चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गल ६:९

प्रस्तावना: चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गल ६:९ हे वचन गलतिकराच्या मंडळीला आशा, विश्वास व प्रीतीचे महत्व सांगणारे आहे. या वचनाला सुवार्ता व मंडळीची योग्य सैद्धांतिक वाढ या संदर्भात जाणून घ्यावे लागेल.
सुवार्तेचा हेतू : सुवार्तेचा मुख्य हेतू लोकांच्या पापांची क्षमा व्हावी, त्यांच्या मध्ये देवाचे गौरव प्रगट व्हावे, त्यांना ख्रिस्ताच्या ठायी एक करावे, व स्थानिक मंडळींच्या व जागतिक मंडळीच्या पातळीवर ऐक्यता, प्रीती, आशा, व विश्वास असलेल्या निकोप अशा एका आदर्श समाजाची निर्मिती करावी.
अंधाराने व्याप्त होत असलेल्या मानवी समाजाला, सैतानाच्या बंधनातून म्हणजे, व्यभिचार, जारकर्म, अशुध्दपण, कामातुरपण, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, विलास, आणि यासारख्या गोष्टी, यातून सोडवून. दैवी समाजाचा भाग बनवणे आहे. ज्या समाजामध्ये, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रियदमन, अशा दैवी गुणांची जोपासना होईल व त्याची चांगली कामे अंधारानी व्याप्त होत असलेल्या मानवी समजला तारण्यासाठी प्रकाशाचे कार्य होईल. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होईल.
हे कार्य आवश्यक : हे कार्य आवश्यक आहे याची अनेक कारणे आपण समजून घेऊ शकतो. लोक सैतानाच्या बंधनात आहेत. संत पौल आपल्या आपल्या पाचारणाचे कारण अग्रीपा राजाला सांगताना म्हणतो, ‘ देवाने मला त्याच्या सुवार्तेचे कार्य यासाठी दिले आहे की, ‘मी लोकांना सुवार्ता सांगावी आणि त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, मी त्यांचे डोळे उघडावेत , आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’प्रेषित २६:१८. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. गलती ६:१०
हे कार्य थकवणारे आहे: जगातील लोकांची डोळे सैतानाने बंद केली आहेत हे आपण जाणतो. बायबल सांगते, “त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. २ करिंथ ४ :४.
हे कार्य म्हणजे एक आत्मिक युद्ध आहे: आता आपण लक्षात घ्यावे की, सैतानाने बंद केलेली लोंकाची डोळे आपण उघडण्याचे काम जर करीत असू तर आपण त्याच्या विरुध्द युध्द करीत आहोत. बायबल सांगते, आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. इफिस ६: १२. त्यामुळे हे कष्टसाध्य आहे, सहज साध्य नाही.
सैतान देहाच्या वासनांचा उपयोग करून आपल्याला व मंडळीला मोहात पाडण्याचा प्रयत्न सतत करीत राहतो. म्हणजे तो आपल्याला, ‘व्यभिचार, जारकर्म, अशुध्दपण, कामातुरपण, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, विलास, आणि यासारख्या गोष्टींमध्ये सतत चेतवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला मंडळीला सुवार्तेचा प्रकाश जगासमोर पाडण्यापासून रोखायचे आहे. २ करिंथ ४ :४ब, त्यासाठी तो पूर्ण जोर लावून कार्य करीत आहे. बायबल सांगते, सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. १ पेत्र ५:८. कधी कधी तो मेंढराच्या वेषाने मंडळीत शिरतो, मत्तय ७ :१५. सांगते, ” खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.” तुम्ही केलेल्या मेहनतीवर हे पाणी फेरीतील. आपण राखीत व वाढवीत असलेल्या द्राक्ष मळ्याची ते नासधूस करतात. गीतरत्न २:१५.
संत पौलाला हाच अनुभव गलतीकरांच्या मंडळींमध्ये आला. त्याने सांगितलेली सुवार्ता, म्हणजे “येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तारण होते” हा विश्वास सोडून ते नियमशास्त्रास अनुसरण्यास मान्य झाले होते. “अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या [तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून] तुम्हांला कोणी भुरळ घातली? तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतकी दु:खे सोसली हे व्यर्थ काय?” गलती ३:१-४.
अशा प्रकारे सैतान आपल्याला निराश करण्याचा नेहमीच प्रयत्न करितो. आम्ही ऐक्य साधण्याचा प्रयत्न करितो तो फुटी पाडतो. आम्ही प्रीती रुजवण्याचा प्रयत्न करतो तो द्वेष पसरवितो. आपण क्रुसावरील ख्रिस्त गाजवतो परंतु सैतान खोटी सुवार्ता व खोटे शिक्षण मंडळीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतो. बायबल सांगते, ‘चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; योहान १०:१०अ.
सर्वप्रकारच्या विपरीत परिस्थितीत न थकता का कार्यरत रहावे: संत पौल म्हणतो आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल हे निश्चित आहे, कारण देवाच्या आत्म्याच्या द्वारे सर्व गोष्टी सिध्दीस जाणार आहेत. जखऱ्या ४ :६ सांगते, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिध्दी होते. प्रभूमध्ये आपले श्रम व्यर्थ नाहीत. १ करिंथ १५ :५८. तर त्याचे प्रतिफळ मोठे आहे. बायबल सांगते “म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.” इब्री १० :३५ -३६. जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.स्तोत्र १२६:५-६ . कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. इब्री ६: १० -१२.
शेतकऱ्याचे उदाहरण घ्या: अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. याकोब ५:७-८.
माझा सेवेतील अनुभव:
रेव्ह कैलास [अलिशा ] साठे.