देव विरोधी
वचन:
तो यहोवा समोर बलवान पारधी होता; म्हणून निम्रोदा सारखा यहोवासमोर बलवान पारधी, अशी म्हण पडली आहे. उत्पत्ती १०:९.
यहोवा समोर बलवान पारधी याचा खरा अर्थ आहे; ‘देवा विरुध्द’ तो देवाला न भिणारा होता.
तो स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर त्याचे साम्राज्य वाढवू पाहत होता. अवघ्या पृथ्वीवर त्याला स्वामित्व स्थापित करायचे होते. बाबेलचा बुरुज हि त्याच्या महत्वकांक्षेतून निर्माण झालेली कल्पना होती. त्यासाठी त्याने सर्व योजना व साधन सामुग्री तयार करून पृथ्वीवर अतिउंच बुरुंज बांधण्याचे काम हाती घेतले. पण देवाने ते सिध्दीस जाऊ दिले नाही. अगदी क्षणात त्यांच्यात भाषेचा गोंधळ निर्माण केला, त्यांच्यातील संवाद संपवून
त्यांना पृथ्वीवर पांगवले. येथे आपण लक्षात घ्यावे कि देवाच्या सामर्थ्यासमोर मानवाचे काहीच चालत नाही मग तो कितीही बलवान असो.मानव योजना करू शकतो पण त्या सिध्दीस घेऊन जाणे त्याच्या हाती नाही. मानवाने निर्माण केलेले मग ते काहीहि असो देव क्षणात नष्ट करू शकतो. माणसाने देवासमोर गर्व करु नये, त्याचाशी स्पर्धा करू नये;
तर त्याच्या इच्छे नुसार जीवन जगावे हे उत्तम आहे. आजच्या काळाचा विचार करीता देवाने मानवासाठी तारण सिद्ध केले आहे, येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे व या जगाचा न्याय कसा होणार या विषयी त्याने सांगितले आहे.हे आम्हांला कळते तरी आम्ही विश्वासाने त्याला अनुसरत नाही.त्यामुळे आपले जीवन सुध्दा निम्रोदाप्रमाणे देवासमोर गर्विष्ट व त्याच्याशी स्पर्धा करणारे आहे हे लक्षात घ्या. आम्हाला वैयक्तिक पातळीवर व सामाजिक पातळीवर देवाच्या इच्छे नुसार जीवन जगले पाहिजे.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला अंधाराच्या जगातून निवडून घेतले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला केवळ तुला अनुसरण्यास सहाय्य कर . येशूच्या नावाने मागतो. आमेन.