधाच्या प्रदेशात राहतहोते. जगिक दृष्टीकोनातून ते समृद्ध होते, काही अभ्यासकांच्या
मते त्यांच्याकडे सर्वात आधी मुळाक्षरे
[[अल्फाबेटिकस ] होती. हे लोक नगरातून राहणारी होते,. त्यामुळे त्यांचे जीवनमान बऱ्यापैकी सुव्यवस्थित होते असे म्हटले तर वावगे होणार नाही, तरी अब्राहाम त्यांच्यातून मुलगी नको असे का म्हणत असावा त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या लोकांना यहोवा देवाची ओळख नव्हती ते अनेक देववादी होते. मूर्तिपूजक होते, देवाला नरबळी अर्पण करणारे होते. लैगिंक
ते बद्दल नीतिनियम न पाळणारे होते. त्यांच्या मध्ये या वाईट गोष्टी असल्यामुळे अब्राहामाने त्यांच्यातील मुलीना नाकारले.
अब्राहामाचे आप्त यहोवा देवाला ओळखणारे होते त्यांच्यात कनानी लोकांप्रमाणे समृध्दी नव्हती पण देवाचे भय होतेयात मुख्य गोष्ट म्हणजे अब्राहामाने समृध्दी पहिली नाही तर देवाच्या पवित्रतेला अनुसरणे अधिक महत्वाचे मानले. चला आता समजून घेऊ की, विवाह जमवताना आपण ख्रिस्ती विश्वासाशी तडजोड का करू नये
आपले पाचारण खूप महत्वाचे आहे : अब्राहामाने आपले पाचारण ओळखले होते. विश्वाचा निर्माता देव याचे कार्य हाती घेऊन तो चालला होता याची त्याला पूर्ण जाणीव होती म्हणून त्याने भोवताली असलेली समृद्धी नाकारली.व इसहाक साठी देवाला ओळखणाऱ्या आपल्या नातेवाइकांतून मुलगी पाहिली . ख्रिस्ती म्हणून आपणही त्याच पाचारणाचे भागी आहोत. पवित्र शास्त्र
सांगते की,”पवित्र बंधुनो, स्वर्गातल्या पाचारणाचे
भागीदारहो प्रेषित व मुख्य याजक प्रभू येशू याकडे लक्ष लावा“.इब्री ३:१. देवाने पूर्वीच आमची या पाचारणासाठी निवड केली होती, यामुळे त्याने आम्हाला नीतिमान ठरवून आमचे गौरव केले आहे. रोम ८:३०,.२ तीमथी १:९. या पाचारणामुळे मिळालेला येशू ख्रिस्त आम्हाला देवाचे ज्ञान व सामर्थ्य असा आहे. १ करिंथ १:२४. जर देवाने आम्हावर एवढी कृपा केली आहे तर अब्राहामाप्रमाणे
या स्वर्गीय कार्याला पुढे घेऊन जाण्याची आमची प्राथमिकता असावी हे अत्यंत व्यवहारिक आहे. संत पौल म्हणतो,”ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा “पण” जिकंण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो; हेच माझे काम आहे“. फिलिपे ३;१४. संत पौल ज्या आवेशाने व समर्पणाने त्याच्या पाचारणाला प्रतिसाद देत होता त्याच प्रमाणे आम्हाला आमच्या स्वर्गीय पाचारणाला प्रतिसाद द्यायचा आहे. कारण देवासाठी आपणही संत पौलाइतकेच महत्वाचे पात्र आहोत. जर आपण आपल्या मुलां
मुलींचे लग्न अविश्वासणाऱ्या जगिक मुलां मुलीं बरोबर लावू तर ते त्यांच्या स्वर्गीय पाचारणाला कसा न्याय देऊ शकतील? जर त्यांच्या आत्मिक जीवनाचा नाश झाला तर त्याला जबाबदार कोण?
देवाचे पाचारण हि वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी आहे : देवाने आम्हाला निवडले आहे ते यासाठीकी आपण वैयक्तिक, स्थानिक मंडळी व जागतिक मंडळींच्या पातळीवर त्याची साक्ष द्यावी. म्हणजे आमच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला वैयत्तिक जीवन तर पवित्र राखायचे आहेच पण त्याच बरोबर स्थानिक व जागतिक मंडळीचे जीवनही
पवित्र राखायचे आहे.
