देवाची स्तुती, आराधना वचने

 

१] हे यहोवा, आमच्या प्रभू , ज्या तू आपले वैभव आकाशांवर स्थापिले आहे, त्या तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती थोर आहे ! स्तोत्र ८:१. 

२] हे यहोवा, तू सर्वकाल उंच स्थानीं आहेस . स्तोत्र ९२:८.

३] हे यहोवा, तुझी कृत्ये किती मोठी आहेत ! तुझे विचार फार खोल आहेत. स्तोत्र ९२:५.

४] हे देवा, तुझे राज्यासन सदासर्वकाल आहे; तुझा राजदंड सरलतेचा आहे. स्तोत्र ४५:६.

५] हे यहोवा, तू माझ्या सभोंवती ढाल आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहेस. स्तोत्र ३:३.

६] आकाशें  देवाचा महिमा वर्णितात; आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखवते. स्तोत्र १९:१

७] यहोवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे; ते जीवाची सुधारणा करणारे आहे; यहोवाची साक्ष खरी आहे, ती अज्ञान्यांस ज्ञानी करणारी आहे. स्तोत्र १९:७

८] यहोवाचे निर्बंध सरळ आहेत, ते हृदयाला आनंदवितात; यहोवाची आज्ञा शुद्ध आहे, ती डोळे प्रकाशविणारी आहे. स्तोत्र १९:८

९] यहोवाचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; यहोवाचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वस्वी न्यायी आहेत. स्तोत्र १९:९.

१०] पृथ्वी व तिच्यातला भरणा, जग व त्यांत राहणारे यहोवाचे आहेत . स्तोत्र २४:१

११] यहोवा चांगला व सरळ आहे, म्हणून तो पाप्यांना मार्ग शिकविल. स्तोत्र २५:८.

१२] अहो त्याचे भक्तहो तुम्हीं यहोवाला स्तुती गीत गा, आणि त्याची पवित्रता आठवून त्याची उपकारस्तुती करा. स्तोत्र :३०:४

१३] यहोवाचे वचन सरळ आहे, आणि त्याचे सर्व काम खरेपणाने केलेले आहे. स्तोत्र ३३:४

१४] यहोवाच्या शब्दाकडून आकाशें निर्माण झाली; आणि त्याच्या मुखाच्या स्वासाकडून त्याचे सर्व सैन्य निर्माण झाले. स्तोत्र ३३:६.

१५] यहोवा राष्ट्रांची मसलत मोडतो; तो लोकांच्या योजना निष्फळ करतो स्तोत्र ३३:१०.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole