२] “तो सर्वकाळचा राजा, अविनाशी, अदृश्य [एकच ] ज्ञानी देव याला सन्मान व गौरव सर्वकाळ असो. आमेन,” १ तीमथ्य १:१७.
३] “माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची प्रतिमा करू नको. तू त्यांच्या पायापडू नको, आणि त्यांची सेवा करू नको, कारण मी यहोवा तुझा देव आवेशी देव आहे, माझा द्वेष करणाऱ्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर बापाच्या अन्यायाचे शासन लेकरांवर घालणारा, आणि माझ्यावर प्रीती करणाऱ्यांच्या व माझ्या आज्ञा पाळणाऱ्यांच्या हजारांवर प्रेम दया करणारा असा मी आहे,” निर्गम २०:३-६.
४] हे इस्राएला, ऐक, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे. तर तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर. अनुवाद ६:४-५.
५] पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे, तसे पुत्राच्या ठायींही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले,” योहान ५:२६
६] “त्याचे चित्त स्वतांकडेच असले, त्याने आपला आत्मा व स्वास आवरून स्वतःच्या ठायी परत घेतला, तर सर्व जीवधाऱ्यांचा एकदम प्राणांत होईल, मानव पुन्हा मातीस मिळेल,” ईयोब ३४:१४-१५
७] “त्याच्या द्वारे सर्व झाले; आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते,” योहान १: ३-४.
८]“ज्या देवाने जग व त्यांतले अवघें केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे, म्हणून तो हाताने बांधलेल्या मंदिरात रहात नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्याचा हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही; तर जीवन, प्राण व सर्वकाही तोच सर्वास देतो,”प्रेषित १७:२४-२५.
९] “तो दुर्ग आहे; त्याची कृती अव्यंग आहे; त्याचे मार्ग न्यायाचे आहेत; तो सत्य देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही, तो न्यायी व सरळ आहे,” अनुवाद ३२:४.
१०] ” देवा विषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे.” २ शमुवेल २२:३१.
११] “परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करितो,” स्तोत्र १९:७.
१२] “मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो,” यशया ४०:२५.
११] हे प्रभो परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पहाता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही. २ शमुवेल ७:२२.
१२] “हे परमेश्वरा तुझसारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाव मोठे आहे, यिर्मया १०:६.
१३] ‘असा शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे.ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेल्यास जिवंत करितो, व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करितो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे,’ रोम ४:१७.
१४] “पाहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय”? यिर्मया ३२:२७.
१५] “दानीएल म्हणाला, देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल हीं त्याचीच आहेत,” दानी २:२०.
१६] “त्याच्या ठायी ज्ञान व पराक्रम हीं आहेत, मसलत व विवेक त्याच्या जवळ आहेत” ईयोब १२:१३.
१७] “तुम्हांतला कोणी जर ज्ञानाने उना असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावत नाही त्याच्यापाशी मागावे म्हणजे ते त्याला मिळेल”. याकोब १:५
१८] “परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, त्याजवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य, स्तोत्र ३४:८.
१९] “कारण आशा लागलेल्या जीवाला तो तृप्त करतो आणि भुकेल्या जीवाला तो उत्तम पदार्थांनी भरवतो,” स्तोत्र १०७: ९.
२०] ,”तू तुझा मनोदय साधायला मला शिकिव, कारण तू माझा देव आहेस; तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो,” स्तोत्र १४३:१०
२१] “परमेश्वरा सारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. १ शमुवेल २:२.
२२] हे प्रभू तुला कोण भिणार नाही, आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या समोर नमन करतील, कारण तुझी न्याय कृत्ये प्रकट झाली आहेत. प्रकटी १५:४.
२३]”देव विश्वासू आहे, त्याच्याकडून तुम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात बोलावलेले होता.” १ करिंथ १:९.
२४] “जरी आपण अविश्वाशी झालो, तरी तो विश्वासू राहतो कारण त्याच्याने स्वतःला नाकारवत नाही” २ तिम २:१३.
२५] “जो पुरुष यहोवाच्या ठायी विश्वास ठेवतो आणि त्याचा भरोसा यहोवाच आहे तो आशीर्वादित आहे”. यिर्मया १७:७.
२६] “माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहात आहे, त्याच्याकडूनच माझे तारण येते.” स्तोत्र ६२:१.
२७] “यहोवा आपल्या अभिषिक्तला तारतो, हे मी आता जाणतो, तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरोसा ठेवतात, परंतु आम्ही आमचा देव यहोवा याच्या नावा विषयी बोलू.” स्तोत्र २०:६-७.
२८] “देव मोशेला म्हणाला, मी जो असावयाचा तोच असणार, तू इस्राएल लोकांस सांग ‘मी असणार’ त्याने मला तुम्हां कडे पाठवले आहे,” निर्गम ३: १४.
२९] “हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांस निजधाम आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्या पूर्वी, तूं पृथ्वी व जग निर्माण केली त्या पूर्वी तूं युगानुयुग देव आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस आहो मानवांनो परत या. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी आहेत, रात्रीच्या प्रहारासारखी आहेत,”स्तोत्र ९०:१-४.