समाज शास्रज्ञ निकोप समाजाचे मूल्यांकन करताना समाजातील काही लोकांचा सर्वे करतात व त्यावरून ते आपले निष्कर्ष काढतात या वरून हे सिद्ध होते कि प्रत्येक
व्यक्ती समाजाचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवतो. म्हणजे आपली साक्ष ती मंडळींची साक्ष व तीच जागतिक मंडळींची म्हणजे ख्रिस्ती समाजाची साक्ष व देवाची साक्ष हे सिद्ध होते.
पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते कि,”तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे अहा. यासाठी कि, ज्याने तुम्हाला अंधारातून काढून अद्युत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” १ पेत्र २:९. या वरून ख्रिस्ती जीवनाचे मोल आणि जबाबदारी किती मोठी आहे हे लक्षात घ्या. या वैक्यतीक व सामाजिक जबाबदारीला जर न्याय द्यायचा असेल
तर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते ते पहा,” तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर जडून विजोड होऊ नका कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार ? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार ? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार ? आपण सादजीवी देवाचे मंदिर अहो; देवाने असे म्हटले आहे की, मी त्यांत निवास करीन व चालेन, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. यास्तव त्यांतून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो; आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन; आणि मी तुम्हास पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्वसत्ताधारी प्रभू म्हणतो. यास्तव प्रिय जनहो, आपणाला हि वचने मिळाली आहे म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध राखावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी“. २ करिंथ ६:१४–१८, ७;१
ख्रिस्ती म्हणून बेटी व्यवहार करताना देवाच्या पावित्र्याला अनुसरणाऱ्यां बरोबर नाते
संबंध करावेत. फक्त जात व आर्थिक परिस्थिती पाहून अनेक ख्रिस्ती आपल्या मुलामुलींचे विवाह करतात.व याचे अनिष्ट परिणाम अशा मुलामुलींना भोगावे लागतात. हे आपण स्वतःहोऊन त्यांना अशुद्धतेच्या हवाली केल्या सारखे आहे.
मंडळी व सहभागितेला अनन्य साधारण महत्व आहे
: ख्रिस्ती जीवन सहभागितेचे जीवन आहे सहभागिते शिवाय ते जिवंत रहात नाही. हे आपल्याला माहित आहे कारण हे फक्त लेबल नाही तर जगणे आहे त्यासाठीच देवाने मंडळींची स्थापना केली आहे. मंडळी मध्ये आपण शिक्षण घेत
देवाच्या कार्यासाठी सिद्ध पात्र असे तयार होतो व आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरव करत आशीर्वादित जीवनाचे भागी होतो. आपल्याला उत्तेजनाची, मार्गदर्शनाची, प्रार्थनेची व मदतीची गरज असते. हे सर्व देवाने मंडळीत ठेवले आहे. देवाचे वचन पाळकाला सांगते की,”वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळीं तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने दोष दाखिव, वाग्दड कर व बोध कर २ तीमथ्य ४:२. तसेच मंडळीला सांगते,”प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे आपण कित्येकांच्या चाली प्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये , तर एकमेकास बोध करावा; आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता म्हणून विशेषकरून
करावा“. इब्री १०:२४–२५.
मंडळींच्या बाहेर जग व त्याची हाव आहे. जेव्हा आपण आपल्या मुलांचे विवाह अविश्वासणाऱ्या मुलां मुलीनं बरोबर लावून देतो तेव्हा ते जगाशी एकरूप होऊन मंडळीला मुकतात. आज आपण अनेक अशी मुले मुली पाहतो कि अशा प्रकारच्या विवाहांमुळे ते सह्भागीते पासून दुरावले आहेत
कधी तरी आपल्याला चर्चला जातायावे
या साठी ते तळमळत असतात. या गोष्टीला कोण जबाबदार आहे हा मोठा प्रश्न आहे?
प्रार्थना हे प्रभू येशू मी जगात तुझ्या मध्ये नवी सृष्टी आहे याची मला जाणीव असूदे. व मी नेहमी तुझ्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावेत असे कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन .
रेव्ह. कैलास [आलिशा] साठे.